Skip to main content

निरूत्तर

लेखक मूकवाचक यांनी शनिवार, 20/04/2013 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
मिर्झा बर्जिसचा आणि माझा कित्येक तपांचा पक्का दोस्ताना होता. आमच्या वृत्तीत, स्वभावात आणि कौटुंबीक पार्श्वभूमीत जमीन अस्मानाचा फरक असूनही तो टिकून होता. मिर्झा एका ख्यातनाम नबाबी खानदानातला होता. तो परिस्थितीने पुरता गांजून गेलेला होता. तरीही रक्तात मुरलेली घमेंड, मिजास अजूनही तशीच होती. 'उपरसे शेरवानी और अंदरसे परेशानी' अशा आपल्या केविलवाण्या अवस्थेची जाणीव त्याला वारंवार व्हायची, पण तो पुरता असहाय होता. परिस्थितीवर मात करण्यासाठी काही प्रयत्न करेल तर तो मिर्झा बर्जिस कसला? 'ठेविले अनंते' तैसेची राहून आर्थिक परेशानी लपवून ठेवत आपल्या शेरवानीला मात्र तो प्राणपणाने जपत होता.

एबीएस वाली रिक्षा

लेखक वेल्लाभट यांनी शनिवार, 20/04/2013 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
काल पुन्हा एकदा रिक्षाने लॉंग ड्राइव्ह अनुभवायचा योग आला. रिक्षात बसताना रिक्षा चालकाकडे एक आपली जस्ट नजर टाकली. चेहरा, स्टान्स वगैरे बघून अंदाज येतो साधारण की ही 'राइड' कशी असणार आहे ते. तेंव्हा संतुलित वाटला माणूस. अमूक ठिकाणी जाणार का? मी विचारलं. भविष्यवेत्त्याने भविष्य सांगण्याआधी जसा विचार करावा तसा एक ५-६ सेकंद विचार करून मानेला एक होकारार्थी आणि त्याचबरोबर आज्ञार्थी झटका देऊन तो रिक्षात बसला. त्या ५-६ सेकंदात काय गणित मांडलं त्याने कोण जाणे. मीही बसलो. आपलं डावं बूड सीट च्या उजव्या भागावर स्थापून त्याने रिक्षाला किक मारलीन, खट्ट कन फर्स्ट गियर टाकला आणि झर्र्र्कन पिकप घेतला.

भार्गव राघव द्वारकाधीशा .. (भाग १)

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शनिवार, 20/04/2013 10:19 या दिवशी प्रकाशित केले.
कलादालन आणि प्रवासवर्णन इथे आमची हजेरी कायम वाचक म्हणूनच लागत आली आहे. ह्या ठिकाणी कधी लेखक म्हणून येऊ असे वाटलेच नाही. त्यामुळेम मग अशा लेखांवरती आपले ज्ञानकण उडवणे येवढेc आपले काम उरले होते. मात्र काल अचानक रामनवमीच्या मुहूर्तावर द्वारकेची वारी झाली आणि मन कसे प्रसन्न झाले. ह्यातलेच काही फटू झेपेल तेवढ्या वर्णनासह देत आहे. काही दिवसांपूर्वी असाच योग पोरबंदरचे सुदामा मंदीर बघण्याचा आला. त्याचे देखील काही फटू देत आहे. ह्या सर्व प्रवासातले आमचे सहप्रवासी म्हणजे आमचे परम मित्र आणि मिपाचे मूकवाचक अमोल जाधव.

"दाखवणे" आणि फॉर्मल कपडे

लेखक शिल्पा ब यांनी शनिवार, 20/04/2013 09:39 या दिवशी प्रकाशित केले.
बॅटमॅनचा हा धागा वाचला अन मनात काही प्रश्न निर्माण झाले. म्हंटल दुसरा धागाच उसवावा. असो. तर आता आमच्या डोक्यात आलेल्या प्रश्नांबद्दलः लग्नाचं वय झालं (वेगवेगळ्या आई-वडीलांच्या मते १६ पासुन पुढे ) कि दाखवण्याचे प्रकार सुरु होतात...म्हणजे मुलाला मुलगी दाखवणे वेग्रे. गैरसमज नको उगाच. तर अशा प्रसंगी मुलींना साधारणपणे साडी घालायचा आग्रह होतो. म्हणजे शाळा कालेजात असताना अन बाहेर हिंडताना भले पँट / जीन्स/ स्कर्ट / हाप्पँट / बर्मुडा / पंजाबी ड्रेस - त्यातही बरेच प्रकार आहेत, झालंच तर थ्री फोर्थ वेग्रे घालणार पण पसंतीच्या वेळेस मात्र साडीच असावी. का?

सुप्रभात -

लेखक विदेश यांनी शनिवार, 20/04/2013 07:38 या दिवशी प्रकाशित केले.
वेळ झाली हो चहाची सूर्य सांगे तो पहा कोंबडाही साद घाली स्मरण द्याया तो पहा पाखरे घेण्या भरारी आळसाला झटकती छान वाटे गार वारा झोंबणारा तो पहा वर्दळीला जाग आली चालली रस्त्यावरी श्वान भुंके आणि सांगे मीहि जागा तो पहा दूध पिशव्या लागल्या की लोंबण्या दारावरी स्वच्छता मोहीमवाला शीळ घाली तो पहा छान सजली आज दारी नक्षिची रंगावली पाहुणाही थबकला का पाहण्याला तो पहा .
काव्यरस

राम जन्मला ग सखे …राम जन्मला

लेखक निमिष ध. यांनी शनिवार, 20/04/2013 01:41 या दिवशी प्रकाशित केले.
कालच आई म्हणाली आज रामनवमी आहे जरा नमस्कार कर तो चांगली बुद्धी देईल. आता आम्ही कधी तिचा सल्ला ऐकतो कधी नाही ऐकत पण आज काही तरी वेगळेच होते. चेहरे पुस्तकावर एक श्लोक वाचला आणि कळले की हे गीत रामायणातील राम जन्माचे गीत आहे. गीत रामायणातील काही गीते मधून मधून ऐकली होतीच पण निदान माझ्या पिढीला तरी गीत रामायण काय आहे हे कमीच माहिती आहे. ग दि मा आणि सुधीर फडक्यांनी रचलेली गीते आहेत एवढे माहिती होते. मग काय शोधाशोध सुरु झाली आणि हाती लागला खजिना. गीत रामायणाच्या सुवर्ण महोत्सवासाठी सकाळ ने आयोजित केलेल्या सुश्राव्य कार्यक्रमाचे चित्रीकरण तू-नळीवर सापडले. आणि मी ते ऐकण्यात हरवून गेलो.

तिरंगा

लेखक फारएन्ड यांनी शुक्रवार, 19/04/2013 21:21 या दिवशी प्रकाशित केले.
कलाकारांची ओळखः हीरो लोकः हीरो-१: नाना- सतत वैतागलेला. उसूल "पहले लात (लाथ), फिर मुलाकात, फिर बात" हीरो-२: राजकुमार - चेहरा व मिशी यांच्या अलाइनमेंटमधे पृथ्वीच्या अक्षासारखा फरक. मेकअप टीमने डोळ्यावर पट्टी बांधून त्याच्या चेहर्‍यावर मिशी लावण्याचा खेळ खेळलेला केलेला आहे (चित्रातील गाढवाला शेपटी लावतात तसे) असे सतत वाटणारा. उसूल "पहले मुलाकात, फिर बात, फिर जरूरत पडे तो लात" हीरॉइन्स - हरीश, ममता,कुलकर्णी आणि वर्षा उसगावकर ("इसे समझो ना रेशम का तार भैय्या") चरित्र ई.

शिलाहारांचा कोप्पेश्वर.......भाग -१

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 19/04/2013 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
खिद्रापूरचा कोप्पेश्वर: Simple, Free Image and File Hosting at MediaFire या दरवाजातून आत पाऊल टाका आणि हे बघा..........कोप्पेश्वरचे मंदीर. Simple, Free Image and File Hosting at MediaFire शिलाहार राजे दोन गोष्टींसाठी बरेच प्रसिद्ध होते एक म्हणजे त्यांनी त्या काळात

मराठमोळे शेंगोळे

लेखक गौरीबाई गोवेकर यांनी शुक्रवार, 19/04/2013 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
हा पदार्थ अगदी अनवट आहे. अगदी एखद्या अनवट रागासारखा, दुर्मीळ पण अत्यंत श्रवणीय (खवणीय :)) हा काही खासाहेबांचा पदार्थ नाही. याचा शोध मला खूप नंतर म्हणजे मी स्वतंत्रपणे मैफीली करायला सुरवात केल्यानंतर. कसा लागला ते सांगेन शेवटी. पण आधी पाकृ. पाहू. पदार्थ दिसायला एवढा अ‍ॅट्रेक्टीव दिसत नाही गार्नीशिग केल्यास छान दिसेल. कसले करावे ते सुचवा. शेंगोळे: साहित्य कुळथाचे पीठ ३ वाट्या, लाल सुक्या मिरच्या सहा सात (आवडी प्रमाणे अजूनही चालतील)., १ वाटी चिरलेली कोथिंबिर , १ चमचा जिरे पावडर, आठ दहा लसूण पाकळ्या, अर्धी वाटी तेल. मीठ. कुळथाचे ताजे पीठ घ्यावे.

बहु भुकेला झालो...

लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 19/04/2013 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
१९३०-३२ चा सुमार असेल.. गदगच्या आपल्या राहत्या घरातून एक मुलगा अंगावरील वस्त्रानिशी घरातून पळाला.. संगीत देवतेला 'जोहार मायबाप जोहार.. ' असं म्हणत निघाला..! त्याच्या आईनं त्याला काही भजनं शिकवली होती. गावातल्या कुणा मास्तरांकडून त्याला काही सांगितिक भाकऱ्यांची शिदोरी मिळाली होती. पण तेवढ्यानं त्याचं पोट नव्हतं भरत.. त्यामुळे सोबत ती थोडीशी शिदोरी घेऊन तो महाराचा महार 'जोहार मायबाप जोहार..' असं म्हणत निघाला.. ग्वाल्हेर, रामपूर, बनारस, जालंदर... खूप खूप वणबण केली त्या बहू भुकेल्याने...