मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सुराई

drsunilahirrao · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
'सुराई' अजून देहातुनी उसळते अजाण शाई अजून आत्म्यास गाज देते तुझी रुबाई अजून तेजीत बाग आहे कळ्याफुलांची अजून श्वासातली पुरेशी नसे कमाई अधीर गात्रात रात होते पहाटताना ... अजून तृप्तीत लोळते ही तुझी रजाई मनात माझ्या तुझा विलासी महाल झुलतो परी तुझ्या अंगणात मजला असे मनाई हरेक पेल्यात कैफ अजुनी जुनाच आहे भरुन घे तू नव्या दुखाने नवी सुराई ! अजून झाले न नाव माझे इथे पुरेसे अजून पुरती नसे म्हणावी तशी बुराई डॉ.सुनील अहिरराव

वाचने 1190 वाचनखूण प्रतिक्रिया 3