मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लागले वेड मज |

प्रमोद देर्देकर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
चौकार आणि षटकार चेंडू तो तडीपार। धावांचा डोंगर । शतक रचण्याचे । लागले वेड मज।
सचिन म्हणे || १ ||
फायलींचा डोंगर । कामाचा बट्याबोळ । लाच खोरी, भ्रष्टाचार । कितीतरी पैसे खायचे लागले वेड मज |
मंत्री म्हणे ||२||
दिंडी पताका भजन। रंगले कीर्तन । भान हरपून । वाट चाले पंढरी | भेट द्या हो माउली | लागले वेड मज |
वारकरी म्हणे ||३||
उभे पीक गेले जळून । सगळे माळ वैराण । चढे कर्ज डोक्यावर । झाकू कसे नागडेपण | करितो आत्माहत्या | लागले वेड मज |
शेतकरी म्हणे ||४||

वाचने 1548 वाचनखूण प्रतिक्रिया 2

आंबट चिंच 21/11/2013 - 09:45
वा खुप छान! शेवटची ओळ चटका लावुन गेली. बाकी वेल्लाशेटच्या म्हाणतो त्या प्रमाणे "काही गोष्टींचे वेडच अस्सावे लागते".