Skip to main content

म्युच्युअल फंड - भाग १

लेखक उदय यांनी मंगळवार, 23/06/2026 10:22 या दिवशी प्रकाशित केले.

शक्यतो सोप्या पद्धतीने मराठीत माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, पण नाईलाजास्तव बऱ्याच ठिकाणी इंग्रजी शब्द, संकल्पना वापराव्या लागत आहेत. सवयीमुळे मनातल्या मनात इंग्रजीतून मराठीत भाषांतर करावे लागले आहे पण जर एखादी गोष्ट मराठीत स्पष्ट नसेल, तर कृपया सांगावे.

तुमची कार कोणती आहे?

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी सोमवार, 22/06/2026 12:23 या दिवशी प्रकाशित केले.

आमची प्रेरणा https://www.misalpav.com/discuss/53742 

 

 

मगृर, ॲरोगंट, इगो असलेले, खुनशी, स्वमग्न लोकं मर्सिडीज घेतात. 

मनमोकळे, मनमिळावू, कुटुंबवत्सल असलेले मारुती घेतात. 

तुमची कार कोणती आहे?

हंपीचा ध्यास-४ (कृष्ण मंदिर,लक्ष्मी नरसिंह,बदवी लिंग ,प्रसन्न विरुपाक्ष मंदिर )

लेखक Bhakti यांनी शनिवार, 20/06/2026 14:38 या दिवशी प्रकाशित केले.

कृष्ण मंदिर
दोन्ही गणेशाचे दर्शन घेऊन मग आम्ही पुढे चालू लागलो.ऊन बरेच होते तेव्हा नारळ पाणीने जीवाला थंडावा देत.कृष्ण मंदिरापाशी पोहचलो.त्याचे ते भव्य ,ऊंचच ऊंच  प्रवेशद्वार विजयनगर साम्राज्याची भव्यता पुन्हा अधोरेखित करत होती .उदयगिरी किंवा उत्कल (सध्याच्या ओरिसा राज्यात) या पूर्वेकडील राज्याच्या विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी राजा कृष्णदेवराय यांनी १५१३ मध्ये त्यांचे मंदिर बांधले.

हिमाचल प्रदेश भटकंती-चंदिगढ-शिमला

लेखक कर्नलतपस्वी यांनी शुक्रवार, 19/06/2026 18:28 या दिवशी प्रकाशित केले.
प१

 https://www.misalpav.com/tourism/53715 -१

https://www.misalpav.com/tourism/53727 -२

आम्हांला आता पिंजोर गार्डन  कडे प्रस्थान करायचे होते........

आता पुढे.

तुमचा मोबाईल फोन कोणता आहे?

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 19/06/2026 06:07 या दिवशी प्रकाशित केले.

मगृर, ॲरोगंट, इगो असलेले, खुनशी, स्वमग्न लोकं आयफोन घेतात.

मनमोकळे, मनमिळावू, कुटुंबवत्सल असलेले ॲंन्ड्रॉईड फोन घेतात.

तुमचा मोबाईल फोन कोणता आहे? 

 

(*ॲरोगंट शब्ददुरूस्ती केली.)

चित्रभाषा

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 18/06/2026 20:52 या दिवशी प्रकाशित केले.

तुझ्या चित्रभाषेमधले मी
शोधित होतो जरी व्याकरण
त्या शोधाच्या वाटेवरती
मला गवसले काही विलक्षण

नियमबद्ध काहीही नसणे
हाच नियम असणार, वाटले
होते- पण त्या ओळींमधल्या
जागेवर ते पुन्हा भेटले

चकवा देऊन आकलनातून
पुन्हा पुन्हा निसटुनी जे गेले
तेच गूढ चित्राक्षर होऊन
मला पछाडून अथांग उरले