उंदीर मांजराचा खाऊ
उंदीर मांजराचा खाऊ
एकदा थंडी वाजते म्हणून
एका माऊने केली गाऊ
तेथला उंदीर मनात म्हणाला
आता गुपचूप खाऊ खाऊ
खाऊ होता माऊसमोर
धीर केला उंदराने
हळूच गेला चालत चालत
मांजरीकडे पाहीले त्याने
खाऊचा वास त्याने घेतला
सुटले पाणी तोंडाला
खाऊ न द्यायचा कोणाला
विचार त्याच्या मनातला
डोळे मिटून सताड पडली
अंग चोरून मनी
मिटक्या मारीत खायचा खाऊ
उंदराने स्वप्न पाहीले मनी
होती निसरडी घराची फरशी
तीवरून त्याचा पाय सरकला
आवाजाने माऊ जागी झाली
आयता खाऊ तिला मिळाला
- पाभे
आपल्याला राष्ट्रीय चारित्र्य आहे का ?
हि १९९९ च्या मी महिन्यातील गोष्ट आहे.मी विशाखापटणमच्या नौदलाच्या कल्याणी या रुग्णालयात काम करीत होतो. कारगिलचे युद्ध ऐन जोरात होते. त्यावेळेला काश्मीरच्या लष्करी रुग्णालयात युद्धात जखमी झालेले जवान मोठ्या प्रमाणात उपचारासाठी येत होते त्यामुळे ती रुग्णालये(श्रीनगर, उधमपूर आणि जम्मू येथील) भरून गेली होती.त्यातून त्या जखमी रुग्णांचे नातेवाईक तेथे येऊ लागले होते. या सर्व गर्दीमुळे तेथील व्यवस्थेवर ताण पडू लागला होता. म्हणून आता नंतर येणाऱ्या रुग्णांवर जलदगतीने उपचार करण्यासाठी वैद्यकीय प्रशासनाने एक निर्णय घेतला कि जे जे जवान प्रवास करू शकणार होते आणि ज्यांची जायची तयारी होती.
श्रामो: मनस्वी जगणारा अवलिया!
अत्यंत वाइट बातमी : आमचे काही वर्षांपासूनचे निकटचे मित्र श्रावण मोडक हे आता या जगात राहिलेले नाही.
अगदी पाच मिनिटांपूर्वी धुळ्याहून निखिल सूर्यवंशी (सकाळ) यांचा एसएमएस आला. फक्त चारच शब्द; ‘श्रावण मोडक पास्ड अवे’ मी हादरलोच. अतिशय दु:खद संदेश. किती वाइट बातमी. त्यानंतर पुण्याहून दीपक मुणोतनेही ही बातमी कळविली. अगदी चार दिवसांपूर्वीच माझी निखिलशी भेट झाली होती, तेव्हाही श्रावण हाच चर्चेचा केंद्रबिंदू होता.
काही कामानिमित्त घाटकोपरला असताना काल सायंकाळीच श्रावणला हृद्यविकाराचा झटका आला. आज सकाळी पुन्हा दुसरा झटका आला. मधुमेहाचा त्रास असलेल्या श्रावणला सलग असे हे दोन झटके पचविता आले नाहीत.
श्रावण मोडक - काही मोडक्यातोडक्या नोंदी
श्रावणची पहिली ओळख झाली ती आंतरजालावरूनच, आणि तीही दुरूनच, म्हणजे एखाद्या धाग्यात आलेल्या प्रतिसादापुरती; खरडी, व्यनिंतून वगैरे नाही. आंतरजालावरच्या वावरावरून एखाद्या व्यक्तीविषयी फारसे आडाखे बांधायला मला अावडत नाही. कारण एखाद्याचं लिखाण आवडलं म्हणून व्यक्तीशी जुळेल असं नाही; आणि लिखाण खास वाटलं नाही म्हणून व्यक्तीशी संवाद होणार नाही असंही नाही. तरीही आडाखे बांधले जातातच. त्यात आंतरजालावर पुष्कळ तथाकथित लेखकांची उगीचच आणि गरजेपेक्षा फार जास्त स्तुती केली जाते असाही माझा अनुभव होता.
अमानवीय-काही उत्तरे
काही उत्तरे या भागात मागील भाग http://www.misalpav.com/node/24838 तील काही प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न. यातुन भुत आणि मानवात स्नेह वाढुन एक दिवस हा स्नेह भारत-पाकिस्तान मैत्रीलाही मागे टाकेल याची खात्रीच आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------
भुतांची सायकॉलॉजी थोड्याफार प्रमाणात माणसांसारखीच आहे. उदा. आपल्यात कोणी गल्ली चुकलं की लोक स्वत:हुन म्हणतील, "काय ब्वा, हिकडं कसं काय?" तसच भुतांमध्येपण आहे. आपण त्यांच्या एरीयात गेलो की आलेच ते आपली चौकशी करायला.
श्रावण मोडक स्मृती : एकत्र जमुया!
(हे असलं कधी श्रावणच्या संदर्भात लिहीन याची कल्पनाही केली नव्हती! :( )
***
श्रावण गेला. सत्य बलवान असते आणि ते स्वीकारणे भागच असते. गेल्या काही वर्षात तो सगळ्यांनाच माहित झाला. पण तो त्या ओळखीच्याही बाहेर खूप होता. किंबहुना, त्याच्यासारखा हरहुन्नरी, चतुरस्त्र, लोकसंग्रह असणारा माणूस असा कोणत्याही एका पैलूत सामावू शकत नाही. सामाजिक कार्यकर्ता, विचारवंत, लेखक, पत्रकार, अभ्यासक, विद्यार्थी, कलाप्रेमी, साहित्यप्रेमी, माणूस, मित्र... हे सगळे आपल्याला त्याच्यात दिसत होतेच.
या आपल्या मित्राचं हे बहुपेडी व्यक्तित्व साजरं करण्यासाठी आपण सगळे मिळून एक छोटासा कार्यक्रम करत आहोत.
श्रामो
माझ्या इनबॉक्स मधले वरुन तिसरे इमेल / फेसबुक नोटीफिकेशन -Shravan Modak mentioned you on Facebook
श्रामो , आपल्या पैकी बरेच जण त्यांना श्रामो याच नावाने संबोधित करतो.
सरकारी धोरणे, आदिवासी लोकांचे प्रश्न, आंदोलने, डावी विचारसरणी असे धाग विषय आले की लगेच मी श्रामो यांचा प्रतिसाद वाचायला/शोधायला उत्सुक. त्यांच्या डाव्या बाजूला झुकलेल्या मतांमुळे किंवा माझ्या मनात खटकलेल्या / नकोश्या वाटणाऱ्या विचारसरणीमुळे थोडा बहुत मी कायमच श्रामो यांच्या पेक्षा जरा वेगळ्या मताचा होतोच पण श्रामो काय म्हणतायत, त्यांची माहिती काय याबाबत कुतूहल कायम असायचे.
दोन वेळेला ग्रुप/ कट्या मधे त्यांना भेटायचा योग आला.
मिसळपाव