Skip to main content

मिपाकरांच्या गाठी भेटी

लेखक रुमानी यांनी रविवार, 23/12/2012 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो , बरयाच दिवसापासून आपणाशी संवाद साधण्याची सुप्त इच्छा होतिच. पण काही धाडस झाले नाही .पण झाले असेकी आठ दिवसा पूर्वी काही मिपाकर औरंगाबाद येथे येणार असल्याचे आपले मिपाकर मित्र प्रा .डॉ दिलीप बिरुटे ह्यांच्या कडून समजले . तेव्हाच ठरवले कि काही झाले तरी त्या सर्वांची भेट घ्यायची.
2012-12-17-232_1
श्रुती कुलकर्णी,किसन शिंदे, वल्ली, धनाजीराव आणि प्राडॉ.
पण तरी त्यांच नियोजन व माझी सुट्टी ह्याचा मेळ काही बसवता आला नाही.तरी हि मनात ठाम निश्चय केला कि काही झाले तरी भेट तर घ्याचीच. डॉ बिरुटे मात्र दोन दिवस अंजीठा, वेरूळला त्यांच्या सोबतच होते .तसे मी त्यांना फोन करुन कळविले त्याच परतीचा प्रवास चालू झाला तेव्हा औरंगाबाद सोडताना त्यांची भेट घेणे मला शक्य झाले त्त्यांची ओळख करून घेतानां ID मागचा चेहर तसेच एक व्यक्तिम्त्व म्हणून कसा आहे हे कळाले, ती सर्व मिपाकर मंडळी म्हणजे आपले किसान शिंदे ,वल्ली ,धनाजीराव ही होय ,ह्या सर्वाना भेटून अतिशय आनंद वाटला फारसा वेळ देऊ शकले नाही. परंतु तरीही ह्या आभासी जगताचे कुतूहल होतेच आपण सर्वांच्या भेटी मुले मला काही माणसे न बघताही न भेटताही कधी मैत्रीचे संबंद प्रस्थपित होऊ शकतात ह्याची नव्यानेच जाणीव झाली . मिपा मुळे माणुस माणसाशी जोडल्या जातोय तेहि एका वैचारीक पातळीवर ह्याचेही नवल वाटले . तसे मी आपल्या सर्व मिपाकरांच्या लेखनाचा तसेच मुखत्वे करून प्रतीसादाचाही आनंद सातात्याने गेले वर्षभरापासून घेत आहे . तसे वर्ष भरात एक वाचक म्हणून चागंलीच रमले .बरेच काही मिळाले अगदी पाकृ. पासून ते एखाद्या गहन विचारा परेंत . मिपाकारांचा स्नेह असाच सर्वांशीच व्रुधिगत होत राहो . आज आपल्या सर्वांच्या भेटीमुलळे मी बोलती झाले त्यासाठी ध्यान्यावाद .मिपाच हा प्रवास असाच चालू राहो हि एका वाचक मिपाकाराची सदिइच्छा.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5463
प्रतिक्रिया 35

प्रतिक्रिया

नीट सविस्तर लिहा की... पाहिजे तर या नविन मित्रांची मदत घ्या! ;) बाकी धनाजीराव अजून आहेत याचा आनंद काय वर्णावा! ;)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

धन्या काल फेसबुकवर दंगा करत होता, त्याला पण आला तर मिपावर स्वागत म्हणावं लागेल. श्रुती, स्वागत. पहिल्यांदाच मराठी टाइप करताना कंटाळा येतो हे खरंच, लवकर जास्त टायपायला लागा बघू!

In reply to by बिपिन कार्यकर्ते

>>> धनाजीराव अजून आहेत याचा आनंद काय वर्णावा ! भेट झाल्यावर पहिला वहिला प्रश्न असाच होता. मस्त माणूस आहे. वाचन दांडगं आहे, मतं रोखठोक आहेत. मस्त गप्पा झाल्या. [तसा मला भेटाबिटायचा लै कंटाळा. पण, किसन,वल्ली,धनाजी धनाजीची मस्त नवी कोरी गाडी, आणि धनाजीच्या भावालाही भेटून मात्र आनंद झाला.] -दिलीप बिरुटे

पहिल्यांदा लिहीलंय अगदीच थोडकं लिहीलंय. असो फोटोमुळे काही बात बनलीय. मी मिपावर नवीन आहे, मिपाकरांच्या गाठभेटीचं मलाही अप्रूप आहे. भावना मांडल्याबद्दल धन्यवाद :) अभिनंदन.

In reply to by पिंगू

@त्या फोटुमध्ये मी पण असतो.. पण अलहिदा>>> +1 संताजी धनाजीच्या मधे अगोबा फसल्यासारखा वाट्टोय. ;-)

In reply to by ५० फक्त

>>> धन्या बिचारा डुआयडिने लॉगइन होताना रेडहॅड पकडल्यासारखा दिसतोय..... खरं का काय ? :) तरी मला वाटलंच मिपाचं व्यसन लागल्यावर माणूस असा कसा बाहेर राहू शकतो ? ;) -दिलीप बिरुटे

सर्वाना मनापसुन ध्यन्यवाद ! @पिंगू आपन आला असतात तर आपली हि भेट झालि असति. @पहिल्यांदाच मराठी टाइप करताना कंटाळा येतो हे खरंच, .........अगदि खार्र्र्र्र्र्र्र्र्र...!

पहिलं वाहिलं लेखन चांगलं जमलं आहे, नियमित लिहित राव्हा. पुलेशु. लेखनातली किरकोळ दुरुस्ती अशी की मी अजिंठ्याला गेलो नव्हतो. -दिलीप बिरुटे

In reply to by लीलाधर

तो शब्दप्रयोग "छान छान" असा नसून चान चान असा आहे. बादवे, सरांनी मस्त सरबराई केली औरंगाबादला. पाहूणचार करावा तर बिरुटे सरांनी. धन्यवाद सर, आमची आमची वेरुळ अजिंठा ट्रीप अविस्मरणीय करण्यासाठी. श्रुतीतै, तुम्हालाही भेटून आनंद झाला.

In reply to by धन्या

बादवे, सरांनी मस्त सरबराई केली औरंगाबादला. पाहूणचार करावा तर बिरुटे सरांनी. धन्यवाद सर, आमची आमची वेरुळ अजिंठा ट्रीप अविस्मरणीय करण्यासाठी.
+१००० त्याचबरोबर श्रुतीतैंना भेटूनही आनंद झाला.

चार मिपाकर भेटले तुम्हाला, त्यातले ३ संपादक. सुख सुख म्हणतात ते वेगळे काय असते? पहिल्या फटक्यात आतल्या गोटातच गेलात की हो ;-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

विमे ह्यापुढे त्याच्या लेखनावर प्रतिसाद देतांना ह्या गोष्टींची जाणीव ठेवा तुमचा हितचिंतक निमुपोज

सुरवातीला लेखनाचा कंटाळा येतो हे मान्य पण बिनधास्त लिहायचं अशुद्ध शुद्ध चा सुरवातीला फारसा विचार करू नका थोड्याच दिवसात मिपाकरांचे प्रतिसाद डॉ चा सल्ला ह्याने शुद्ध लेखन बर्‍यापैकी सुधारते.

In reply to by निनाद मुक्काम …

>>> थोड्याच दिवसात मिपाकरांचे प्रतिसाद डॉ चा सल्ला ह्याने शुद्ध लेखन बर्‍यापैकी सुधारते. या वाक्यातले डॉ. म्हणजे मी असेल तर माझे दोन शब्द- सोप्या पद्धतीने मराठी लिहिता यावं आणि अधिकाधिक शुद्ध शब्द लिहिण्यासाठी मदत व्हावी म्हणून मराठी लोकांसाठी अव्याहतपणे आपलं कामकाज सांभाळून फायरफॉक्ससाठी मराठी डिक्शनरी चे अ‍ॅडवन देणारे श्री शंतनु ओक यांचे आभार मानले पाहिजे. आत्ताच त्यांनी मराठी ऑफलाइन शुद्ध शब्द लिहिण्यासाठी अ‍ॅटो करेक्टची सुविधा देणारे सॉफ्टवेअर तयार केले आहे. सोप्या पद्धतीने मराठीत लेखन [दुवा मायबोलीवर जातो. दुवा वगळला तरी हरकत नाही] मराठी माणसाला करता यावे हाच त्यांचा उद्देश. मला त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या मेहनतीबद्दल नेहमीच आदर वाटतो, वाटला आहे. बघा त्यांनी तयार केलेलं सॉफ्टवेअर फूकट आहे, पटलं तर वापरावं आणि फीडबॅक द्यावा, इतकेच. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आभासी जगतात नव्याने लिहायला लागलेल्या मिपाकारच्या शुद्धलेखनाचे अनेक जण वाभाडे काढतात पण त्याचवेळी डॉ सारखी माणसे देवदुता सारखी मदतीला धावून येतात.

छान! डॉ. खुन्नस दिल्यासारखे पहात आहेत का ;)

In reply to by भिकापाटील

डॉ. आणि खुन्नसचा काही म्हणजे काही संबंध नाही. सरांच्या ईतकी दिलखुलास माणसं खुप कमी असतात. सर खुन्नस देत आहेत असं म्हणणं म्हणजे चहासुद्धा न पिणार्‍या व्यक्तीला पावशेर मारुन आला काय असं विचारण्यासारखं आहे. :) बारा साडेबाराची वेळ होती आणि आम्हा सर्वांचे चेहरे पूर्व दिशेला होते. कदाचित सूर्यप्रकाशामुळे चेहरा आक्रसला असेल.

In reply to by पक पक पक

कुणाला कशाचं तर ईयेंटी स्पेशालिस्टला घशाचं. श्रुतीतैंनी पहिला वहीला धागा काढला तर्त्याचं कौतुक र्‍हैलं बाजूला. भिका पाटलांना डॉ. खुन्नस का देत आहेत हा प्रश्न पडला आहे तर पक पक पक ला धनाजीची तव्येत सुधारल्यासारखी वाटत आहे.:)

आखाती वास्तव्यामुळे मिपाकरांच्या भेटीचे योग फार कमीच येतात. हे योग अधिक यावेत असे मनापासून वाटते. पुढच्या भारतभेटीत अगदी ठरवून जंगी कट्टा करूयात.

In reply to by प्रभाकर पेठकर

हे योग अधिक यावेत असे मनापासून वाटते. पुढच्या भारतभेटीत अगदी ठरवून जंगी कट्टा करूयात.
कधी येताय?