Skip to main content

नभईर्षा

लेखक अज्ञातकुल यांनी बुधवार, 12/06/2013 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाची चाहूल आली आणि जमीनीतल्या उधईला पंख फुटले. सोहळा झाला पण कळा अवकळा झाली. .......... कोण चाहुली उलगडले गड अंधारातिल वेणा अवघड वारुळातले फुटले घट अन प्रकाशात पडझडली झुंबड क्षणभंगुर भिरभिर भर अंगण उडे पाकळी पर तिज आंदण नभईर्षेचे सोस सकस पण जड झाले पंखांचे जोखड बळ खळले गळले विरघळले स्वप्नखळे वाटेतच विरले सुटली जागा जाग जागली विद्ध कलेवर पाठी उरले ........................अज्ञात
काव्यरस

चाचणी

लेखक गणपा यांनी बुधवार, 12/06/2013 15:47 या दिवशी प्रकाशित केले.

'जग्वार लॅंडरोव्हर' हस्तांतरण: पाच वर्षे

लेखक खेडूत यांनी रविवार, 02/06/2013 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
2 जून 2013. आज बरोबर पाच वर्षं झाली. भारताच्या आणि जगाच्याही औद्योगिक इतिहासात अत्यंत महत्वाच्या घटनेची नोंद झाली. ती म्हणजे टाटा नी जग्वार लॅंडरोव्हर खरेदी केली. फोर्ड समूहातली ही कंपनी. अमेरिकेतल्या वाहन उद्योग मंदीचं निमित्य झालं आणि तिथला मोठा तोटा भरून काढण्यासाठी फोर्ड ला हे पाऊल उचलावे लागले होते. तशी त्यांच्याकडे ही कंपनी फार वर्षे नव्हतीच. हे दोन समूह पूर्वी बी एम डब्लू आणि वोल्वो कडे पण होते. आणि सहा सात वर्षेच काय ती एकत्रपणे फोर्ड समूहाकडे होते. या बातमीने जगभरातल्या ऑटो उद्योगाच्या भुवया उंचावल्या.

हुलकडूबी नाव

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 02/06/2013 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
हुलकडूबी नाव

यांव आहे, त्यांव आहे
फेकण्याची हाव आहे

हालल्याने डोलणारी
हुलकडूबी नाव आहे

दूध-पाणी एक होता
एक त्यांचा भाव आहे

मध्यभागी घाण-गोध्री
भोवताली गाव आहे

जीवनाने नोंद घ्यावी
जिंकलो मी डाव आहे

भ्रष्ट, लंपट, चोरटा पण;
बोलताना साव आहे

पेटलो मी पूर्ण कोठे?
अंतरंगी वाव आहे

फुंकताना धाप कसली
’अभय’ झाले घाव आहे!

एका गारुड्याची गोष्ट ३ : सर्पोद्यान चे कॉल म्हणजे काय रे भाऊ...फक्त राजाभाऊ !

लेखक जॅक डनियल्स यांनी रविवार, 02/06/2013 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
एका गारुड्याची गोष्ट १ : पुण्याचे पत्ते - माझा छंद ! एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला ! आधीच्या भागात लिहिल्या प्रमाणे मी सापांचे कॉल (कॉल: साप, घोरपड, घर, गरुड, घुबड ,उदमांजर , रानमांजर इ. पकडण्यासाठी साठी आलेला फोन) करायला सुरवात केली. पण कुठून यायचे हे कॉल ? कोण करायचे ? नंतर त्या सापांचे काय व्हायचे ?

ब्रुटसची खंजीर

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 02/06/2013 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
अजर आहे अमर आहे ब्रुटसची खंजीर. प्रत्येक युगात करते सीजरचा घात ही. रात्र वैऱ्याची आहे जागत राहा सीजर. वेश घेऊन विश्वासाचे वावरत आहे ब्रुटस इथेच. अभिमंत्रित, अपराजित ब्रुटसची खंजीर आहे. बेसावध सीजरच्या रक्ताची तहान आहे. आज ही तळपते गगनी सीजरच्या रक्ताने माखलेली. राक्षसी विजयाची दंदुभी जणू ही वज्राहून कठोर, ब्रुटसची खंजीर ही.

मेघावळ....

लेखक अज्ञातकुल यांनी शनिवार, 01/06/2013 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
मेघावळ.... मेघांची प्रभावळ....... मेघ म्हणजे आशा. मेघ म्हणजे दिशा. मेघ अभिलाषा. मेघ निराशाही. मेघ एक दाटलेलं सूक्त. कधि करुणायुक्त कधि दुष्काळभुक्त. ग्रीष्मात निथळलेला प्रत्येकजण आतूर. वारा मेघांना फितूर. आला तर धुवाधार नाही तर पिरपिर रटाळ. मेघ जीवनाचा आधार. मेघ इंद्राचा अवतार. सृजनाचा दातार. सृष्टीचा भ्रातार. पाऊस बेभान. पाऊस निष्काम. पाऊस अस्वस्थ. पाऊस बदनाम. पावसात चिखल.चिखलात कमळ. शेतात भीज. बीजांकुरांची हिरवळ. बीजात सत्व. जगण्या जगविण्याचे तत्व. समृद्ध चाहूल. तरीही छुप्या दुष्काळाची हूल. अतृप्त हा प्रवास सदाही. मनांत खोलवर साचलेलं अचानक प्रवाही. निमित्ताने;.......
काव्यरस

किवी आणि कांगारूंच्या देशांत १६ : केर्न्सचे उष्णप्रदेशिय प्राणिसंग्रहालय आणि सिडनीतील सायंकाळ

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शनिवार, 01/06/2013 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== किवी आणि कांगारूंच्या देशांत : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६...

ही नारायण मूर्ती ?

लेखक देशपांडे विनायक यांनी शनिवार, 01/06/2013 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
नारायणमूर्ती इन्फोसिस मध्ये परत आले अशी बातमी अत्ताच TV वर पाहिली भारत हा अत्यन्त दांभिक देश बनत चालला आहे त्याचे हे उदाहरण नारायणमूर्ती यांच्या कर्तृत्वाबद्दल मी बोलावे इतके कर्तुत्व माझ्यागाठी नाही मी त्याबद्दल बोलतच नाही इन्फोसिस मधे किती वर्षापर्यंत काम करता येते या बद्दल नियम आहेत ना ? माणूस कितीही कर्तृत्ववान असला तरी त्याला काम करणे कधीतरी थांबवावे लागतेना ? इन्फोसिस आत्ता आहे इतकीच मोठी करणे ही नारायणमूर्ती यांच्या कर्तृत्वाची मर्यादा होती असे म्हणताना मला त्यांच्या या मर्यादा बद्दल बोलावयाचे नसून त्यांनी किती मोठी कंपनी उभी केली एवढेच दर्शवावयाचे आहे नारायणमूर्ती इन्फोसिस बाहेर गेले

(छोटीशी का होईना) फसवणूक.. ईशारा.

लेखक सचिन कुलकर्णी यांनी शनिवार, 01/06/2013 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
काल अलिबागहून परतताना पेण पनवेल दरम्यान (गोवा महामार्गावर) एक कामत चे हॉटेल आहे. तिथे मगनलाल चिक्कीचे दुकान आहे. तिथून Assorted Dryfruit चिक्कीचा box १७५ रुपयांना घेतला (Dryfruit म्हणून इतका महाग). घरी येउन पुडा फोडला तर फक्त एक ३"x २" चा एक तुकडा dryfruit चिक्कीचा. बाकी मोठे तुकडे खोबऱा चिक्की आणि शेंगदाणा चिक्कीचे. इतका संताप झाला जीवाचा फसवणुकीच्या भावनेमुळे … %&^*($. कोणी गेलाच त्या दुकानात तर कृपया तुमच्या भावाची हि हकीकत सांगून दोन शब्द बोलून घ्या xxला आणि तुमचा माल घेताना पारखून घ्या हे वेगळे सांगणे न लागे . . As much as possible please avoid this shop. For Everyone's Information.