Skip to main content

कोळ-पोहे

लेखक दिपक.कुवेत यांनी सोमवार, 06/05/2013 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
kolpohe साहित्यः १. एका नारळाचं घट्ट दुध २. चिंचेचा कोळ - पाव वाटि ३. हिरवी मिरची, कोथिंबीर आणि आलं पेस्ट - ३ चमचे ४. तुप, जीरं, हिंग - फोडणीसाठि ५. चवीनुसार गुळ, मीठ ६. पोहे - जाड किंवा पातळ ७. पोह्याचा पापड किंवा मिरगुंड कॄती: १. नारळाच्या घट्ट दुधात चिंचेचा कोळ, हिरवी मिरची/कोथिंबीर/आलं पेस्ट, चवीनुसार गूळ व मीठ घालुन एकजीव करा २. तुप, हिंग - जिर्‍याची फोडणी तयार कोळाला द्या ३. पोहे किंचीत पाण्याचे हबके मारुन भिजवुन घ्या ४.

दादी के हाथों को जलता देख...

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 06/05/2013 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
प्राध्यापक अशोक चक्रधर. हिंदीतले एक अत्यंत दिग्गज कवीवर. एक विलक्षण, बहुआयामी व्यक्तिमत्त्व..एक भाषाप्रभू, एक शब्दप्रभू..त्याचप्रमाणे एक अत्यंत मिश्किल, हसरं व्यक्तिमत्त्व. एखाद्या विनोदाला मनमुराद दाद देताना अगदी सोडावॉटरची बाटली फुटावी असं खळखळून, मनमोकळं हसणारं व्यक्तिमत्त्व..परंतु त्याचवेळी एक तेवढंच संवेदनशील व्यक्तित्व..जीवनाकडे, माणसांकडे, त्यांच्या प्रश्नांकडे तेवढ्याच संवेदनशीलतेने पाहणारं एक सहृदय व्यक्तिमत्त्व.. माझे ज्येष्ठ मित्रवर्य दिवंगत वसंत पोतदारांसोबत एकदा दिल्लीला गेलो असताना त्यांच्यामुळे मला अशोक चक्रधर या विलक्षण माणसाला भेटण्याचा योग आला..

कबुतरांची सभा

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 06/05/2013 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
पर्वा एका सरकारी हापिसात कामासाठी गेलो होतो आणी नेहमी प्रमाणे वाट बघत ताटकळत उभा होतो. कडेला वाटलं माणसं बोलताहेत पण कबुतरं बोलत होती कालच्या दिवसात काय काय झालं? याचे हिशेब तोलत होती पहिलं दुसर्‍याकडे पाहुन मिष्किलपणे हसत होतं आणी त्यांच्या गमती पाहुन तिसरं मधिच घुसत होतं काल म्हणे पहिल्याला आख्खं कणिस मिळलं पण दुसर्‍यानं धक्का दिला आणी ते हवेतच गळलं थोड्याच वेळात कबुतरांची भली मोठ्ठी सभा भरली आणी आज चरायला कुठं जायचं? यावरच पहिली चर्चा ठरली कुणी म्हणलं किराणा दुकान आजचा पहिला ठराव आहे धान्यात दगडं-खायचा तिथं चांगला सराव आहे. दुसरा म्हणे सरकारि गोडाऊन कशाला मोकळं सोडायचं? पण त्या बेन्
काव्यरस

पानिपतची पहिली लढाई

लेखक लॉरी टांगटूंगकर यांनी रविवार, 05/05/2013 20:32 या दिवशी प्रकाशित केले.
बाबराचा बाप उमर शेख मिर्झा याला परंपरागत पद्धतीने काबुल चे राज्य मिळाले होते. काही कारणाने ते त्याच्याकडून जाऊन त्याला फरहाना (सध्याचे उझबेकिस्तान) (सिर्दार्या नदीच्या उगमाजवळचा प्रांत-राजधानी आदिजान) प्रांत मिळाला.बाबराला बापाकडून हे राज्य मिळाले. हा संपूर्ण प्रदेश डोंगराळ आहे.

आद्य क्रांतिकारक कोण?

लेखक DAGDU यांनी रविवार, 05/05/2013 17:14 या दिवशी प्रकाशित केले.
मी लहान पणा पासून पाठ्यपुस्तकमधून वाचत आलो आहोत की आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके म्हणून, परंतु मी मागे जेजुरी येथे गेलो असता त्या ठिकाणी मला ऊमाजी नाईक यांचा पुतळा दिसला व त्या खाली त्यांचा जन्म दिनांक हा 7 सेप्टेंबर 1791 व मृत्यू दिनांक 3 फेब्रुवरी 1832 असा दाखवलेला होता व इंग्रंजासोबत त्यानी केलेला संघर्ष सांगितला होता. आता मुद्दा हा आहे की वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म हा 4 नोवेम्बेर 1845 साली झाला. इंग्रजानी ऊमाजी नाईक याना 3 फेब्रुवरी 1832 रोजी फासावर चढवले असेल तर मग फडके आद्य क्रांतिकारक कसे?

सुधागड - एक अनुभव

लेखक आशु जोग यांनी रविवार, 05/05/2013 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवसांपासून आमचे सहलीचे बेत ठरत होते. कधी ठिकाण निश्चित होत नव्हते, तर कधी आमच्या मित्रांना सवड नव्हती. आणि मग शेवटी बर्‍यापैकी चंद्रप्रकाश असेल असा शनिवार निवडला, पुरेसे खाणे, जमेल तेवढे पाणी घेतले आणि सुधागडला निघालो. राजगडनंतर आणि रायगडापूर्वी सुधागड किल्ला राजधानी म्हणून महाराजांच्या विचाराधीन होता. पालीमधील सरसगडचा उल्लेख स्थानिक लोक सुधागड म्हणूनच करतात. एवढी माहिती आम्हाला सुधागडबाबत होती. जाताना एक एस टी बस चूकली त्यामुळे तैलबैलाला आम्ही जे दुपारी चारला पोचणार होतो ते पावणे सहा वाजता पोचलो. संध्याकाळी सहालादेखील उन कडक होते.

झुळुक

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी रविवार, 05/05/2013 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
मे महिना. डोक्यावर आग ओकणारा सुर्य. रणरणते उन आणि दमट हवा. मुंबई मधला उन्हाळा म्हणजे, प्रचंड घाम आणि चिकचीकाट. तशात लोकलच्या सेकंड क्लास मधुन प्रवास करायची मजबुरी. म्हणजे फस्ट क्लास काही फार सुसह्य असतो असे नाही, फक्त तिकडे सेंट मिश्रीत घामाचा दर्प येतो आणि लोक रुमाला ऐवजी टायने घाम पुसत असतात. बसायला जागा मिळाली नाहीच. तसाच लटकत उभा राहिलो. दोन बाकांच्या मधल्या ओळीत. एका बारला जीवाच्या आकांताने घट्ट पकडून. आजूबाजूचे प्रवासी अगदी खेटून उभे होते. त्यांच्या चिकट अंगाचा स्पर्श नको नको झाला होता. त्यातच प्रत्येक दिशेने घामाचा वेगवेगळा वास येत होता.

स्व्प्न

लेखक दिपक वायळ यांनी रविवार, 05/05/2013 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा ती माझ्याकडे आली माझ्या बरोबर चल म्हणाली हो म्हणायच्या आतच ती पकडुन हात घेउन गेली होतो सोबत आम्ही चालत कधी शांत कधी बोलत पायवाट निळसर न्व्हती संपत नभी चांदणे, चंद्र सोबत गोड गप्पा न्व्हत्या संपत सुरेल आवाज जणू कोकिलेगत मना मध्ये भासे दिव्य संगत नकळ्त सूर बासरीचे उंमलत हसताना ती बाहूली दिसायची बारिक डोळे मउ मउ गाल गालावर खळी नाजूक पडायची नयन शिंपल्यात जपावी वाटायची तरु तळी एका आम्ही बसलो मनीचे सारे तिला मि वदलो शब्द थरथरले माझे ओठात परी नजर थेट डोळ्यात हे "स्व्प्न" सारं पून्हा आठवायचं नाही झालो जागा तरी उठलो नाही खरंच विचारात पड्लो मी प्रेमा मध्ये तर पडलो नाही

विक्रांत वरील आयुष्य २

लेखक सुबोध खरे यांनी रविवार, 05/05/2013 01:08 या दिवशी प्रकाशित केले.
विक्रांत ( किंवा कोणतीही विमानवाहू नौका) हे एक चालते बोलते शहरच असते. विक्रांत वर बेकरी होती आइस क्रीम तयार करता येत असे. तेथे तीन बेडरूम घरा एवढे कोल्ड स्टोअरेज होते. डॉक्टर म्हणून तुम्हाला तेथे प्रत्येक गोष्टीचे आरोग्यदायी वातावरण ठेवण्याच्या दृष्टीने पर्यवेक्षण फेरी(sanitary round)महिन्यात एकदा करावी लागत असे.यात स्वयंपाक घर जेवणाचा हॉल पासून अन्न आणि शिधा ठेवण्याच्या जागा सुद्धा तपासल्या जात असत.

किवी आणि कांगारूंच्या देशांत ०४ : रोतोरुआ - ख्राईस्टचर्च - माऊंट कुक राष्ट्रीय उद्यान

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शनिवार, 04/05/2013 22:56 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== किवी आणि कांगारूंच्या देशांत : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७...