Skip to main content

भारतीय सणांमागचे (खरे) शास्त्र !!

लेखक ब़जरबट्टू यांनी रविवार, 01/09/2013 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच एक लेख डोळ्याखालुन गेला, भारतीय सण हे शेतक-यांसाठी नाही...आमचेपण हेच मत आहे,. पण मग हे सण नेमके कुणासाठी असावे, या प्रश्नाचे उत्तर शोधून काढल्याशिवाय आम्हाला चैन पडेना, . अखेर सगळे पट मांडुन ह्या प्रश्नाचे उत्तर आम्ही शोधून काढले आहे. आमच्या घोटुन घोटून, खोदून खोदुन (निट वाचा, पा नाहीये) केलेल्या या अभ्यासावरुन आम्ही जाहीर करतोय की सण हे " आय टी" मधील लोकांना डोळ्यासमोर ठेऊनच योजिले आहेत… नको नको, एव्हड्यात आम्हाला दंडवत घालू नका व आमचा उदो उदो पण करु नका, आम्ही अतिशय संशोधन करूनच हे भाष्य केलेय बरं का… विचार न करता कोकलायला आम्ही काय दिग्गी आहोत का ?

लाभांश मिळवा.....मिळवतच राहा.

लेखक ज्ञानव यांनी रविवार, 01/09/2013 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या शेअर मार्केट निपचित पडले आहे. पण जे dividand साठी शेअर घेत असतात त्यांना त्याचा फारसा परिणाम होत नाही. उलट आताच्या पडलेल्या मार्केटमध्येच हे शेअर खरेदी करण्याची उत्तम वेळ म्हणावी लागेल. पण मी इथे एक वेगळ्या कारणाने अश्या कंपन्यांची लिस्ट देत आहे जिचा लाभांश घोषित झालेला आहे आणि दोन चार दिवसात त्याची रेकॉर्ड डेट आहे.

नरनाळा किल्ला आणि अभयारण्य पदभ्रमंती

लेखक भ ट क्या खे ड वा ला यांनी रविवार, 01/09/2013 14:24 या दिवशी प्रकाशित केले.
YHAI अकोला युनिट च्या आग्रहाच्या निमंत्रणाला प्रतिसाद देऊन YHAI अंबरनाथ चे २४ आणि YHAI गुजरात चे ३ सदस्य यांची रेल्वे आरक्षणे November च्या अखेरीस निश्चित झाली.आमचा १ सदस्य आदित्य काही कामासाठी बुलढाण्याला गेला होता." इकडे विदर्भात पाऊस पडतोय" असा निरोप त्याने संध्याकाळी फोन करून दिला." हवामानातील बदलांचे भान कायम बाळगणे आणि अद्ययावत माहिती आपल्या सहकार्यांना देणे, हि आदर्श ट्रेकर ची लक्षणे" आदित्य काही या ट्रेक ला येणार नव्हता पण आपल्या मित्रांना त्रास नको म्हणून वेळात वेळ काढून त्याने हि माहिती दिली.

" दु:खा "

लेखक कैलास गायकवाड यांनी रविवार, 01/09/2013 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
कधी नको अन कधी वाटतोस रम्य दु:खा तुझ्या नि माझ्यामधील नाते अगम्य दु:खा असा कसा बेसुमार आलास एवढ्यांदा जरा तरी बाळगायचे तारतम्य दु:खा तुझ्यामुळे जाणले सुखाचे महत्व यास्तव तुझे हजारो गुन्हे ठरवतोय क्षम्य दु:खा जगात जीवन नसेल जर काय दु:खविरहित जगावयाची कशास इच्छा अदम्य दु:खा हजार 'कैलास' जन्मती तव कथन कराया तुझ्यामुळे या कथा जोवरी सुरम्य दु:खा ---डॉ.कैलास गायकवाड

एक चविसंदर्भात प्रश्न

लेखक शिल्पा ब यांनी रविवार, 01/09/2013 08:43 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्हा सगळ्यांना शेंगदाण्याची चटणी चवीला कशी असते हे माहिती असेलच. मला तुमची मतं हवी आहेत. समजा तुम्हाला कोणि छान चमचमीत शेंगदाणा चटणी दिली तर तुम्ही कशी खाल? परंपरागतपणे नाही तर तुमची कल्पनाशक्ती पणाला लाऊन सांगा. काही सजेशन खालीलप्रमाणे : sandwich + चटणी olive oil +चटणी रोटी लवाश /पिटा चिप्स क्रिमी चीज - फ़ोण्टिना वगैरे सगळयांना आगावू धन्यवाद.

प्रेम म्हणजे...

लेखक K Sangeeta यांनी रविवार, 01/09/2013 00:24 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम म्हणजे, एक कविता आयुष्यभर करीत रहावे... प्रेम म्हणजे, सुंदर गजल नेहमी गुणगुणत रहावे... प्रेम म्हणजे, सुंदर गिटार आवडत्या व्यक्तीला ऐकवत रहावे... प्रेम म्हणजे, सुगंध सहवासाचा तुझ्या आसपास दरवळतच रहावे... प्रेम म्हणजे, सहवासाची अनुभूती आपल्या जवळच असल्यासारखे वाटत रहावे... प्रेम म्हणजे, एक कविता आयुष्यभर करीत रहावे..

ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (७)

लेखक तुमचा अभिषेक यांनी शनिवार, 31/08/2013 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
दर दुसर्‍या तासाला येणारा तिचा फोन.. आज ऑफिसला पोहोचून तीन तास उलटून गेले तरी आला नाही तेव्हा चुकचुकल्यासारखे वाटणे साहजिकच होते.. मात्र कामाच्या घाईगडबडीत डोक्यात येणारे सारेच विचार तसेच रेंगाळत ठेवता येत नाहीत.. दुपारी खिशातला फोन खणखणला तेव्हा तिची आठवण झाली, पण वेगळाच नंबर पाहून चुटपुटलो.. तेवढ्यापुरतेच.. कारण समोरून आवाज तिचाच होता, बातमी तेवढी चांगली नव्हती.. बाईसाहेब फोन कुठेतरी हरवून आल्या होत्या.. तिच्यावर ओरडावे कि डाफरावे या विचारांत असतानाच तिने फोन कट देखील केला. कदाचित मला हे कळवण्यापुरताच केला असावा.. ते ही खरेच, दुसर्‍याच्या फोनवरून कितीसे बोलणार..

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र : नक्की किती खात्रीशीर व सुरक्षित ?

लेखक चेतनकुलकर्णी_85 यांनी शनिवार, 31/08/2013 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या सर्वत्र लोकसभेच्या निवडणुकीचे वातावरण तयार होत आहे. अनेक जण दहशतवाद(हिरवा,भगवा ,निळा इत्यादि ) वैगैरे चे मुद्दे उपस्थित करत आहे. पण नक्की निवडणूक आयोग ज्या पद्धतीने निवडणुका घेत आहे त्या किती सुरक्षित व खात्रीशीर आहेत हाच मोठा विषय आहे. निवडणूक आयोगाने आजकाल काही वर्षान पासून इलेक्ट्रोनिक मतदान यंत्र द्वारे मतदान घ्याचे ठरवले आहे. पूर्वी ह्या यंत्रावर अनेकदा शंका घेतली गेली आहे. सध्या ह्याच विषयावर जरा माहिती गोळा करावी असे ठरवले व ती मांडत आहे. तर हि मतदान यंत्रे भारतातील भारत इलेक्ट्रोनिक्स व इलेक्ट्रोनिक्स कार्पोरेशन ऑफ इंडिया ह्यांनी बनवली आहेत.

शेत-तळं

लेखक मीराताई यांनी शनिवार, 31/08/2013 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दूरदूरवर दृष्टी टाकत दिगंबर सायकल रेटत होता. रस्तारुंदीच्या कामात जुनीपुराणी झाडं तोडली गेली, तेव्हापासून रस्त्याला थंडगार सावली देणारी त्यांची डेरेदार छत्रंही गेली. एरवी हिरव्याचार शेतांवरून येणारी झुळुक थंडोसा आणायची अन् त्याबरोबरच तो हिरवा, ओला गंधही! पण आता पाहावं तर कालपरवापर्यंत भेगाळल्यासारखी दिसणारी शेतं, ढेकलं उलून आल्यानं केविलवाणी दिसत होती. बांधाबांधावरच्या एकटया दुकटया चिंचा-बाभळी उसासत कशाबशा तग धरून उभ्या होत्या, उद्याच्या आशेवर! उजाड माळरानांवर तेवढेच हिरवे ठिपसे जिवंतपणाची खूण पटवत होते.

उरेल काही उणे उणे

लेखक सागरलहरी यांनी शनिवार, 31/08/2013 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
उरेल काही उणे उणे, आयुष्य सारे मला म्हणे, भोगाच्याही पदरी उरते, वेदनेचे गाणे मखमलीच्या दाव्याला, जीवा बांधणे. उरेल काही उणे उणे, आयुष्य सारे मला म्हणे, कुणी गावे उद्याच्या, आशेचे गाणे उगवतीच्या पोटी लपले, अंधाराचे लेणे उरेल काही उणे उणे, आयुष्य सारे मला म्हणे, बेधुंद होऊन छेडावे, उगीच का तराणे भैरवीचे सूर घेते, अखेरीचे गाणे उरेल काही उणे उणे, आयुष्य सारे मला म्हणे, -- सागरलहरी