दप्तराचे ओझे कमी करा
दप्तराचे ओझे कमी करा
कालच एका सामाजिक संस्थेने दप्तराचे ओझे या वर एक सर्वेक्षण करून त्याचे आलेले निष्कर्ष प्रसिध्द केला आणि सर्वांना विचार करायला भाग पाडले. मी ही एक साधा माध्यमिक शिक्षक गेली २२ वर्षे अध्यापनाचे काम प्रामाणिक पणे शिरगाव ( ता. देवगड ) च्या शिरगाव हायस्कूल शिरगाव मध्ये करत आहे. विद्यार्थ्यानी शिकायचे व शिक्षकानी शिकवायचे ही दोन्ही बाजूने चालणारी अखंड क्रिया. आज काल विद्यार्थ्याच्या पाटीवर असणार्या दप्तराचे ओझे इतके जास्त आहे की त्याच्या आरोग्यावर आणि पर्यायाने अध्ययनावर परिणाम होत आहे. या वर काही उपाय मी येथे देऊ इच्छितो.
मिसळपाव