Skip to main content

सह्याद्रीचा एक कडा

लेखक सतिश गावडे यांनी रविवार, 07/06/2026 00:51 या दिवशी प्रकाशित केले.

कालवर जो अढळ होता

सह्याद्रीचा एक कडा

आज तिथे फक्त उरलाय 

एक उघडा, जखमी तुकडा

 

पोकलेनच्या सुळ्यांनी 

त्याची कुस पोखरली

हिरवी शाल ओरबाडून 

लाल माती पाडली

 

ज्या पठारावर खेळले 

पाऊस, वारा नी ऊन

मिसळ हा ओव्हर हाईप्ड पदार्थ आहे

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 05/06/2026 23:01 या दिवशी प्रकाशित केले.

मिसळ हा ओव्हर हाईप्ड पदार्थ आहे.

मिसळ बनवण्यात कसलेही पाक कौशल्य अपेक्षित नसते.

सार, रस्सा कसाही करा, १९-२०% जमून जातोच. अनेक ठिकाणी रश्यात काही बाही पदार्थ "मिसळलेले" आढळले आहे. अगदी माश्याचा रस्सा, कालचा रस्सा वगैरे.

मिसळ म्हणजे पदार्थांची भेसळ असते. मुख्य असते मटकी, पण ती असते अगदी कमी

दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव २१ (अंतिम): फक्त कृतज्ञता!

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 05/06/2026 20:15 या दिवशी प्रकाशित केले.

नमस्कार. १२ जानेवारी ते ३१ जानेवारी ह्या २० दिवसांमध्ये दक्षिण भारतात "आरोग्यासाठी योग" प्रवास झाला. तो ३१ जानेवारीला चेन्नै येथे पूर्ण झाला. आपला देश खूप वेगळ्या प्रकारे अनुभवता आला आणि आपल्या देशबांधवांना भेटता आलं. चेन्नैमध्ये हा प्रवास थांबवताना मनामध्ये कृतज्ञतेची भावना आहे. आणि कोणत्याच प्रकारे ही एखादी अचिव्हमेंट आहे असं वाटत नाही. सायकलिंगची आवड, त्यासाठीचं मार्गदर्शन, तयारी, निसर्गाने दिलेली क्षमता, निरामय सदस्यांची मदत, प्रवासासाठीची मदत अशा गोष्टी सगळ्या बाहेरून आल्या व मी त्या फक्त माझ्यामध्ये साकार होताना बघितल्या. प्रत्येकाला निसर्गाने दिलेली ही क्षमता असते.

चीन: रेशीमगाठी आणि कषायपेयाचा देश - भाग २

लेखक शेखरमोघे यांनी शुक्रवार, 05/06/2026 07:45 या दिवशी प्रकाशित केले.
४ जून १९८९ ला झालेली तियानानमेन चौकातील कत्तल  
 
प्रास्ताविक 
 
अगदीच थोडक्यात सांगायचं तर "तियानानमेन चौक" या बेजिंगमधील मध्यवर्ती चौकात सरकार विरोधी चळवळीसाठी एकत्र जमलेल्या काही लाख विद्य

सत्याचा क्षण

लेखक मंदार कात्रे यांनी शुक्रवार, 05/06/2026 00:58 या दिवशी प्रकाशित केले.

---

 

तळेगाव शिवारातलं कोकण कडेकडेपर्यंत पसरलेलं हिरवं गालिच्यासारखं दिसत होतं. पावसाळा नुकताच सुरू झाला होता. भाताची रोपं लावायला गावकरी सज्ज झाले होते. पण यंदाचं वातावरण काही वेगळंच होतं. ग्रामपंचायतीची निवडणूक डोक्यावर आली होती. दोन गट आमने-सामने उभे होते – एकीकडे पंधरा वर्षांचा सरपंच असलेले मामासाहेब पाटील आणि दुसरीकडे गावातली नवी पिढी म्हणून उभे राहिलेले सिद्धेश देसाई, ज्यांना सगळे 'सिद्धूभाऊ' म्हणायचे.

हिमाचल प्रदेशातली भटकंती -पुणे-दिल्ली-चंदिगढ

लेखक कर्नलतपस्वी यांनी गुरुवार, 04/06/2026 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
आ

 

 

"आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो" 

चाकोरीचे खर्डून कागद सहीस पाठवतो 

व्याप नको मज कुठलाही अन्‌ ताप नको आहे 

उत्तर कुठले मूळात मजला प्रश्न नको आहे 

या प्रश्नांशी अवघ्या परवा करार मी केला 

मी न छ्ळावे त्यानां , त्यांनी छळू नये मजला 

बधीरतेच्या पुंगीवर मी नागोबा डुलतो.... -

-संदीप खरे 

 

दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव २०: पुद्दुचेरी- चेन्नै १५० किमी

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 04/06/2026 15:30 या दिवशी प्रकाशित केले.

✪ ईसीआर आणि समुद्राची सोबत 

✪ उलट्या दिशेने ढकलणारा वारा 

✪ थिऑसॉफिकल सोसायटी- ऐतिहासिक संस्था 

✪ खरंच हा सायकल प्रवास थांबवू? 

✪ "निरामयच्या" चेन्नै शाखेत सायकल उपक्रमाचा समारोप 

✪ २० दिवसांमध्ये ठरल्याप्रमाणे १८६१+ किमी पूर्ण 

✪ टीम वर्कचं यश आणि उद्दिष्टाची पूर्तता नमस्कार. 

दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १९: श्रीमुशनाम- पुद्दुचेरी ९६ किमी

लेखक मार्गी यांनी बुधवार, 03/06/2026 20:38 या दिवशी प्रकाशित केले.

✪ कडलोर जिल्ह्याचा ग्रामीण परिसर 

✪ त्सुनामीच्या वेळच्या आठवणी 

✪ जेवढं फिरू, तेवढं कळतं की, आपण काहीच फिरू शकत नाही! 

✪ पुद्दुचेरीचा श्री अरविंद आश्रम! 

✪ व्हाईट टाऊनमधला बीच 

✪ श्री. मातृप्रसादजींसोबत संवाद 

✪ आप्त जनांच्या भेटीमुळे घरी आल्याची भावना 

दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १८: तंजावूर- कुंभकोणम- श्रीमुशनाम ९४ किमी

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 02/06/2026 16:16 या दिवशी प्रकाशित केले.

✪ कुंभकोणमची मंदिरं आणि कावेरी नदी! 

✪ शांत गावं आणि रमणीय रस्ते 

✪ निवृत्त कॅप्टन आनंदनजींसोबत भेट 

✪ “अगर शिवाजी महाराज नही होते तो...” 

✪ “कमकुवत युवा पिढी" हासुद्धा देशाचा शत्रू 

✪ श्रीमुशनामचं वेलुनाव्हियार केंद्र – वेगळी संस्था 

✪ “रगड़ा बनाएगा तगड़ा"