पंचम पुरीवाला.. एक श्रद्धास्थान..!
मुंबैचा पंचम पुरीवाला. पंचम पुरीवाला हे एक हॉटेल आहे..परंतु खुद्द मालक मात्र त्याला पुरीचं दुकान असं म्हणतो..
बोरीबंदर स्थानकासमोरच बजारगेट स्ट्रीटच्या तोंडाशी हा पंचम पुरीवाला गेली दीडशेहून अधिक वर्ष उभा आहे..
अतिशय साध्या पद्धतीनं सजवलेलं साधंसुधं हॉटेल. लाकडी बाकं..अगदी प्रसन्न वातावरण. प्यायला थंडगार पाणी. प्रत्येक टेबलावर लिंबूमिरच्यांचा एक मोठा वाडगा ठेवलेला..!
अतिशय सुरेख गरमगरम पुर्या. पानात पडलेली छान गरमगरम फुगलेली पुरी हळूच फोडावी अन् बोटाला वाफेचा चटका बसावा याहून अधिक सुंदर ते काय?!
पुर्या तळण्याचा हा महायज्ञ दिवसभर सुरू असतो..
मिसळपाव