काल ५०० रुपये काढले आणि एकदम RELIEF आला
आजवर अनेकवेळा मला डेबिट/क्रेडीट कार्ड वापरण्याचा सल्ला मिळाला पण मी दुर्लक्ष केले
प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते असे म्हणतात त्या प्रमाणे ती वेळ आली
आली म्हणजे मी ओढवून घेतली
सत्तरी ओलांडलेल्या आम्हा मित्रात बायकोला न घेता ट्रीपला जाण्याची कल्पना मांडली गेली आणि अंमलात आणण्याची सुरवात झाली
नेपाळ पाहण्याचे ठरले . आरक्षण झाले . गेले ५० दिवस बायको चुकूनही दुखावली जाणार नाही
याची काळजी घेतली !!
दोन दिवसापूर्वी कळले कि ५०० आणी १००० च्या नोटा नेपाळमध्ये वापरणे त्रासदायक होते
या नोटा स्वीकारल्या जात नाहीत . याला सोयीचा पर्याय डेबिट / क्रेडीट कार्ड .
बँकेत चौकशी केली तेंव्हा या सात आठ दिवसात मला कार्ड मिळेल याची शाश्वती वाटेना
४०/५० हजार रुपयाचे गाठोडे उशाला घेऊन दोन दिवसांचा रेल्वेचा प्रवास आरामदाई होणे अशक्यच !
तरुण वर्गमात्र शांत होता . पण समस्या मांडल्याखेरीज सुटणार कशी ? मी समस्या मांडली आणि
एकालाही ती समस्या वाटली नाही . मला एक डेबिट कार्ड देण्यात आले . ते वापरण्याच्या सूचना
दिल्या गेल्या . कितीही पैसे काढता येतील याची खात्री दिली गेली !!
मी एका ATM मध्ये गेलो आणि ५०० रुपये काढले . आता नेपाळमध्ये खर्चाची चिंता राहिली नाही
खिशात किती रुपये ठेवायचे हा प्रश्न सुटल्याने RELIEF मिळाला
आता MOBILE चा प्रश्न आला . आमचा MOBILE वापरला तर बोलण्यासाठी दर मिनिटाला १४० रुपये खर्च येईल असे कळले . [म्हणजे बायकोला नेणे स्वस्त पडणार तर]
त्यामुळे SMARTPHONE मला देण्यात आला ज्यावर ते WHATS UP आहे
WHATS UP ला पर्याय काय म्हणून विचारल्यावर VIBER असे उत्तर मिळाले
परंतु त्या फोन ने VIBER वर बोलता येत नाही म्हणून मला TAB देण्यात आला
WIFI असलेल्या हॉटेलमध्ये मुक्काम असल्याने VIBER वर फुकट बोलता येईल म्हणे
एकंदरीत माझी काळजी मिटली आहे
आता प्रश्न आहे
काटमांडू ,पोखरा गोरखपूर अशा ठिकाणी आवर्जून काय पहावे ?
आपल्या पैकी नेपाल दर्शन करून आलेले आणि नेपाळ माहित असलेले ट्रीप
आनंद दाई व्हावी म्हणून चार शब्द लिहितील तर मला बरे वाटेल
मी १६ मार्च ला निघणार
वाचने
3105
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे वा !!!
शुभेच्छा
अमेरिकेत प्रवेश करतांना १००००
ते पहा बुवा
In reply to अमेरिकेत प्रवेश करतांना १०००० by kurlekaar
आणि त्यानंतरचे, 'दडपून म्हणजे
In reply to ते पहा बुवा by अत्रन्गि पाउस
येताना कुकरी घेऊन या
@येताना कुकरी घेऊन या>>>
In reply to येताना कुकरी घेऊन या by आदूबाळ
प्रथम प्रवासाला शुभेच्छा देतो
अरे वा!!
शुभेच्छा
रूद्राक्ष