बुफे,अथवा खड भोजन
लेखनविषय:
काव्यरस
भोजन नाही हा जमला बुभुक्षितांचा मेळा ,
आप्त ,स्वजन झाले भोजनासी गोळा ,
भोजनासी गर्दी झाली भारी ,
करती पहा कैसी मारामारी ,
गर्दी करती अन्ना भोवती ,
जैसी गिधाडे भक्षा भोवती ,
कोणी करेना कोणाची पर्वा ,
भोजन हवे आधि सर्वा ,
पहा भोजनाचा देखावा कैसा ,
घेऊन कटोरा उभा याचक जैसा,
कोठे लोपली ती पूर्वीची पंगत,
भोजनाची पहा गेली रंगत,
पाट ,ताट रांगोळी छान ,
भोजनाचा कैसा राखती मान ,
होते कसे श्लोकांचे गुंजन ,
भोजन वाढती आग्रहे स्वजन,
पैजेने ते लाडू खाणे ,
मौजेने हसणे गाणे,
नशिबी आले उभ्याने भोजन ,
घेऊन थाळी रांगेत स्वजन
वाचने
3046
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
सहमत
बूफे
मस्त...
सहमत आहे. बुफे पद्धतीने जेवणे
आवडली
खंड भोजन शब्द आवडला.
पंगत की बफे.
In reply to पंगत की बफे. by प्रभाकर पेठकर
दिल्ली वा उत्तर भारतात
कवितेत मांडलेल्या विचारांशी