मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सुधीर मोघे

विकास ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आत्ताच बातमी वाचली: ज्येष्ठ कवी, संगीतकार सुधीर मोघे यांचे निधन त्यांचे कविता समजण्याच्या वयात काही लाईव्ह कार्यक्रम. दूरदर्शनवर शांता शेळके तसेच इतर तत्कालीन ज्येष्ठ साहीत्यिकांबरोबरील कार्यक्रमात पाहील्याने आणि नंतर त्यांच्या गाण्यांबरोबरच मुख्यत्वे "पक्षांचे ठसे" या काव्यसंग्राहातल्या कविता वाचल्याने डोक्यात राहीले...

मुक्काम व पोष्ट वाडे

kurlekaar ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मु. पो. वाडे गेल्या शतकाच्या सुरुवातीसच आमच्या तीर्थरुपांचे आई-वडिल कोंकणातून मुंबईत आले व माझ्या जन्मापूर्वीच त्यांचं निधन झालेलं होतं. तेंव्हा कोंकणातून मुंबई कडे पसरणाऱ्या अनुबंधाची एक तार आधीच तुटलेली; आता उरलं ते फक्त आजोळ—वाडे. (जिल्हा सिंधुदुर्ग). मला वाटतं माझी आजी (आईची आई) जिवंत असेपर्यंत आमच्या आईची माहेरची ओढ तसूभर कमी झाली नाहीं; पर्यायाने बऱ्याच उन्हाळाच्या सुट्ट्या आम्ही भावंडानी वाड्याला घालविल्या होत्या, त्यात कांहीशा माझ्या वाट्याला आल्या पण ज्या आल्या त्या मात्र नंतरच्या अनेक वर्षांसाठी आठवणींच मोहोळ निर्माण करून गेल्या. माझी आजी म्हणजे एक विलक्षणीय व्यक्तिमत्व होतं.

कान्हेरी लेणी, प्लॅस्टिक, ब्लफमास्टर वगैरे

आशु जोग ·
लेखनविषय:
लेखनप्रकार

प्लॅस्टिकबाबत सूचना
.

सूचना फलकांवरची प्लॅस्टिकबाबत जागरुकता
.

मुबलक प्रमाणात प्लॅस्टिक मिळण्याची उद्यानातली अधिकृत जागा
.

प्लॅस्टिक इथे मिळेल घरून मात्र आणू नका

Are you out of your sense? Yes! It's Sensory Integration Disorder

स्वमग्नता एकलकोंडेकर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आपण शाळेत असल्यापासून शिकत आलो आहोत, मानवाला पंचेंद्रीये असतात. स्पर्श, स्वाद, गंध, आवाज व दृश्य.( sight, smell, taste, touch, sound). पण मी तुम्हाला सांगितले कि ती माहिती चुकीची आहे तर? हो, आपल्याला वर नमूद केलेल्या पाच इंद्रियांच्याखेरीज अजून दोन लपलेले(हिडन) सेन्सेस असतात.

आय लव माय ईंडिया ..!

साळसकर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज काहीतरी स्पेशल करायचे हे कालपासूनच ठरवले होते. दरवर्षीपेक्षा काहीतरी हटके, इतरांपेक्षा काहीतरी वेगळे. रात्री बाराच्या ठोक्यालाच कामाला लागलो. जेव्हा कालगणनेनुसार तारीख पलटली. निव्वळ धमालमस्ती ऐवजी एखाद्या नवीन अंदाजाने आजचा दिवस साजरा करायचा होता. सुरुवात फेसबूक प्रोफाईल वरचा फोटो बदलण्यापासून केली. एक छानसा हवेत फडकणारा, भारतीय सार्वभौमत्वाची आणि प्रत्येक भारतीयाच्या स्वातंत्र्याची साक्ष देणारा तिरंगा प्रोफाईल डिसप्ले पिक्चर म्हणून लावला. ज्या खाली लाल गडद अक्षरात ठळक दिसेल असे कॅप्शन होते - आय लव माय ईंडिया .. लगोलग हाताबरोबर स्टेटस अपडेट केले - भारतमाता की जय ..

सुराई

drsunilahirrao ·
लेखनविषय:
'सुराई' अजून देहातुनी उसळते अजाण शाई अजून आत्म्यास गाज देते तुझी रुबाई अजून तेजीत बाग आहे कळ्याफुलांची अजून श्वासातली पुरेशी नसे कमाई अधीर गात्रात रात होते पहाटताना ... अजून तृप्तीत लोळते ही तुझी रजाई मनात माझ्या तुझा विलासी महाल झुलतो परी तुझ्या अंगणात मजला असे मनाई हरेक पेल्यात कैफ अजुनी जुनाच आहे भरुन घे तू नव्या दुखाने नवी सुराई ! अजून झाले न नाव माझे इथे पुरेसे अजून पुरती नसे म्हणावी तशी बुराई डॉ.सुनील अहिरराव

कॉकटेल लाउंज : मालिबू हॉट अ‍ॅप्पल स्ट्रुडेल

सोत्रि ·
बर्‍याच दिवसात कॉकटेल बनवले नव्हते. बार मध्ये काय काय साहित्य आहे ते बघितले, पण घरात ज्युसेस अजिबातच नव्हते. अ‍ॅप्पी फिज़ची बाटली फ्रीझमध्ये मागच्या कोपर्‍यात पहुडलेली दिसली. लगेच तिला सत्कारणी लावायचे ठरविले आणि एक कॉकटेल आठवले. तेच हे, कॉकटेल लाउंज मालिकेतील आजचे कॉकटेल आहे मालिबू हॉट अ‍ॅप्पल स्ट्रुडेल पार्श्वभूमी: हे कॉकटेल मालिबूच्या साईटवर एकदा बघितले होते. 'अ‍ॅप्पल स्ट्रुडेल' ह्या नावाचे एका वोडकापासून बनणारे एक वेगळे कॉकटेल आहे. त्याचे साहित्य जरा जास्त आहे.

कॅलिडोस्कोप २

kurlekaar ·
लेखनविषय:
रसिकता बेगम अख्तर समोर बसून आळवत्येय. मला आठवतंय ते हिंदी चित्रपटांतलं मैफलीचं दृश्य –एक दोन श्रोते मनगटावरच्या गजरयाचा आस्वाद घेत उगाचंच माना डोलावताहेत, शेजारी किंवा हातांत ‘एकच प्याला.’ रसिकतेचा इतका कुरूप चेहरा इतर कुठं बघायला मिळत नाहीं. पण या बरोबर मला आठवतोय सत्यजित रे यांच्या ‘शतरंज के खिलाडी’ मधला अमजदखान देखिल.‘शोले’तल्या या मोकाट सुटलेल्या गब्बरसिंगला रेंच्या या चित्रपटांत एका मवाळ, काव्य-संगीत-प्रिय नवाबाच्या रुपात बघायला प्रथम थोडं कठीण जातं. नंतर मात्र संगीताच्या पूर्ण आहारी गेलेला हा नवाब उमजायला लागतो. ही सुद्धा एक रसिकता, तीही टोकाची.

मी १६ मार्च ला निघणार

देशपांडे विनायक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
काल ५०० रुपये काढले आणि एकदम RELIEF आला आजवर अनेकवेळा मला डेबिट/क्रेडीट कार्ड वापरण्याचा सल्ला मिळाला पण मी दुर्लक्ष केले प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते असे म्हणतात त्या प्रमाणे ती वेळ आली आली म्हणजे मी ओढवून घेतली सत्तरी ओलांडलेल्या आम्हा मित्रात बायकोला न घेता ट्रीपला जाण्याची कल्पना मांडली गेली आणि अंमलात आणण्याची सुरवात झाली नेपाळ पाहण्याचे ठरले . आरक्षण झाले . गेले ५० दिवस बायको चुकूनही दुखावली जाणार नाही याची काळजी घेतली !! दोन दिवसापूर्वी कळले कि ५०० आणी १००० च्या नोटा नेपाळमध्ये वापरणे त्रासदायक होते या नोटा स्वीकारल्या जात नाहीत .