मराठी रंगभूमीवर शोककळा
लेखनप्रकार
सरत्या वर्षात अजून काय काय पहावे लागणार आहे हे एक गुढच आहे.
सकाळी सकाळी एक दु:खद बातमी कानावर आली. मराठी रंगभूमीवरील प्रख्यात अभिनेता आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे व पेंडसे यांचा दीड वर्षीय चिरंजीव यांचे अपघाती निधन.... मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर उर्से टोल नाकयाजवळ रात्री १२.०० च्या सुमारास समोरून येणार्र्या टेंम्पोचा ताबा जाउन डीव्हायडर पार करून तो टेंम्पो त्यांच्या गाडीवर येउन धडकला आणि पुढे काय झाले असेल याचा विचार करणेच खरेच कठीण होउन बसलेय... काही क्षण कानांवर विश्वासच बसेना....
पण परत एकदा बातमी नीट पाहीली आणि दु:खाचा आणि अश्रुंचा पाट वाहू लागला.
खरच आनंद अभ्यंकर एक अफाट अभिनेता प्रचंड ईच्छाशक्ती आणि अभिनय म्हणाल तर विचारुच नका.
झी मराठीवरील असंभव ही मालिका त्यातील शास्त्रींची भूमिका जी काही त्यांनी आपल्या अभिनयातून जागवली खरच त्यांच्या अभिनयाला सलाम, सलाम आणि सलाम !!!! सध्या चालू असलेली त्यांची मालिका मला सासु हवीय.... ह्यातही त्यांनी जी आबांची भूमिका साकारलीय त्यालाही तोड नाही.......
आज आनंद अभ्यंकर आपल्यात नाहीत पण त्यांचा अभिनय आपल्यात आहे... आता ईथुन पुढे ते आपल्यात नाहीत ह्या गोष्टीवर विश्वास कसा ठेवायचा याचाच विचार करुन मन खिन्न होते आहे..... :(
अखेर ह्या अभिनेत्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना......
वाचने
8389
वाचनखूण
प्रतिक्रिया
51
सरत्या वर्षाची सर्वात कटू घटना.. दोघांच्याही आत्म्यास सद्गती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना...
किती ही भयानक बातमी! हे वर्ष कधी संपतं असं झालं आहे.. :(
आनंद अभ्यंकर खरच गुणी अभिनेते होते. असंभव मधली त्यांची दिनानाथ शास्त्र्यांची भुमीका कायम स्मरणार राहिल.
इतरही अनेक चांगल्या भुमीका त्यांच्या नावानी आहेत. भावपुर्ण श्रध्दांजली.
पैजारबुवा,
समयांत समयांत समयांत!
भावपूर्ण श्रध्दांजली.
बातमी पाहून विश्वासच बसत नाहीय. एका क्षणात संपलं सारं! दोघानाही भावपूर्ण श्रध्दांजली.
एक बहुगुणी अभिनेता हरपला. साला हे वर्ष मराठी लोकानसाठी वाईट आहे. कधी सम्प्तय अस झालय.
काय द्यायची प्रतिक्रीया...? :-( मती गूंग,आणी डोसकं बधीर झालय. :-(
दोन वर्षांच्या त्या बालकाचं सर्वात वाईट वाटतं आहे. त्याची आई या अपघातात वाचली आहे. अक्षय आणि त्याच्या लहान मुलाचा मृत्यू सहन करणं ही कल्पनेपलीकडली वेदनादायक परीक्षा आणि शिक्षा असणार आहे.
In reply to दोन वर्षांच्या त्या बालकाचं by गवि
वाईट बातमी. :(
९ वर्षापुर्वी याच टोलनाक्याजवळ माझ्या नातेवाईकाचा अपघाती म्रुत्यू झाला होता.
मन खिन्न झाले :( 

अपघात हा अपघात असतो .अचानक होणार्या घट्नेची एक परिणती. तो घडवून होत नाही नि टळता टळता काही वेळेस टळतोही काही वेळेस अटळ. माझ्या एका नातेवाईक महिलेचा मृत्यू याच हमरस्त्यावर घुसलेल्या एका गाईमुळे झाला. भक्ति बर्वे व आनंद अभ्यंकर यांच्या मृत्यूत साम्य आहे . अंधाराचे व या वेगवान रस्त्याचे. अभिनेत्यांच्या बदलत्या लाईफ स्टाईल मुळे वेळी अवेळी प्रवास त्यामुळे अशा सापळ्यात अडकायला होते. पहाटे रस्त्यावरून टू व्हीलरने जाणे हा असाच एक सापळा आहे. दोघेही चांगले कलाकार होते. त्यांच्या सग्यांच्या सोयर्यांच्या दु:खात सहभागी !
In reply to अपघात की ? by चौकटराजा
अगदी बातमी वाचून भक्ती बर्वेंच्या अपघाती मृत्यूची आठवण झाली. (विहंग नायकही असेच गेले.)
आनंद अभ्यंकरांच्या अभिनयाबद्दल काय बोलावे. 'मातीच्या चुली' मधे सुधीर जोशींच्या जाण्याने रिक्त झालेला रोल त्यांनी त्याच ताकदीने साकारलेला, आणि 'असंभव' मधे तर अप्रतीमच.
मृतात्म्यांना श्रद्धांजली!
अरे बापरे... :(
सकाळी सकाळी हे फारच वाईट कानावर आले...
परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो...क
एका गुणवान अभिनेत्याला श्रद्धांजली..!
भावपूर्ण श्रद्धांजली. हा द्रुतगती मार्ग अजून किती प्राणांचे टोल घेणार कोण जाणे.
बातमी मनाला चटका लाउन गेली. श्रद्धांजली अर्पण.
मृतात्मांना भावपुर्ण श्रध्दांजली...
तिघांच्याही आत्म्यास सद्गती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना...
सुन्न !
परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.. :(
परमेश्वर तिघांच्याही आत्म्यास सद्गती देवो.
२०१२ सरता सरता अजून काय काय बघावे लागणार आहे?...
जाता जाता देखिल हे वर्ष चटका लावून गेले...२१-१२-१२ ला पृथ्वीचा विनाश होणार अशी वंदता होती...बाळासाहेबांच्या जाण्याने व्यक्तीशः नुकसान झाल्याची भावना मनात दुणावली...आणि २०१२ या वर्षाचाच तिटकारा वाटू लागला....२१.१२ टळली म्हणून नि:श्वास टाकाव तर आनंद अभ्यंकर व अक्षय पेंडेसे या मराठी अभिनयक्षेत्रातील कलावंतांचे अपघाती निधन झाल्याची पहिल्या प्रहरी समजली.. नियती किती क्रुर असते याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला..क्षणभर मनात आले या देशात अश्या अनेक व्यक्ती आहेत ज्यांचा देशाला समाजाला काही उपयोग नाही .किंबहुना ज्यांच्या असण्याने आणि जगण्याने समाजाचे आणि पर्यायाने देशाचेच अपरिमीत नुकसान होतय पण देव अश्यांना जिवनदान देतोय .आणि आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर गारुड घालणारे व हृद्यावर अधिराज्य गाजवणार्या ,क्षणभर रसिकांच्या चेहर्यावर हसू पुलवणार्या आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यासारख्या गुणी व प्रतिभावान कलावंतावर मृत्युचा घाला घालतोय.....का असे करतो देव्?.....रसिकांना अक्षय आनंद देणारे हे कलावंत आज काळाच्या पडद्याआड गेलेत...त्यांना श्रद्धांजली वाहताना देवाकडे एकच मागण आहे "देवा आता पुरे कर"
सुन्न करणारी बातमी
देशात अश्या अनेक व्यक्ती आहेत ज्यांचा देशाला समाजाला काही उपयोग नाही .किंबहुना ज्यांच्या असण्याने आणि जगण्याने समाजाचे आणि पर्यायाने देशाचेच अपरिमीत नुकसान होतय पण देव अश्यांना जिवनदान देतोय .
देवा अब उठालेरे बाबा ईन लोगो को ...
अतिशय वाईट बातमी. ईश्वर मृतात्म्यांस शांती देवो!
अक्षय पेंडसे यांच्या पत्निच्या दु:खाची कल्पनाही करवत नाही. तिला या प्रसंगातून सावरण्यास॑ सामर्थ्य लाभो ही प्रार्थना.
श्रद्धांजली..!
वाईट बातमी.
अत्यंत वाईट बातमी.. श्रद्धांजली..
मनाला चट्का लावून गेला.
सुसंस्कृत गुणी माणसे काळाच्या पडद्याआड जातात तेंव्हा फार दु:ख होते. माझी सर्व कलाकारांना कळकळीची विनंती आहे की, रात्री प्रवास करु नका रे बाबांनो! तो काळ सध्या चांगल्या माणसांच्याच शोधात आहे.
:(
वाईट बातमी. मृतात्म्यास शांती लाभो ही प्रार्थना.
राम कृष्ण हरि !
सद्गती लाभो हीच प्रार्थना!
In reply to राम कृष्ण हरि ! by प्यारे१
थिस इज रिअली शॉकिन्ग!!!!!!.... खूपच दुर्दैवी मृत्यू.......
आनन्द अभ्यंकर माझ्या वडिलांचे जुने मित्र होते. पूर्वी ते पुण्यात रहायला असताना नाटक आणि एकांकिकांमुळे त्यांचं सपत्नीक आमच्या घरी येणं जाणं होतं...स्व. सुधीर जोशी यांच्या एका नाटकाच्या वर्कशॉपमध्ये त्यांनी आनन्द'जींना नोकरी सोडून नाटकासाठी पूर्ण वेळ देण्यासाठी सुचवले होते.. व ते त्यांनी ऐकलंही.... आणि मराठी रन्गभूमीला आणि चित्रपटसृष्टीला एक हरहुन्नरी कलाकार लाभला..
सध्या आनन्द'जींची मुलगी सानिका यु.एस.'ला असल्यामुळे तिला त्यांचे साधे अन्त्यदर्शनही घेता आले नाही... हे दुर्दैव!
अक्षय पेन्डसे..हे एक उदयोन्मुख कलाकार होते... प्रायोगिक रन्गभूमीवर त्यांचा वावर जास्त होता...
सध्या झी-वरच्या एका मालिकेत हे दोघेही काम करत असल्याने त्यांच्या अकाली मृत्यूचा त्रास जास्त होतोय....
अक्षय'जींच्या मुलाचादेखील - प्रत्युष'चा (वय १.५ वर्षे) यात दुर्दैवी मृत्यू झाला... त्याच्या चेहर्यावर साधा ओरखडाही उठला नव्हता.. त्याच्या शवाकडे पाहताना असे वाटत होते.. की किती शान्त झोपलाये..... खरच खूप असह्य होतं हे सगळं....
खरंच असं व्हायला नको होतं....
ईश्वर या तिघांच्याही आत्म्यास शान्ती देवो... ~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
खूप वाईट वाटले आणि अस्वस्थता आली या पलीकडे काहीच बोलायला सुचत नाही.
वर अनेकांना आली तशीच आज मला विहंग नायक, भक्ती बर्वे, जयराम हर्डीकर, शांता जोग, अरूण सर्नाईक आदींची आठवण होत आहे. पण असे दिवसागणिक अजून अनेक असतात ह्या कल्पनेने अस्वस्थता येत आहे.
मात्र असे अपघाती मृत्यू हे अत्यंत विरळ असायला हवेत असे वाटते. जर तो रोज कुणाच्या न कुणाच्या नशिबात येत असला तर अशा प्रसंगांना अपघात कसे म्हणावे हे समजत नाही. यातील अनेक अपघात, हे शिस्त, नियम, ते पाळण्याकडे कडक नजर ठेवणारे आवश्यक आहेत. त्याहूनही अधिक लोकशिक्षण - क्षा-बस-ट्रक डायवर पासून ते सध्याच्या उच्चभ्रू वाहन मालक-चालकांपर्यंत सातत्याने बिंबवणे गरजेचे आहे, जेणे करून असे वाईट वाटण्याचे प्रसंग समाजावर अथवा कुठल्याही कुटूंबावर येण्याची शक्यता रहाणार नाही.
श्रद्धांजली...
पहाटे पाच वाजता .. जाग आली तेव्हा मिपा उघडलं आणि ही भयानक
बातमी वाचली . काहिच सुचलं नाहि बोलायला .
खुपच विचित्र घटना .
अत्यंत वाईट बातमी.
हे ट्रकवाले,टेम्पोवाले एक्स्प्रेस हायवे वरून जाताना अजिबात लेन ची शिस्त पाळत नाहीत. अनेक वेळा मी स्वतः हे पाहिले आहे. याच रस्त्यावर मुंबई विमानतळावरून पुण्याला जाताना एका स्नेह्यांची कार टेम्पो धडकल्याने उलटली होती. पण सुदैवाने ते बचावले. अभ्यंकरांच्या बातमीत टेम्पो दुभाजक सोडून उलट दिशेने येणार्या कारवर धडकतो ह्याचाच अर्थ तो रस्त्याच्या उजव्या लेन मधुन जात असावा. शिवाय भरधाव असावा. हायवे वरील उजवी लेन ही जलद गती लेन आहे. त्यावरून जड वाहनांनी जाऊ नये असे फलक हायवे वर अनेक ठि़काणी लावलेले आहेत. पण ही शिस्त पाळली जात नाही आणि शिस्तीची अंमलबजावणी होते की नाही हे ही कोणी पहात नाही. आतापर्यंत कोट्यावधी टोल जमला असावा ..त्यातील काही भाग हायवे वरील सुरक्षा ह्या कारणासाठी वापरला जावा.
In reply to अत्यंत वाईट बातमी. by पक्या
सहमत :)
अतिशय वाईट बातमि मृतात्म्यास शांती लाभो.
ईश्वर मृतात्म्यांस शांती देवो!
श्रद्धांजलि. असे आणखी किती प्रसंग यायचे आहेत???
भावपूर्ण श्रध्दांजली
श्रद्धांजली.
वाचून जबर धक्का बसला
आधी फुलराणी आता अभ्यंकर अजून किती बळी जाणार देव जाणे.
भारतातील रस्त्यांवरच्या अपघात व मृत्यू ह्यात भारत जगात अव्वल आहे.
त्यांची काहीही चूक नसतांना त्यांना मरण आले.
माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे , वाहनाने रात्रीचा शक्यतो प्रवास टाळा .
हे जग सध्या धावपळीचे आहे पण गेलेला जीव परत येत नाही.
तेव्हा
होउ दे जरा सा उशीर
धागा फक्त श्रद्धांजलीचा आहे असंच नव्हे. यावर रोड सेफ्टीविषयी काळजी व्यक्त केली जात आहे हेही चांगलंच.
टीव्ही आणि इतर मीडियानेही हा प्रश्न उचलून धरला आहे. या दुर्दैवी घटनेच्या कारणाने काही सुरक्षाविषयक सुधारणा झाल्या तर झालेलं नुकसान भरुन आलं नाही तरी पुढचं नुकसान काही प्रमाणात तरी कमी होईल.
शेवटी अॅक्सिडेंट हा अॅक्सिडेंट असतो.. अपघात हा अपघातानेच होतो हेही लक्षात ठेवलं पाहिजे.
या दृष्टीने गेले काही दिवस टीव्ही पाहताना / पेपर वाचताना एकूणच सर्वजण होलसेलमधे या एक्सप्रेस वे वर असलेल्या नसलेल्या सर्वच त्रुटींना शिव्या घालत होते. भावनातिरेकातून हे होत असावं. मी स्वतः महिन्यातून दोन वेळा सरासरी या रस्त्याने ड्राईव्ह करुन जातो -येतो. काही नोंदी करण्याची इच्छा आहे:
- अनेक टीकाकारांनी या मार्गावर सूचनांचे बोर्ड मोडलेले असल्याची तक्रार केली आहे. वाहतुकीच्या नियमांच्या सूचना योग्य प्रकारे दिल्या जात नाहीत असा जनरल आक्षेप आहे. मी जे पाहतो त्याप्रमाणे अत्यंत उत्तम आणि रीडेबल अशा मोठ्या बोर्डसवर दर्शनी जागी आणि वारंवार "लेनची शिस्त पाळणे" (हल्ली लावलेली फुलसाईझ सापाची होर्डिंग) "अतिवेगामुळे अपघात होतात" (पूर्वीपासूनचे प्लेन रेडियम बोर्ड आणि नवीन फुलसाईझ होर्डिंग, ज्यात स्पीडोमीटर आणि वेगाच्या बाजूला रक्ताने माखलेले) शिवाय, "द्रुतगती मार्गावर थांबू नका" हे बोर्ड अक्षरशः कंटाळा येईल इतक्या वेळा रिपीट होत असतात. त्यामुळे सूचना नाही हा जनरल चर्चेतला पॉईंट पटत नाही.
रात्रीच्या वेळी सर्व वळणांवर (तीव्र वळणे क्वचितच असली तरी) अतिशय योग्य असे रिफ्लेक्टर्स आणि लक्षवेधी आकृत्या आहेत. वळणावर अंदाज न येण्याने ताबा सुटला असं म्हणण्यास खरोखर जागा नाही.
अवजड वाहनांनी डाव्या बाजूने जावे.. हेही असंख्य ठिकाणी लिहीलेलं आहे.
पोलीसांची गस्त / गाडी इथे नसते असाही आरोप झाला. मी नक्की सांगू शकतो की पोलीसांचा पुरेसा आणि सततचा वावर इथे असतो. एक ना एक गाडी दर थोड्या वेळाने नजरेस पडतेच पडते.
रस्त्याची अवस्थाही अजिबात खराब नाही. काही बोगद्यांमधे लाईट एकदम कमी पडतो आणि अंधारी येते, पण बोगद्यात फारसे अपघात झालेले नाहीत. तरीही हा दोष सुधारता येईल.
या दुर्दैवी घटनांची मुख्य तीन कारणं आहेत:
-वेग
-वेग
आणि
-वेग
अपघात होण्याचंच नव्हे तर ते एकदम प्राणघातकच ठरण्यामागे हा वेग आहे. एकदा का वेग डोक्यावर स्वार झाला की अचानक कोणतंही छोटंसं कारणही आउट ऑफ कंट्रोल व्हायला पुरेसं ठरतं. मधे म्हैस आली तरी वेग आवरता येत नाही. आपल्या गाडीचा टायर पंक्चर झाला, किंवा समोरचं वाहन अचानक थांबलं तर आपल्या हाती कंट्रोल करण्याचा वेळच शिल्लक नसतो. मग थेट धडक किंवा त्यापासून वाचण्यासाठी डिव्हायडर जंप.. किंवा बाजूला जाऊन कुठेतरी ठोकर, हे ठरलेलंच.
माझ्याकडे अचूक विदा नाही, पण या महामार्गावर प्रचंड संख्येने अपघात होतात असं एक मत सर्वत्र आहे. येताजाता दिसणारे अपघात पाहता ते काहीसं खरंही आहे. तरीही जी काही तुटपुंजी माहिती समोर ऑनलाईन आहे त्यावरुन सुद्धा असं दिसतं की हा हायवे रोज ३०,००० पॅसेंजर कार इक्विव्हॅलंट इतकी वाहनं हँडल करतो.
गेल्या दहा वर्षांत १७५८ अपघात आणि ४०० मृत्यू या मार्गावर झाले आहेत. अर्थातच आपल्याला एकही अपघात आणि एकही मृत्यू कधीच नकोय. तरीही शेवटी अपघात हे होतच असतात हे कटु सत्य मान्य करुन असं पाहता येईल की:
दहा वर्षांत साधारण ३०,००० गुणिले ३० गुणिले १२ गुणिले १०= १०८०००००० इतकी वाहनं या मार्गावरुन प्रवास करतात. त्यामधे १७५८ अपघात हे ०.००१६ % इतके आहेत. म्हणजेच या रस्त्याने १७५८ (अत्यंत दुर्दैवी, दु:खद) अपघातांच्या आजुबाजूला १०७९९८२४२ इतक्या वाहनांना सुखरुप आपल्या अंगाखांद्यावरुन पोचवलं आहे.
४०० मृत्यू.. हे एका अपघातास एकच असं प्रमाण जरी मानलं तरी या रस्त्यावर बळी जाण्याचं प्रमाण ०.०००३ % इतकं आहे.
मनापासून विनंती आहे की मृत्यूंना आकडेवारीने दुर्लक्षित करण्याचा हा प्रयत्न नसून, या रस्त्याची परिस्थिती जितकी प्रोजेक्ट होते आहे तितकी वाईट नसावी आणि येताजाता ऑथॉरिटीजना झोडपण्यापूर्वी ही बाजूही पहावी या शक्यतेकडे निर्देश करण्याचा केवळ उद्देश आहे. मी स्वतः यापैकी कोणत्याही ऑथोरिटीमधे नाही. मीही या रस्त्याचा केवळ सामान्य वापरकर्ता वाहनचालक आहे आणि इट कॅन हॅपन टू मी टू.. याची पूर्ण जाणीव असूनही या बाजूकडे लक्ष वेधत आहे.
एखाद्या वाहनाचा / मार्गाचा धोकादायकपणा दाखवताना एकूण प्रवासांची संख्या आणि अपघाताच्या केसेसची संख्या हे
प्रसारमाध्यमांनी दोन्ही एकत्र समोर मांडावं असं वाटतं.
विमान अपघातांविषयी तर अशा एका बाजूने दिलेल्या माहितीच्या पद्धतीने इतकी भीती बसेल की निम्म्याहून अधिक प्रवासी विमानप्रवास बंद करतील.
In reply to धागा फक्त श्रद्धांजलीचा आहे by गवि
गवि,
तुम्ही म्हणताय ते बरोबरच आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की द्रुतगतीवर बर्याच ठिकाणी दुभाजक नाही आहेत.
दोन्ही गाड्या उजव्या लेन मधुन जात आहेत ८० च्या स्पीड ने, एका ड्रायवरला काही कारणास्तव गाडी कंट्रोल नाही झाली आणि तो अजुन उजवीकडे जाउन समोरच्या गाडीला धडकु शकतो. आणि दरवेळी गाडीचा स्पीड ८० असेलच अस नाही.
बर्याच वेळा तो जास्तच असतो.
रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत तर घाटात जाऊच नये. कारण तीनही लेन मधे ट्रक. अक्षरशः रिकामीजागा शोधत दोन ट्रक मधुन गाडी काढावी लागते. परत आपल्याकडे ट्रकला टेललॅप असेल तर दंड होतो. त्यामुळे तोपण एक त्रास आहेच.
In reply to गवि, by Dhananjay Borgaonkar
अगदी अगदी.. दोष निश्चित आहेत. दुभाजक अनेक ठिकाणी विरळ आहे हेही खरं.
आणि स्पीड म्हणाल तर ८० ही तिथे लिहीलेली अपर लिमिट ही प्रत्यक्षात लोअर लिमिट मानून लोक कार चालवतात. ८० पेक्षा कमी वेगाने जाणं अलाउड नाही अशी खरोखर सिरियसली समजूत असलेले लोकही भेटलेले आहेत.
१०० हा स्पीड या हायवेला योग्य असावा असं वाटतं. ८० / ६० हे स्पीडदेखील कधीकधी धोकादायक वाटतात, कारण आपल्या मागून जणू चिकटून सर्वच गाड्या सणसणत पुढे जातात तेव्हा धसकाच बसतो.
केवळ दृश्य फरकावरुन माझा असा अंदाज आहे की १२० च्या खाली फारच थोड्या कार्स चालतात.
हा वेग कसा आटोक्यात आणता येईल इतका प्रॉब्लेम जरी सोडवला तरी बाकीच्या गोष्टी तितक्या धोकादायक नाहीत.
माझ्या मते सर्वात उजवीकडची लेन ही फक्त ओव्हरटेक करुन पुन्हा आपल्या मूळ लेनला जॉईन होण्यासाठी असते / असावी. त्या लेनमधे पूर्णवेळ ड्राईव्ह करणं चुकीचं आणि घातक आहे.
In reply to धागा फक्त श्रद्धांजलीचा आहे by गवि
फारच मुद्देसुद लिहिता तुम्ही गवि.
श्रद्धांजली.
In reply to धागा फक्त श्रद्धांजलीचा आहे by गवि
शेवटी अॅक्सिडेंट हा अॅक्सिडेंट असतो.. अपघात हा अपघातानेच होतो हेही लक्षात ठेवलं पाहिजे.हे कायम म्हणले जाते आणि त्यात तथ्य असते हे देखील मान्यच आहे. मला स्वता:ला पुणे-मुंबई रस्त्याचा (क्वालीटी वगैरेचा) हा प्रश्न वाटत नाही तर एकंदरीतच वाहनचालकांच्या आणि प्रवाशांच्या देखील शिस्तीचा प्रश्न वाटतो. सरकारने हळू हळू का होईना अनेक बदल केलेले आहेत असे वाटते. याचा अर्थ सगळे झाले आहे असे नाही. पण पोलीस मदत यंत्रणा, फोन नंबर्स, सर्वत्र सावधनतेचे इशारे वगैरे भरपूर् झालेले दिसते. आधी म्हणल्याप्रमाणे, रस्त्याची क्वालीटी देखील बरीच बरी असते (बहुतांशी चांगली देखील म्हणता येईल), दरडी कोसळू नयेत म्हणून जाळ्या लावलेल्या दिसतात, बोगद्यात दिवे वगैरे पण कायम चालू असतात... पण वाहनचालक गाडी आणि टायरचा अंदाज घेऊन गाडी हाकतो का? दारू न पिता गाडी चालवली जाते का? (हे विशेष करून ट्रक ड्रायवर्स आणि बडे बापके बेटे यांना लागू आहे असे वाटते) लेनची शिस्त पाळणे, लेन बदलताना योग्य सिन्गल्स दाखवून आणि अंतर ठेवून मगच बदलणे वगैरे होत असते का? असे बरेच प्रश्न पडतात. त्याबरोबरच इतर अनेक सेफ्टी इन्स्ट्रक्शन्स असतात ज्या पाळल्या पाहीजेत असे वाटते. एक कायम मजेदार अनुभव आलेला आहे - मुंबईत गाडीत बसलो की आपोआप सवयीनेच सीटबेल्ट लावतो, ड्रायवर काही म्हणत नाही. मात्र एकदा का गाडी मुंबईच्या बाहेर आली की स्वतःच्या अंगावरचा बेल्ट काढत आपल्याला पण सांगितले जाते की साहेब आता बेल्टची गरज नाही, काढून टाका! जणू काही तो एक प्रोव्हिलेजच आहे...
__/\__