Skip to main content

असुर कोण ? (१)

लेखक शरद यांनी गुरुवार, 09/05/2013 08:16 या दिवशी प्रकाशित केले.
असुर कोण ? (१) मागील एका धाग्यात "असुर" बद्दल उल्लेख झाला होता. आज असुर बद्दल काही माहिती बघू. ही माहिती दोन प्रकारांनी पाहिली पाहिजे. पहिली आपले वैदिक/पौराणिक वाङ्मय काय सांगते व दुसरी ऐतिहासिक/वांशिक माहिती. लहानपणापासून दैत्य, दानव, असुर, राक्षस हे सगळे एक, क्रूर, दुष्ट, अन्यायी, देवांचे शत्रु, थोडक्यात वाईट. अर्थात जरी हे सगळे भिन्न असले तरी एकाच वर्गांत ढकलले गेलेले. रावण. नरकासुर, हिरण्यकश्यपु वगैरे. या विरुद्ध दुसरी बाजू मोठ्या विद्वानांनी घेतलेली, विशेषत: साम्यवादी विद्वानांनी मांडलेली. त्यात असुर हे आर्य येण्यापूर्वीचे भारतातील रहिवासी. सुसंस्कृत, नागरी, शांतताप्रिय.

जो मेरा हो नही पाया, वो तेरा हो नही सकता.... :)

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी गुरुवार, 09/05/2013 06:56 या दिवशी प्रकाशित केले.
डॉ.कुमार विश्वास. गेल्या वर्षी लोकपाल विधेयकाच्या निमित्तानं दिल्लीत मोठं आंदोलन सुरु होतं. श्री अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल,किरण बेदी आणि अन्य मंडळींच्या आंदोलनाला लोकांनी प्रचंड अशा संखेनं पाठींबा दिला. एक प्रचंड उत्साह त्यावेळेस दिसला होता. अगदी स्वांतंत्र्याचा लढा आम्हाला प्रत्यक्ष पाहता आला नाही, पण तसंच वाटावं असं भारावून गेलेलं वातावरण होतं, असं अनेक लोक बोलत होते. माध्यमांची दिवसभर क्षणाक्षणाची रिपोर्टींग सुरु असायची. नेत्यांच्या भेटीगाठी स्टेटमेंट्स यांची ब्रेकींग न्युज चाललेली असायची. आणि या आंदोलनाच्या निमित्तानं एक चेहरा विविध वाहिन्यांवर झळकत असायचा.

मध्य वयातील वादळ

लेखक सुबोध खरे यांनी गुरुवार, 09/05/2013 01:12 या दिवशी प्रकाशित केले.
कर्करोग स्तनांचा मध्य वयातील वादळ मध्यवयातील वादळ- पुढे ---------------------- रजो निवृत्ती (menopause) हा एक पूर्ण कुटुंबावर परिणाम करणारा विषय आहे. हा केवळ स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा विषय नसून सर्व वयाच्या पुरुषांवर सुद्धा परिणाम करतो. कारण या कालखंडातून आपली आई बहिण बायको मुलगी किंवा सासू जात असेल तर त्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम पुरुषांवर होतो.

किवी आणि कांगारूंच्या देशांत ०६ : क्विन्सटाउन - मिलफर्ड साउंड आणि एक अनपेक्षित हिमसफर

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी बुधवार, 08/05/2013 22:59 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== किवी आणि कांगारूंच्या देशांत : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७...

डोंबिवली कट्टा....

लेखक मुक्त विहारि यांनी बुधवार, 08/05/2013 22:30 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मित्रांनो आणि मत्रिणींनो, दि, २६/०५/२०१३ रोजी डोंबिवली कट्टा आयोजीत केला आहे. नंदी पॅलेसला सं.७:३० वाजता जमायचे ठरवले आहे. ज्या कोणाला शक्य असेल त्याने यावे आणि ज्यांना शक्य नसेल त्यांनी कट्ट्याचा व्रुत्तांत वाचून समाधान व्यक्त केलेत तरी चालेल. प्रत्येकाने आपापला खर्च करायचा आहे. ठिकाण जरी डोंबिवली असले तरी, फक्त प्रुथ्वीवरीलच नाही तर आकाशगंगेतील सर्व मिपा वाचकांना जाहीर आमंत्रण आहे... मला व्य. नी. केलात तरी चालेल. किंवा इथे प्रतिसाद दिलात तरी चालेल.

कर्नाटक विधानसभा निवडणुक-२०१३

लेखक क्लिंटन यांनी बुधवार, 08/05/2013 21:15 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आजच कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठीची मतमोजणी झाली त्याचे निकाल पुढीलप्रमाणे: एकूण जागा: २२४ (मतदान २२३ जागी झाले) कॉंग्रेस: १२१ भाजप: ४० जनता दल(धर्मनिरपेक्ष): ४० कर्नाटक जनता पक्ष: ६ बी.एस.आर कॉंग्रेस : ३ महाराष्ट्र एकीकरण समिती: २ समाजवादी पक्ष: १ अपक्ष आणि इतर: १० कर्नाटकात २००८ पासून भाजपचे सरकार होते.पक्षाने राज्यात पाच वर्षात बी.एस.येडियुराप्पा, डी.व्ही.सदानंद गौडा आणि जगदिश शेट्टर हे तीन मुख्यमंत्री दिले.

कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे निकाल.

लेखक मनोज श्रीनिवास जोशी यांनी बुधवार, 08/05/2013 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
कर्नाटक च्या जनतेने कोंग्रेस ला स्पष्ट बहुमत दिले आहे. सत्ताधारी भा.ज.प. आणि दोन प्रादेशिक पक्ष सत्ते पासून संपूर्ण बाजूला राहणार आहेत. भाजप चे दक्षिणायन रोखले गेले आहे की संपुष्टात आहे आहे ते पुढच्या ५ वर्षात स्पष्ट होईल. कुमारस्वामी हया अत्यंत संधीसाधू नेत्याला सत्ता स्थापनेमध्ये कोणतेही स्थान उरलेले नाही हे चांगले झाले. येडडीच्या गर्वाचे घर बेचिराख झाले आहे. निर्नायकी कॉंग्रेसचे विजयाबद्दल आणि येडडीचे भाजपा ला कर्नाटकात कमकुवत करण्याबद्दल अभिनंदन. ही निवडणूक भ्रष्टाचाराच्या मुद्यावर लढवली गेली होती असे म्हणतात. तसे असते तर काँगेस चा विजय अशक्य होता.

बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ३ - मुल्हेर -मोरागड

लेखक सुज्ञ माणुस यांनी बुधवार, 08/05/2013 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ३ - मुल्हेर -मोरागड -------------------------- लेखात ८० पेक्षा जास्त फोटू असल्याने ते सगळे मी येथे टाकू शकलो नाही. ( सवडीने टाकेन ) छायाचित्रांसह येथे वाचता येईल. ------------------- कुतूहल हि खरच अजब चीज आहे. त्याच कुतूहलापोटी कुठे जाऊन काय बघायला किंवा अनुभवयाला मिळेल याची शाश्वती नाही. कुठेतरी डोंगररांगात माणसाचा थांगपत्ता नसलेल्या ठिकाणी जाऊन काही अदभुत अश्या गोष्टी आपण पाहतो.

पाकिस्तान तरणार का?

लेखक lakhu risbud यांनी बुधवार, 08/05/2013 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
तारेक फ़तह फाळणीच्या वेळी भारतातून यांचे कुटुंब पाकिस्तानात स्थलांतरित झाले त्यांचा जन्म पाकिस्तानात झाला.शिक्षण पूर्ण झाल्यावर पत्रकार म्हणून काम करण्यास सुरवात केली परंतु त्यांच्या सेक्युलर दृष्टीकोना मुळे आणि धर्मांध प्रवृत्तींना विरोध केल्यामुळे त्यांना आधी सौदी अरेबिया आणि नंतर कॅनडा मध्ये स्थलांतरित होणे भाग पडले त्यांची Chasing a Mirage: The Tragic Illusion of an Islamic State आणि The Jew Is Not My Enemy: Unveiling the Myths that Fuel Muslim Anti-Semitism हि पुस्तके प्रसिद्ध आहेत.या पुस्तकांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत.