एक जीवघेणं लावण्य!
सूर्य उगवला, सकाळ उमलून आली. जाग आली तर माझ्या हातावर डोकं ठेवून निजलेली तू. अस्ताव्यस्त केस, मोठं कपाळ, लांब नाक, गोऱ्यापेक्षा जरा कमी आणि सावळ्यापेक्षा जरा उजळ रंग. तुझे ते गडद गुलाबी ओठ, नाजूक हनुवटी आणि कचकन चावा घ्यावासा वाटणारे तुझे ते गोड कान. आखीव भुवयांच्या खाली बंद पापण्याआडचे तुझे पाणीदार डोळे.
पंतप्रधान मोदींना सर्वोच्च अवॉर्ड देण्याची जगात स्पर्धा सुरू आहे का?
रोझ अँपल जॅम -जाम फळाचा जॅम

एक मिनिट हे टोमॅटो नाही...तर आहेत Rose Apple...
खरंतर ही उन्हातळी फळ आहेत. मी ही पाककृती 15-20 दिवसांपूर्वी केलेली आहे😅
नक्की वाचा. व्हिडिओ स्वतंत्रपणे पोस्ट करते.
घराच्या जवळ सापडलेल्या रोज ॲपलपासून बनवलेलं स्वादिष्ट जॅम!🍎✨
उजनी धरणातिल प्राचीन श्रीराम आणि शिवमंदीर
नमस्कार,
बारामती तालुक्यातील उजनी धरणात गेलेले एक गांव आणि त्यातील १००० व्या शतकातील प्राचीन शिवमंदिरासाठी प्रसिद्ध असलेले पळसदेव गांव. दर वर्षी उन्हाळ्यात जेंव्हा धरणातील पाणी कमी होते, तेंव्हा हे मंदिर पाण्याच्या बाहेर येते. ते बघायला बरेच पर्यटक आणि हौशी छायाचित्रकार तेथे गर्दी करतात. बऱ्याच दिवसांपासून हे मंदिर बघण्याची आणि त्याचे छायाचित्र घेण्याची इच्छा माझ्या मनात होती. परंतु काही केल्या मुहूर्त सापडत नव्हता.
'पारदर्शक' पावत्या आणि बुडालेला हिशोब!
काही दिवसांपूर्वी 'अशी ही बनवाबनवी' मधल्या त्या ७० रुपयांच्या हिशोबावरून सोशल मीडियावर खूप गप्पा रंगल्या. तेव्हा धनंजय माने अत्यंत गंभीर चेहऱ्याने म्हणाला होता की ७० रुपये वारले! पण आजकालच्या डिजिटल आणि अत्यंत 'संस्कारी' युगात हिशोबाचे आकडे आणि स्वतःच्या फायद्यासाठी बदलली जाणारी श्रद्धेची व्याख्या पाहिली, की जाणवतं की आता फक्त ७० किंवा ३७० रुपये नाही, तर थेट कोट्यवधी जनतेच्या श्रद्धेचा जाहीर लिलाव मांडला गेला आहे. अयोध्या प्रभू रामचंद्रांच्या नावाने जमा झालेल्या दानपेटीतील ज्या चोरीचे प्रकरण समोर आले आहे, ते निव्वळ धक्कादायक नसून डोळ्यात अंजन घालणारे आहे.
सहली/ पर्यटन- दिखावा, मनस्ताप कि मन:शांती
आजकाल सोशल मीडियावर पर्यटनाचे, कौटुंबिक सहलीचे, मित्रांच्या मौजमजेचे फोटो/ व्हिडिओ यांचा भडीमार होत असतांना दिसतो. दैनंदिन धावपळीच्या आयुष्यामुळे येणारा मानसिक ताण सहलीमुळे दूर होतो. निसर्गाच्या सानिध्यात किंवा नवीन ठिकाणी वेळ घालवल्याने मनाला शांतता लाभते. प्रत्यक्ष अनुभवातून शिकलेले जास्त काळ लक्षात राहते म्हणूनच, स्वतःला रिचार्ज करण्यासाठी आणि जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी वेळोवेळी पर्यटन सहलींचे आयोजन केले पाहिजे. नात्यांमधील गोडवा कायम राहण्यासाठी, इतिहासाची उजळणी करण्यासाठी, नवनवीन खाद्यसंस्कृती व परंपरा जाणुन घेण्यासाठी पर्यटन आवश्यक आहे.
थोरोचा मृत्यू
हरिद्वार – कटरा – जैसलमेर – जोधपूर : ऋषिकेश दर्शन
हरिद्वार – कटरा – जैसलमेर – जोधपूर : ऋषिकेश दर्शन
२२ जानेवारी - बुधवार
सकाळी ८ वाजता गाडी येणार होती. त्यामुळे आम्ही पहाटेच ५:३० वाजता उठलो. सर्वांना फोन करून उठवण्याची जबाबदारी पार पाडली आणि सकाळची लगबग सुरू झाली. कालच बहुतेक सामान आवरून ठेवले असल्याने तयारी पटकन झाली. थंडगार सकाळ, प्रवासाची उत्सुकता आणि आजचा भरगच्च कार्यक्रम यामुळे सगळ्यांमध्ये वेगळाच उत्साह होता. आम्ही सर्वजण ७:१५ पर्यंत तयार झालो.
मिसळपाव