Skip to main content

पांडुरंग सांगवीकर सम लैंगिक आहे का?

लेखक पिंपातला उंदीर यांनी शनिवार, 15/06/2013 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
कलाकृति मधलि एखादि व्यक्तिरेखा आपली चौकट मोडुन वाचक अथवा प्रेक्षक यांच्या मनोव्यापाराचा हिस्सा बनते तेंव्हा ती कलाकृती यशस्वी होते असे म्हणायला हरकत नाही. शेरलॉक होम्स च बेकर स्ट्रीट वरील घर बघायला अनेक पर्यटक जायचे. मध्यंतरी हॅरी पॉटर या अती लोकप्रिय मालिकेमधले Dumbeldore हे पात्र कसे 'गे' आहे हे अहमहीकेने सांगणार्‍या लेखांचा वरवा पाडण्यात आला होता. उल्लेखनीय बाब अशी की दस्तुर्खुद लेखिका जे.के. रोलिंग बाई नि पण या थियरी ला दुजोरा देऊन एकच खळबळ उडवून दिली. या कपोकल्पित पात्राना मानवी गुणधर्म चिकटवने हा वाचकांचा / प्रेक्षकांचा अट्टहास असतो.

कभी तनहाईओंमे

लेखक शरद यांनी शनिवार, 15/06/2013 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
कभी तनहाईओंमे सर्वसाधारणपणे कवितेत किमान तीन कडवी असतात. गझलमध्येही अशीच अपेक्षा असते. अपवाद शास्त्रीय संगीताचा. तेथे अंतरा एक ओळीचा व अस्ताई दोन एक ओळींची असली तरी चालते. पण तेवढे काव्यच गायक तासभर आळवत बसतात व शब्दांना महत्व नाही म्हणून त्यातही कसेही शब्द बदलतात. ते सोडा. पण शब्दप्रधान काव्यात, हायकू सोडून, तीनपेक्षा जास्त कडवी असतातच. कवीला काय सांगावयाचे ते सांगावयाला काही जागा तर मिळाली पाहिजे ना ? आज मात्र मी एक चार ओळींची कविता आपणासमोर सादर करत आहे.

राजस्थानी घीवर विथ मँगो रबडि

लेखक दिपक.कुवेत यांनी शनिवार, 15/06/2013 16:43 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार लोक्स, सध्या आपल्या 'अन्न हे पूर्णब्रम्ह' ह्या दालनात चालणार्‍या राजस्थानी पाकॄ विषेश मधे हा माझा खारीचा वाटा. घीवर हा एक पारंपारीक राजस्थानी गोड पदार्थ आहे जो खास करुन लग्नात / सणासुदिला करतात. मी स्वःत अजुन घीवर प्रत्यक्षात कधी खाल्ले नव्हते पण जालावर रेसीपी पाहिल्यावर खायची तीव्र ईच्छा झाली त्यामुळे थोडेच का होईना पण करुन पाहिले. तसे हे घीवर नुसते खायलाहि छान क्रिस्पी लागतात पण पारंपारीक पद्धतीत त्यावर प्लेन रबडि + ड्राय फ्रुट्स घालुन सर्व करतात.

`रुणुझुणू रुणुझुणू रे भ्रमरा’ (एक)

लेखक संजय क्षीरसागर यांनी शनिवार, 15/06/2013 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
मनसे मुक्ती ही तो दरअसल मुक्ती है ! : ओशो (अष्टावक्र महागीता) ओशो __________________________________ मन या जीवनातल्या गहनतम पैलूवरचं हे लेखन तुमच्या समोर मांडताना अतिशय आनंद होतो आहे. विषय कसा पुढे न्यावा याची कोणतीही योजना मनात नाही. तुमचे प्रतिसाद आणि प्रश्न लेखनाची दिशा ठरवतील. अनेकानेक अंगांनी मनाचा सांगोपांग वेध घेण्याचा प्रयत्न या लेखमालेतनं होईल.

शापित अप्सरा

लेखक रसिया बालम यांनी शनिवार, 15/06/2013 02:33 या दिवशी प्रकाशित केले.
पारावारच्या गप्पा चालू असताना विषय निघाला की सर्वात सुंदर अभिनेत्री कोण ? नावांची बरसात झाली; नुसता कल्ला. माझी पसंत एकच.....ती ! अस्मादीकांना आउटडेटेड ठरवण्यात आले. चालायचंच..! तब्बल ४ दशकं उलटली 'तिला' जाउन पण ती भुरळ अजुन तशीच आहे.....चिरतरुण आणि चिरंतन! जमतेम टीनएजर असताना या अप्सरेचं पहिले 'छायागीत' (दूर)दर्शन झाले. त्या दिवशी "प्रथम तुज पाहता जीव वेडावला" हे गाणं पुरेपूर उमगलं ;) मधूबाला नावाची शुक्राची चांदणी अगणित रसिकांच्या ह्रदयाची धडकन आहे. फक्त जनसामान्यच नव्हे तर प्रेमनाथ, दिलीपकुमार आणि किशोरकुमार असे महारथी रांगेत उभे आहेत.

चिनी साम्राज्य

लेखक तिमा यांनी शुक्रवार, 14/06/2013 20:09 या दिवशी प्रकाशित केले.
२०५० सालातला भारत. नक्षलवादी फक्त दुर्गम भागात असायचे ते आता सर्व भारतभर पसरले होते.बहुतेक भाग त्यांनी काबीज केला होता. बरेच राजकीय नेते मारले गेले होते. उरलेले दिल्ली आणि त्याच्या जवळपासच्या भागात मिलिटरीच्या संरक्षणाखाली रहात होते. बाकीच्या देशांत त्यांचा संपर्क जवळजवळ तुटलाच होता. तरीही बाहेरच्या जगात अजून 'नक्षलीस्तान' ला मान्यता मिळाली नव्हती. शहरातल्या जनतेला अंगमेहनतीची कामे करावी लागत होती. नक्षलींनी जी शहरे काबीज केली, तेथील वस्तीत जाऊन सर्वप्रथम तिथल्या खाजगी गाड्या जाळून टाकल्या. एसयूव्ही सारखी खाजगी वाहने स्वतःच्या वापरासाठी बळजबरीने घेतली.

वेबसाइट बनवायची असल्यास...

लेखक नर्मदेतला गोटा यांनी शुक्रवार, 14/06/2013 19:52 या दिवशी प्रकाशित केले.
वेबसाइट या गोष्टीबद्दल काही माहिती हवी आहे. डोमेन नेम म्हणजे काय ? वेबस्पेस म्हणजे काय ? यामधे चांगले सर्विस प्रोवायडर्स कोणते. सर्विस प्रोवायडर निवडताना कोणत्या गोष्टींची खातरजमा करून घ्यावी. कोणकोणत्या गोष्टींचा सपोर्ट अपेक्षित असतो. यामधे सुरक्षिततेचा मुद्दा कुठे येतो का... कायदेशीर बाबी येतात का. प्रायवेट डेटा पब्लिक डेटा असे काही असू शकते का? सर्वर डाऊन झाल्यास बॅकअपची सोय असते का. या सार्‍याबाबत जाणून घ्यायचे आहे. कुणाला माहिती असेल तर जरूर सांगावे. याशिवायही जी माहिती असेल ती शेयर करावी.