मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

देव निवृत्त झाला !

श्रीगुरुजी · · क्रिडा जगत
सचिनने आज एकदिवसीय सामन्यातून निवृत्ती जाहीर केली आणि एकदम उदास वाटायला लागले. क्रिकेटचा बादशहा या प्रकारातून आज अधिकृतरित्या बाहेर पडला. त्याची कसोटी सामन्यातील निव्रुत्तीही दूर नाही. पुढील १-२ महिन्यांतच त्या प्रकारातूनही तो निवृत्त होईल. भारतीय संघाला त्याची उणीव अनेक वर्षे भासेल. सचिनच्या ह्या महान एकदिवसीय कारकीर्दीवर हा एक दृष्टीक्षेप - प्रथम खेळलेला एक दिवसीय सामना - विरूद्ध पाकिस्तान १८ डिसेंबर १९८९, धावा - शून्य, भारत पराभूत शेवटचा खेळलेला एक दिवसीय सामना - विरूद्ध पाकिस्तान १२ मार्च २०१२, धावा - ५२, भारत - विजयी एकूण खेळलेले एकदिवसीय सामने - ४६३ फलंदाजी - डाव - ४५२, नाबाद - ४१, धावा - १८४२६, सर्वोच्च - नाबाद २००, सरासरी - ४४.८३, एकूण खेळलेले चेंडू - २१३६७, धावगती (प्रति १०० चेंडू) - ८६.२३, शतके - ४९, अर्धशतके - ९६, चौकार - २०१६, षटकार - १९५, झेल - १४० गोलंदाजी - एकूण टाकलेले चेंडू - ८०५४, एकूण दिलेल्या धावा - ६८५०, प्रति षटक दिलेल्या धावा - ५.१० एकूण बळी - १५४, सरासरी (प्रत्येक बळीसाठी) - ४४.४८, प्रत्येक बळीसाठी टाकलेले चेंडू - ५२.२ सर्वोच्च - ३२ धावात ५ बळी ५ किंवा अधिक बळी घेतलेले सामने - २ ४ बळी घेतलेले सामने - ४ तसं पाहिलं तर एप्रिल २०११ मध्ये संपलेल्या विश्वचषकानंतर गेल्या २० महिन्यात तो फक्त १० एकदिवसीय सामने खेळला. त्यात त्याने २ (भारत पराभूत), ४८ (भारत विजयी), १५ (सामना बरोबरीत), ३ (भारत पराभूत), २२ (भारत पराभूत), १४ (भारत पराभूत), ३९ (भारत विजयी), ६ (भारत विजयी), ११४ (भारत पराभूत) व ५२ (भारत विजयी) अशा धावा केल्या होत्या. शेवटच्या १० सामन्यात त्याने एक अर्धशतक व एक शतक केले. त्यापैकी भारताने ४ सामने जिंकले, १ बरोबरीत सुटला व ५ सामन्यात पराभव झाला. त्याने कारकीर्दीत एकूण १०० आंतरराष्ट्रीय शतके केली आहेत. त्यापैकी ५५ सामने भारत जिंकला आहे. तो एकूण ६ विश्वचषक स्पर्धा खेळला. त्यापैकी १९९६, २००३ व २०११ मधल्या विश्वचषक स्पर्धेत त्याने भरपूर धावा करून भारताच्या अनेक विजयात हातभार लावला होता. आज माझ्या दृष्टीने दु:खाचा दिवस आहे. मी त्याचा भक्त आहे. क्रिकेटमधला हा खराखुरा सभ्य खेळाडू आणि हा क्रिकेटमधला परमेश्वर काही काळातच क्रिकेटच्या मैदानावर दिसणार नाही, ही कल्पनाच करवत नाही.

वाचन 5637 प्रतिक्रिया 0