मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अभय

सार्थबोध · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
या अवघ्या चराचरी व्यापलास तू हरी तरी आत बाहेरी शोध फसवा असा ll १ ll चालतसे देणी घेणी जीवा नित्य जन्मांतरी चिंता लागतसे मनी होईन पार कसा ll २ ll तूच बाप जननी येई पहा धावुनी या संसार काननी बाळ हाका मारीतसा ll ३ ll काळाचिये भक्ष आम्ही तिथे नाही विनवणी अभय मिळो शेवटी पायी तुझ्या लागतसा ll ४ ll - सार्थबोध

वाचने 2720 वाचनखूण प्रतिक्रिया 9

मिसळलेला काव्यप्रेमी 07/10/2013 - 17:43
अतिशय सुरेख आणि रेखिव रचना..

चाणक्य 08/10/2013 - 09:52
ओघवती आहे. खूप आवडली.