Skip to main content

श्रावण मोडक

लेखक चिंतातुर जंतू यांनी गुरुवार, 30/05/2013 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
कळवण्यास अत्यंत दु:ख होते आहे की मराठी संकेतस्थळांवरील जुने आणि लोकप्रिय लेखक व सामाजिक कार्यकर्ते श्री. श्रावण मोडक यांचे आज दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. येथील अनेक सदस्यांसाठी ते एखाद्या कुटुंबियाप्रमाणे होते. त्यांना श्रद्धांजली.

कमिशनर- जेफ्री आर्चर (पुर्वार्ध)

लेखक लाल टोपी यांनी गुरुवार, 30/05/2013 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
जेफ्री आर्चरच्या 'कमिशनर' कथेचा स्वैर अनुवाद.... "कशासाठी तो माझ्या भेटीची वेळ मागतो आहे?" कमिशनर साहेबांनी विचारले. "तो म्हणत होता काही खासगी काम आहे" "त्याला तुरुंगाबाहेर येऊन किती दिवस झाले?" कमिशनर साहेबांनी पुन्हा विचारले. "दीड महिन्यांपूर्वीच तुरुंगातून सुटला आहे." राज मलिक ची फाईल पाहत सचिवाने उत्तर दिले. कमिशनर नरेश कुमार आपल्या खुर्ची वरून उठले आणि काहीतरी विचार करीत आपल्या खोलीत येरझारा घालू लागले. एखाद्या गहन विचारात असले म्हणजे त्यांच्या कडून ही कृती अगदी अभावितपणे होत असे.

ग्रीन टी

लेखक स्मिता चौगुले यांनी गुरुवार, 30/05/2013 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
काही महिन्यापासून वाढत्या वजनाने आणि त्याच्या दुष्परिणामाने(गुढगेदुखी) त्रस्त झाल्यावर वजन कमी करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत .

डोंबिवली कट्टा वृत्तांत..

लेखक नानबा यांनी गुरुवार, 30/05/2013 10:05 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी डोंबिवलीत कट्टा करायचा असं मुक्त विहारींनी ठरवलं, आणि कट्टा होणार की नाही इथपासून तुम्ही डोंबिवलीकरांनी राजकारण केलंत पर्यंतच्या ब-याच चर्चा मिपावर घडून आल्या. पण काहीही झालं तरी कट्टा करायचाच असा ठाम निर्धारच मु.वि. नी केलेला असल्यामुळे अखेरीस ठरलेल्या दिवशी, रविवार २६ मे, रोजी, नंदी पॅलेस मध्ये कट्टयाचा बेत ठरला. कट्ट्याची उपस्थिती किती हा मुद्दा गौण असल्याने जितके आले ते कट्टेकरी. आलो तर येईन पासून रात्री उशीर होईल पण नक्की येईन असं सांगून टांग देणारे वगळले, तरी ४ जण नक्की येणार हे कळलं. मुलूंडच्या डॉ.

मेडीक्लेम / इन्श्यूरन्स - एक अनुभव.

लेखक मोदक यांनी गुरुवार, 30/05/2013 00:50 या दिवशी प्रकाशित केले.
राम्राम मंडळी.. एक प्रामाणिक शंका आहे - शक्य झाल्यास उत्तर शोधण्यास मदत करावी. ************** नुकतेच घरातले एक आजारपण पार पडले. आठवडाभर हॉस्पीटलमध्ये अ‍ॅडमीट व एक अत्यावश्यक ऑपरेशन असे आजारपणाचे स्वरूप होते.

पंचम पुरीवाला, ऑप.जी.पी.ओ, मुं.४००००१

लेखक १००मित्र यांनी बुधवार, 29/05/2013 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
माहितिये ? पंचम पुरीवाला ? इथली पुरी भाजी खास भय्या स्टाइल, क्रमांक १ ची, वादच नाही. माझे एक नातेवाईक- जे आर.बी.आय. मधे असतात, ते तर म्हणतात : पु~या साजूक तुपातल्या असतात म्हणे. असो.माझे वडील आम्हाला पूर्वी इथे कायम घेऊन जायचे. मुळात मुलुंडसारख्या उपनगरातून त्या वेळी ( साधारण ७९-८० चा काळ असेल तो) VT ला जाणं, हेच मुळी कस्सलं भार्री वाटायचं तेव्हां. तर एकदा दादा मला ह्या पंचम पुरी वाल्याकडे घेऊन गेले.

या भ्रष्टाचाराचे करायचे काय ?

लेखक बाबा पाटील यांनी बुधवार, 29/05/2013 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या दोन महिन्यांपासुन सरकारी खात्यांमधील भ्रष्टाचाराचा एकदम वाईट अनुभव घेतोय्,त्यातही पोलिस खात्याची हरामखोरी सहन करण्याजोजी नाहीये. सर्व कागपत्रांचीपुर्तता करुनही फक्त पैसे न दिल्याने पुणे जिल्ह्यातील एका पोलिस स्टेशन मध्ये मागचे २ महिने माझी फाइल धुळ खात पडुन आहे.तेथिल इनचार्ज ला विचारयला गेल.तर अत्यंत उर्मट भाषेत उत्तरे मिळतात.शेवटी माहितीच्या अधिकाराचा बडगा उगारल्याव,बघु ,वेळ मिळाला की सही करतो अश्या प्रकारे सांगन्यात आले.

बटाटा भाजी

लेखक आतिवास यांनी बुधवार, 29/05/2013 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्याच्या आत्याला पोरगी न्हाय. आत्याची म्या लाडाची हाय. सुट्टीला पुन्याला नेनार म्हन्ली. म्या इचारलं, “हिकडं आंबे असत्यात, पुन्याला काय?” आत्या हसली. मंग हे ते लई सांगितलं तिनं. तरीबी म्या न्हाई म्हनून रायली. मंग आत्या म्हन्ली, “बटाट्याची भाजी देईन.” लई झ्याक बगा. आमच्या हित सोमेवाडीच्या बाजारात बटाटा न्हाई.

पहिला पाऊस

लेखक तुमचा अभिषेक यांनी बुधवार, 29/05/2013 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
नो चिकचिक नो झिगझिग अन दरवळणारा मातीचा वास आज आमच्याइथे पहिला पाऊस पडला ! अंग भिजवायला पुरेसा नव्हता, मन मात्र पार न्हाऊन निघाले.. - तुमचा अभिषेक