Skip to main content

(सिमटी हुयी बुंदे)

लेखक कर्नलतपस्वी यांनी गुरुवार, 24/09/2026 07:15 या दिवशी प्रकाशित केले.

पेरणा-: शब्द झाले मोती.

 

गणेशाची मनापासून क्षमा मागून. गणेशा,लंबोदर नसला तरी तो क्षमाशील  आहे हे मला माहीत आहे. मला एकदा दर्शन झाले आहे.

 

हॅलो,मी सागर बोलतोय.

कोण पाहिजे?

सरीता आहे का?

नाही, ती वसुधा बरोबर शाॅपिंगला गेलीय.

केव्हां येणार?

सांगता येणार नाही,तीला आकाशाने लंच करता ब्ल्यू नाईल मधे बोलवलंय.

समीर बरोबर लाॅग ड्राईव् ला जायचं म्हणत होती. तिकडून बहुतेक रजनी कडे जाईल.

उद्या उषा येणार  आहे बहुतेक तीला भेटूनच येईल.

मोबाईल  घरीच ठेवून  गेली आहे.

पाहिजे तर निरोप ठेवून जा.......

सागर हिरमुसला.

पलीकडून ,हॅलो,सागर हॅलो...... भ्रमणध्वनी वाजत होता.

सागराने तिकडे लक्ष दिले नाही.

तेव्हढ्यात डोअर बेल वाजली.

चंद्रमुखी उभी होती.

 

चंद्रू , तू श्रीगंगानगर वरून कधी आलीस?

तीच्याशी गप्पा मारता मारता यामीनी  कधी आली कळालेच नाही.सुंदर दिसत होती.

.

.

.

.

.

 भ्रमणध्वनी वाजला. 

सागर खडबडून जागा झाला.

तो एकटाच होता.

हाय,हनी सागर ,मी सरू बोलतेय.

सागर काहीच बोलला नाही.

ओ,....डार्लिंग  यू मिस्ड मी.....

नो. हनी, चंद्रू वाॅज  विद मी....

भ्रमणध्वनी कट झाला.......

कुछ सिमटी हुयी बुंदे साईड टेबलपर बिखरी हुयी थी.......

चौपाटीवर विसर्जनाला जायला हवे.

 

(गणेशाभाऊं क्षमस्व, )


वाचने 125
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

In reply to by कंजूस

शब्द झाले मोती आणी सिमटी हुयी बुंदे....

 

एकाच नाण्याच्या  दोन बाजू. 

एक जनरेशन बुमरने बघितलेल तर एक जे झी ने.... 

 

गंमत म्हणून लिहिले आहे. जसे सुचले तसे....

 

श्रीगंगानगर मधे डिस्टीलरीचा मॅनेजर दोस्त होता. चंद्रमुखी वाईन चा खुपच महागडा ब्रांड, साडे बारा हजार  रूपये. कुवती पलिकडे.

 

पण मित्र वणव्यात गारव्या सारखा न्यायाने बिझनेस सॅम्पल मिळाला. त्याची आठवण प्रसंगानुरूप टाकली.

 

आजचे प्रेम "व्हॅम,बॅम,थ्यांक्यू मॅम", सारखे. अर्थात  सर्वांनाच लागू पडेल असे नाही.


सर, क्षमा कशासाठी? :)

तुम्ही बिनधास्त लिहा...

आणि तो धागा मनात येईल तसं लिहिण्यासाठीच आहे माझा.

‘मेघ’ जरी आता लिहीत असलो, आणि नवे भाग काल-आज लिहिले आहेत

लवकरच पोस्ट करेन. पण ‘मेघ’ ही माझी सिरीजही आता लवकरच संपते आहे.

त्यानंतर मला जे खरं वाटतं, जे मनात येतं, ते लिहीत जाईन...

तुम्ही लिहीत रहा. मी वाचत आहे.