Skip to main content

आयाळ असलेला वाघ - २ (अंतिम)

लेखक स्पार्टाकस यांनी रविवार, 27/04/2014 07:06 या दिवशी प्रकाशित केले.
आयाळ असलेला वाघ - १ - http://www.misalpav.com/node/27684 कराडीबेट्टा व्याघ्र अभयारण्य हे रस्त्याला लागूनच उत्तर दिशेला पसरलेलं आहे. म्हैसूरच्या महाराजांच्या हुकुमावरुन या अभयारण्याची निर्मीती करण्यात आलेली आहे. या अभयारण्यात कोणत्याही जनावराच्या शिकारीची परवानगी देण्यात येत नाही. म्हैसूरच्या राजाच्या दूरदर्शीपणाचं हे एकच उदाहरण नसून म्हैसूर प्रांतात अशा अनेक अभयारण्यांची निर्मीती त्यांनी केली आहे. या नरभक्षकाने माणसांचा संहार करून अभयारण्यात दडी मारण्याचा सुरक्षीत मार्ग पत्करला होता.

शुभंकरोती

लेखक मालविका यांनी रविवार, 27/04/2014 01:16 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या जुन घर १२/१५ खोल्यांचं होत.त्यात २ झोपाळे होते.एक माजघरात मध्यम आकाराचा आणि दुसरा पडवीत पहिल्यापेक्षा मोठा.हा पडवीतला झोपळा मला खूप आवडायचा त्या झोपल्यावर आम्ही सगळे जन एका वेळी मावायचो.त्या झोपल्यावर बसून मोठ्यांदा गाणी म्हणायची,कविता म्हणायच्या हे आमच एक आवडत काम असायचं .

तू

लेखक पद्मश्री चित्रे यांनी रविवार, 27/04/2014 00:02 या दिवशी प्रकाशित केले.
तू वादळी समुद्र मी एक लाट छोटी मिटते जरी तुझ्यात येतेच नाव ओठी     तू तेज:पुंज तारा     रात्री नभात येसी     मी एक रातराणी      फुलले तुझ्याचसाठी तू सूर्य अग्निगोल मी शांत तृप्त धरती फिरते यूगे यूगे का वेडावुनी सभोती     तू मेघ पावसळी     झरसी असा तूफान     मी एक वेल रानी       गाते तुझेच् गान तू गंध पारिजात मी लाजरी पहाट येते तुझ्याचसाठी  भेदूनी काळरात  तू सावळा मुरारी   निर्जीव बासरी मी   देता तू श्वास हलके    घेते तुझ्या लकेरी चैतन्य तू जीवाचे तू श्वास अंतरीचे तू भास
काव्यरस

काळू बाळू

लेखक विकास यांनी शनिवार, 26/04/2014 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
Kaloo Baloo कधीकाळी लहान असताना दूरदर्शनवर काळूबाळूचा तमाशा - वगनाट्य पाहील्याचे आठवते. कदाचीत मुलाखती देखील ऐकल्या असतील. पण विसरून गेलो होतो. आत्ता म.टा. मधे तमाशा कलावंत 'बाळू' कालवश बातमी वाचली. काळू चे २०११ ला निधन झाले आणि ८२ वर्षीय बाळूचे काल निधन झाले...

विज्ञानाबद्दल माहिती हवी

लेखक माहितगार यांनी शनिवार, 26/04/2014 18:51 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी विकिपीडियावरील वि़ज्ञान हा लेख अद्ययावत करू इच्छितो आहे. खालील माहितीचे स्वागत असेल १) वि़ज्ञान म्हणजे काय (व्याख्या) ? * उपप्रश्न : ** वैज्ञानिक पद्धती म्हणजे काय ? वैज्ञानिक पद्धती कशी अवलंबिली जाते ? सायंटीफीक एनक्वायरी (मराठी शब्द सुचवा) म्हणजे काय ती कशी केली जाते ? २) वि़ज्ञानाचे आणि वैज्ञानिकांचे उद्दीष्ट/ध्येय/साध्य काय असते ?

sadism एक आदिम मानवी प्रवृत्ती.

लेखक मारवा यांनी शनिवार, 26/04/2014 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
या शब्दाचा उगम मार्क्वीस द साद या १८ व्या शतकातील फ़्रेंच सरदार व लेखक याच्या नावावरुन झाला. याचा जन्म तेव्हाच्या एका प्रभावशाली उमराव कुटुंबात झाला. हा सुरुवातीपासुन इतरांना यातना देउन लैंगिक आनंद मिळविण्यात समाधान मानत असे. याला अनेकवेळा वेश्यांशी अत्यंत क्रुरतेने वागल्याच्या कारणासाठी तुरुंगात टाकण्यात आले. बॅस्टील च्या कुप्रसिद्ध तुरुंगात ही याला टाकण्यात आले होते. तेथे त्याने त्याची अनेक कुप्रसिद्ध पुस्तके लिहीली. त्यात जस्टाइन आणि १२० डेज ओफ़ सॅडोम या बहुचर्चित पुस्तकांचा समावेश आहे.

मतदार यादी घोटाळा आणि कारस्थान

लेखक मंदार कात्रे यांनी शनिवार, 26/04/2014 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
केवळ महाराष्ट्रात 64 लाख मतदारांची नावे गायब . म्हणजे एकूण साडेआठ कोटी मतदारांपैकी 8% मतदारांची नावे गायब केली आहेत. यामागे फार मोठे कारस्थान असू शकते ,किंबहुना आहेच ! जरा विचार करा की संपूर्ण देशात जर आशा प्रकारे कारस्थान करून सुमारे 8 ते 10 % मतदारांना मतदानापासून वंचित ठेवले गेले असेल, तर सत्ताधारी कोंग्रेस पक्षाची फार मोठी खेळी यामागे आहे.

'साप्ताहिक प्याफक्त' विचार धन - १. मच्छराचार्य - खंडनमिश्र शास्त्रार्थ वाद

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 26/04/2014 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा: 'साप्ताहिक प्राजक्त' विचार धन - १. शास्त्रार्थ वाद मित्रांनो, नुकतेच 'साप्ताहिक प्या-फक्त' वाचनात आले. एप्रिल १४ च्या अंकातील काही भाग सादर करून काहींना विचार व्यक्त करायला विनंती करत आहे. 'श्री मच्छराचार्य - चरित्र व स्तोत्रे ' या लेखात म्हटले आहे, "श्री मच्छराचार्य व खंडनमिश्र यांच्यात शास्त्रार्थ वाद करायला सुरवातीला प्रतिज्ञा झाल्या.

पाकिस्तानी खेळाडू आणि आयपीएल - भारतीय क्रिकेट बोर्डाचे धोरण ??

लेखक तुमचा अभिषेक यांनी शनिवार, 26/04/2014 00:23 या दिवशी प्रकाशित केले.
भारताने पाकिस्तानशी क्रिकेट खेळणे सोडलेय. अर्थात आजच्या तारखेला. कारण हि धरपकड चालूच असते. पण सध्या तरी या दोन देशांमध्ये अमन की आशा क्रिकेटच्या माध्यमातून करण्याबाबत कोणी पुढाकार घेत नाहीये. त्या अंतर्गत आपण पाकिस्तानात क्रिकेट खेळायला जात नाही (आता तिथे कोणीच जात नाही ती गोष्ट निराळी) तसेच ते आपल्याकडे येत नाहीत. ना आपण तटस्थ ठिकाणी त्यांच्याशी खेळतो. फक्त आयसीसीच्या स्पर्धांमध्ये आमनेसामने येतो तेव्हाच काय ती लढत.

अचानक ठरलेला दिल्ली कट्टा: एप्रिल २६, दुपारी ४ वाजता.

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 25/04/2014 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
आजच अचानक दिल्लीत कट्टा करण्याचे ठरले. सध्या विवेक पटाईत, अरूण जोशी आणी मी, शिवाय एकदोन मिपाचे नियमित वाचक, असे मिळाले. आणखी कुणी मिपाकर दिल्लीत रहात असतील, वा सध्या इकडे आलेले असतील, तर अगदी जरूर यावे. कुठे: त्रिवेणी कला संगम, (कॅफेटेरिया) तानसेन मार्ग, (मंडी हाऊस सर्कल जवळ) नवी दिल्ली. 'मंडी हाऊस' नावाचे मेट्रो स्टेशन अगदी जवळच आहे. वेळः दुपारी ४ वाजता. . सुंदर आणि मोकळी जागा आहे, निवांत गप्पा करत बसायला छान.