Skip to main content

चॅलेंजर अंतरिक्षयान दुर्घटना भाग-२

लेखक लाल टोपी यांनी सोमवार, 20/05/2013 00:57 या दिवशी प्रकाशित केले.
चॅलेंजर अंतरिक्षयान दुर्घटना भाग पहिला प्रत्यक्ष उड्डाणाचा दिवस २८ जानेवरी उगवला. अजूनही उड्डाण नक्की होईल किंवा नाही याबाबत काही अंशी साशंकताच होती. कारण आदल्या रात्री उणे आठ इतके कमी तापमान नोंदवले गेले होते. २८ ला सकाळी +१ पर्यंत तापमान सुधारले होते. मात्र यापूर्वी १२ अंश सेल्सियश पेक्षा कमी तापमानात स्पेस शटल कधीही झेपावले नव्हते. अशा परीस्थितीत कधीही उड्डाण पुढे ढकलता येते.

Madeira Loaf Cake

लेखक सानिकास्वप्निल यांनी रविवार, 19/05/2013 23:35 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १७५ ग्राम बटर (रुम टेंपरेचरला असलेले) १७५ ग्राम साखर २०० ग्राम Self-Raising Flour (किंवा २०० ग्राम मैदा+ १ टेस्पून बेकिंग पावडर एकत्र करुन घेणे) ५० ग्राम बदामाची पावडर (मी सालींसकट बदामाची पावडर वापरली आहे) ३ अंडी (रूम टेंपरेचरला असलेली) दीड टेस्पून लिंबाचे साल किसलेले १ टीस्पून व्हॅनिला एसेन्स १/४ वाटी दूध (गरज लागल्यास) .

वेदातील विज्ञान..........

लेखक मंदार कात्रे यांनी रविवार, 19/05/2013 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
वेदातील विज्ञान समजून घेणे आणि आचरणात आणणे अगत्याचे आहे. अजूनही शोध न लागलेल्या कित्येक गोष्टींचे सांकेतिक उल्लेख वेदात असू शकतात . उदा. नुकतेच हाती आलेल्या वृत्तनुसार आता ,माऊस , voice यासोबत नुसत्या विचारानेही वेब सर्चिंग करता येईल ,असे संशोधन विकसित होत आहे. म्हणजे एक helmet डोक्यात घालायचे ज्यात electrodes बसवलेले असतील ,जे तुमच्या मेंदूतील विचारांचे electrical pulse किंवा brainwaves चे पृथक्करण /विश्लेषण करून तुम्हाला काय सर्च करायचे आहे,याचे प्रारूप बनवून त्यानुसार सर्च इंजिनला ते शोधायला सांगतील .

घुसमट

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 19/05/2013 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
कॊम्प्युटरच्या पडदयाआड चेहरा लपवून मी तुझ्या खुर्चीकडे मोजून सोळाव्या वेळी बघतो. खुर्ची अजूनही रिकामीच आहे. आज गुरुवार. गुरुवारी सकाळी तू मोहक नवीन केशभुषेत येत असतेस! आज जरा जास्तीच वाट बघायला लावते आहेस. तुझे आकर्षक रेशमी केस प्रत्येक गुरुवारी त्यांनी धारण केलेली जानलेवा रुपे! त्यांचे नवनवीन रंग. कधी हलका सोनेरी कधी पिंगट तपकिरी, कधी मधूनच एखादी चुकार बंडखोर रंगाची बट रेखलेली कधी भुरभुरणारे कोरडे, मोकळे सोडलेले कधी वेट लुक मधाळ, नजर चिकटवून ठेवणारे तुझ्या प्रत्येक नवीन रुपाने पुन्हापुन्हा खल्लास होणारे ऒफ़िसमधले माझ्यासारखे अनेक जीव, त्यांच्याकडे तू दुर्लक्षच करतेस. पण तरीही आशेने त्याती

सासर्‍या व्यथा

लेखक Bhagwanta Wayal यांनी रविवार, 19/05/2013 18:51 या दिवशी प्रकाशित केले.
ते आले होते मझाकडे आज एकदम खुशित, मि हि त्यांचे एकदम हसत स्वागत केले. मि त्यांला म्हनालो सासरेबुआ मि काहिहि करेन तुम्हाला हसत पाहन्यासाटि, तुम्ही फक्त एकदा हो म्हना हो" त्यांने हि हसत उत्तर दिले" हो हो जवईबापु आत मि माझ्या मुलीचा हात तुमच्याच हातात देईल तिला गरज तुमचीच आहे हो .." आनि ते माझा मिटित विरुन गेले , आता मि मि राहिलो नवतो, ते ते रहिले नवते , दोघाना हि ओड पिण्याची लगलि होति , मग कस कोन जाने या स्व्पनाल नजर माझिच लगलि, एक पेग मरल्यावर मि त्यांला मझ्या दुसर्‍या लग्नाचि गोश्ट सानगितलि आनि लगेचच रुम त्यांचि गाटलि. त्या बिचैर्‍याने दोन चार पैग मरले होते, मि पोह्च न्यापुर्विच सोफ्याव

विक्रांत वरील आयुष्य ५

लेखक सुबोध खरे यांनी रविवार, 19/05/2013 14:24 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी रत्नागिरीच्या समुद्रातून आम्ही निघालो तेंव्हा सकाळचे ६.३० वाजले होते. आता कोठे जायचे होते ते माहित नव्हते ( लष्करात कोणतीही माहिती ज्याला आवश्यक आहे त्यालाच दिली जाते. अर्थात त्यामुळे फार फरक पडतो असे नाही. माझ्यासारखा माणूस जो कोणत्याही विभागात काहीही कारण नसताना जात असे त्याला हे माहित होतच होते. तसे मी ब्रिज वर(जेथून जहाजाचे नियंत्रण केले जाते तेथे गेलो तेंव्हा तेथे नौकाचलन अधिकारी ( navigating officer) नकाशावर रेघोट्या ओढत होता. त्याच्या नकाशात डोके घातले तर आम्ही सरळ पश्चिमेकडे जात होते असे दिसले कुठे जायचे किती अंतर हे विचारण्याच्या मी फंदात पडलो नाही.

बालीचा समुद्र किनारा आणि जलपरी

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 19/05/2013 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
सूर्यास्ताची वाट पहात बालीच्या एक निवांत समुद्र किनार्यावर मी उभा होतो. सोनेरी प्रकाशात फेसाळी लाटांवर क्रीडा करणाऱ्या गोरंग स्त्री- पुरुषांना पहात समुद्री लाटांचे कधी न ऐकलेले संगीताचा आनंद घेत होतो. अचानक दिसली मला ती, मलयवासिनी, वस्त्रांच्या कोशात दडलेली जलपरीच, ती संकोचलेल्या डोळ्यांनी पहात होती फेसाळी लाटांवर कल्लोळ करणाऱ्या गोर्या मत्स्य ललनांना, पण डोळ्यांत दिसत होती तिच्या एक अनामिक भीती. दूर समुद्रात तिचा राजा खुणावत होता तिला समुद्रात उतरण्यासाठी, राजाची मर्जी राखण्यासाठी शेवटी ती बाहेर पडली वस्त्रांच्या कोषातूनी. सोनेरी रंगाच्या टू -पीस बिकनी मधे.

पूल

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी रविवार, 19/05/2013 04:30 या दिवशी प्रकाशित केले.
हा पूल कधीच शांत नसतो ---- कधी 'तो' असतो तिथे धुकेही असते त्याच्या बरोबर हो, रात्रिचे गर्द धुके... गुढ... बर्‍याचदा 'ति'चा आवाज गारुड करतो त्या धुक्यातून त्याच्या पोटात एकच प्रश्न या धुक्यात आवाज'सुद्धा' अडकतो? हम्म.. हा पूल कधीच शांत नसतो ---- कधी 'ती' असते तिथे त्याने दिलेले पिंपळपान घेऊन जिर्ण, जर्जर, जाळीदार अन् गडद खुप जपलयं तिने ते पान ऊन-वार्‍यापासून, पावसापासून कधी कधी तिला प्रश्न पडतो तिच्या हातातले पिंपळपान जास्त जिवघेणी शिक्षा, कि, तिच्या डोळ्यातली डबडबलेली 'त्या'ची प्रतिक्षा? पूलावरचा मिणमिणता दिवा थकुन थरथरत क्षीण झाल्यावर ती निघुन जाते दिवा तसाच तिथे फडफडत असतो हम्म...

कहाणी राजपुत्राची

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 18/05/2013 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
कहाणी राजपुत्राची आटपाट नगर होत. नगराचा राजा होता. राजाला लेक होता. खावे प्यावे खेळावे हा त्याचा नित्यक्रम होता. एके दिवशी त्याजकडून आगळीक घडली. सवंगड्यांबरोबर खेळतांना त्याचा पाय नागावर पडला. नागानं त्याला शाप देवून क्षणात जंगलात पाठवलं. घनदाट जंगलात राजपुत्र रानोमाळी भटकू लागला. कंदमुळं खावून जगू लागला. कोणी माणूस दिसतो का याची चाहूल घेवू लागला. होता होता कित्येक वर्षे गेले. असाच भटकत असतांना त्याला एका झर्‍याच्या काठी एक साधू दिसला. इतक्या दिवसांत कुणीतरी भेटले याचा त्याला आनंद झाला.