Skip to main content

धरण उषाला कोरड घशाला

लेखक Bhagwanta Wayal यांनी शुक्रवार, 03/05/2013 20:24 या दिवशी प्रकाशित केले.
खिशामध्ये हात घालुन काही तरी खात होता एका हातात हांडा घेऊन घाईघाईने जात होता रखरखीत ऊन्हात वहात होत्या घामाच्या धारा विचारले आम्ही त्याला कुठे जातोयस रे पोरा त्यानेही अगदी सहजतेने आम्हाला उत्तर दिले घरी आहेत आई वडिल तहाणेने व्याकुळलेले कष्ट करुन त्यांना आलेय थोडी कणकण पाण्यासाठी आमची होतेय अशी वनवन शेजारच्या गावामध्ये म्हणे टँकर येतोय दोनदा बघतो तिथे मिळ्तोय का पाण्याचा एखादा हंडा तसं तर धरण पण आहे आमच्या गावाच्या उषाला पण म्हणतात ना धरण उषाला अन कोरड घशाला आमच्या ही बाबतीत असच काही तरी घडलय धरणातले पाणी शेजारच्या जिल्ह्यांना सोडलय तुमच तर काय साहेब बिसलेरी बाटलीवर भागत हांडाभर पाण्यासाठी आम्हाला रात्रभर जागाव लागतं
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2290
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

दारूण परिस्थिती आहे; पण शुद्धलेखनातल्या चुकीने कवितेतल्या कारूण्याला विनोदाची झालर लागली आहे. 'धरण उशाला' असं म्हणायचं आहे असं समजून घेतले आहे पण शीर्षकात 'धरण उषाला' हे वाचून भलताच अर्थ वाटला होता. असो.