Skip to main content

मिपावर्धापनदिनाच्या शुभेच्छा...

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 09/09/2013 09:57 या दिवशी प्रकाशित केले.
समस्त मिपाकरांना गणेशोत्सवाच्या आणि मिपावर्धापनदिनाच्या अनेकानेक शुभेच्छा.. तसेच नीलकांत आणि मिपाचे सर्व संचालकमंडळ यांचे मनःपूर्वक आभार, अभिनंदन आणि शुभेच्छा..! आपला नम्र, (मिपा संस्थापक) तात्या. ---- कृपया आम्हाला येथे भेटा - शिळोप्याची ओसरी - https://www.facebook.com/groups/kbdbliberal/

भारताची अर्थव्यवस्था: च्यायला, नक्की झालंय तरी काय?

लेखक चाणक्य यांनी रविवार, 08/09/2013 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
गेले काही महिने आपण रोज ढासळणारा रूपया, निर्देशांकात होणारी घट, कमकुवत होत चाललेली भारतीय अर्थव्यवस्था याबद्द्लच्या बातम्या ऐकतो, पाहतो, वाचतो आहोत. त्यातच पंतप्रधानांनी येणारा काळ आपल्या अर्थव्यवस्थेसाठी कठीण असेल असे स्पष्टपणे राज्यसभेत सांगितले. अगदी काल परवा पर्यंत 'भारत उद्याची महासत्ता आहे' , 'भारताचे भविष्य कसे उज्वल आहे', 'भारत गुंतवणूकीसाठी कसा योग्य देश आहे' हे जो तो सांगत होता. (अर्थात, देशांतर्गत घडामोडींवर नजर ठेवून असणा-यांना यातला फोलपणा लक्षात आला होता म्हणा) पण मग अचानक आपली अर्थव्यवस्था ईतकी आजारी कशी पडली? बरं याची कारणंही रोज वेगवेगळी ऐकायला येतायत.

पियुष मिश्रा-एक अवलिया कलाकार (५)

लेखक शिवोऽहम् यांनी रविवार, 08/09/2013 22:29 या दिवशी प्रकाशित केले.
पियुष मिश्रा-एक अवलिया कलाकार (४) ************************************************************************************************ गुलाल करताना समाधान मिळाले पण सिनेमा रिलीज व्हायला २००९ साल उजाडावे लागले. या ना त्या कारणाने. मधल्या काळात पोटापाण्याची व्यवस्था करायलाच हवी ना! अनुराग कश्यपच्या बहुचर्चित 'ब्लॅक फ्रायडे' मध्ये थापाचा रोल केला. तो कस्टम्स इन्स्पेक्टर ज्याने पैसे खाऊन RDX ने भरलेले ट्रक्स पास करुन दिले. पुढे त्याच RDX ने मुंबईच्या नरड्यावर पाय दिला. पण हा रोल शेवटच्या एडिटिंगमध्ये कट झाला.

'दुनियादारी'ची बीजे...

लेखक अजिंक्य विश्वास यांनी रविवार, 08/09/2013 21:55 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच यशस्वी झालेल्या 'दुनियादारी' या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने दैनिक ’दिव्य मराठी’ मध्ये ’रसिक’ पुरवणीत आलेले सम्राट शिरवळकर यांचे २ अप्रतिम लेख आले होते. त्यापैकी १ लेख ('सुशिं'ची झपाटलेली दुनिया!) मी आधीच पोस्ट केला आहे. आता राहिलेला १ लेख स्वत: लेखकाची परवानगी घेऊन पोस्ट करत आहे.

'सुशिं'ची झपाटलेली दुनिया!

लेखक अजिंक्य विश्वास यांनी रविवार, 08/09/2013 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच यशस्वी झालेल्या 'दुनियादारी' या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने दैनिक ’दिव्य मराठी’ मध्ये ’रसिक’ पुरवणीत आलेले सम्राट शिरवळकर यांचे २ अप्रतिम लेखांपैकी १ लेख मी येथे स्वत: लेखकाची परवानगी घेऊन देत आहे, आणि सोबतच ’समग्र सु.शि.’ ची संक्षिप्त पण महत्त्वाची माहिती. (संदर्भ- दैनिक ’दिव्य मराठी’ http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-duniyadari-movie-based-on-b… ) सोबत सुहास शिरवळकर साहित्य आणि त्याविषयीची चर्चा यामध्ये रस असलेल्या वाचकांसाठी फेसबुक ग्रूपची लिंकसुध्दा जोडत आहे.

आईना - ए -गजल लेखक डॉक्टर विनय वाईकर/ डॉक्टर जरीना सानी

लेखक भ ट क्या खे ड वा ला यांनी रविवार, 08/09/2013 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
गजल ऐकताना काहीवेळा एखादा उर्दू शब्द कानी पडतो, त्याचा अर्थ न समजल्यामुळे तो शेर मनाला भिडत नाही. "डॉक्टर जरीना सानी आणि डॉक्टर विनय वाईकर" यांनी लिहिलेले "आईना -ए -गजल" हे पुस्तक हाताशी असेल तर हा रसभंग टाळता येतो. या पुस्तकात ८५०० पेक्षा जास्त शब्द आणि ५५०० पेक्षा जास्त शेर अर्थासह दिले आहेत. अर्थ मराठी आणि इंग्रजी भाषेत दिले आहेत. शेर निवडताना लेखक द्वयींनी अभ्यास पूर्ण निवड केली आहे. गजल ऐकताना आपल्याला जो शब्द समजत नाही तो शब्द शोधताना त्या शब्दा खाली नेमका आपण ऐकत असलेला शेर सापडतो असे बरच वेळा घडते. उदा.

प्रेम

लेखक मयुरपिंपळे यांनी रविवार, 08/09/2013 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम म्हणजे प्रेम असत! जगासाठी सेम असत! तु आली तर पाऊस आला तु गेली तर पाऊस गेला प्रेम म्हणजे प्रेम असत! जगासाठी सेम असत! एक असताना दुसरी हवे दुसरी असताना तिसरी ! प्रेम म्हणजे प्रेम असत! जगासाठी सेम असत! मिपा वर एक पोरगी नाय खेळ आहे तो वल्ली सल्ली चा! प्रेम म्हणजे प्रेम असत! जगासाठी सेम असत! एकडे आहे मन्द आत्मे ज्याला नाही घर दार ! प्रेम म्हणजे प्रेम असत! जगासाठी सेम असत!

फिर मिलेंगे भाईजान..

लेखक तुमचा अभिषेक यांनी रविवार, 08/09/2013 13:45 या दिवशी प्रकाशित केले.
गेले वर्षभरात बदललेला हा चौथा डॉक्टर. आजाराने पुन्हा उचल खाल्ली होती. बारावीला चांगले मार्क काढले असतेस तर डॉक्टरच बनवला असता तुला, असे आई कित्येकदा बोलायची, अन माझ्याजागी एखाद्या नर्सशीच लग्न का केले नाहीस असे बायको वरचेवर सुनवायची. म्हणूनच का माहीत नाही एखाद्या डॉक्टरकडे गेल्यास माझी पहिली नजर नर्सेसवरच भिरभिरते. अगदी आजही भिरभिरत होतीच, हॉस्पिटलच्या आवारात शिरल्यापासूनच. इतरवेळी रोगट वाटणार्‍या वातावरणात बघण्यासारखे एक तेच तर असते. बस्स भिरभिरतच होती नजर, अन अचानक अडकली.

शाही रवा बेसन बर्फी

लेखक टक्कू यांनी रविवार, 08/09/2013 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया असे घोष आता कानावर ऐकू येत आहेत. बाप्पाच्या आगमनाची आपण सारेच जण इतक्या आतुरतेने वाट पाहत असतो कि १५ दिवस आधीपासूनच आपली जय्यत तयारी सुरु होते. पूजेची तयारी, सजावटीची तयारी आणि मुख्य म्हणजे वेगवेगळ्या नैवेद्याची तयारी. उकडीचे मोदक मुख्य असले तरी रोज अनेक गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. असाच एक गोड पदार्थ आई ने गणपती बाप्पा साठी केला आणि तोच मी इथे शेअर करतेय. साहित्य: १ वाटी रवा १ वाटी बेसन १/२ वाटी नारळ १/२ वाटी खवा १ १/२ वाटी साखर १/२ वाटी तूप वेलची पूड सजावटी साठी काजू बदामाचे काप कृती: १.