Skip to main content

आमी तर ब्वा sin, cos, tan असलं काय वापरत नाय!

लेखक मनस्विता यांनी शुक्रवार, 26/06/2026 21:18 या दिवशी प्रकाशित केले.

आपण शिकत असताना बरीच वर्षं गणित हा विषय शिकतो. शिकत  शिकताना आणि आता शिक्षण पूर्ण झाल्यावरही आपल्याला प्रश्न पडतो की sin, cos, tan तसंच (a + b)^२ हे का शिकायचं? फक्त मार्क मिळवणे किंवा हवं ते शिक्षण घेता येणे एवढाच आहे का? काय उपयोग ह्या सगळ्या गोष्टींचा?

 

खरंच काही नाहीये का?        

 

तू माझा सांगाती..

लेखक आजी यांनी शुक्रवार, 26/06/2026 17:53 या दिवशी प्रकाशित केले.

माझा गुडघा दुखतो. उजवा गुडघा. खरं तर पूर्वीच म्हणजे मी पन्नाशी ओलांडली तेव्हा तो थोडा थोडा कुरकुर करायला लागला होताच. पण मी म्हटलं इतक्या लहान वयात (!?) गुडघा कसा दुखेल बरं! आणि दुखून चालणारच नाही (शब्दशः). आपल्याला तर अजून किती तरी कामं करायची आहेत.

तेव्हा असं वाटलं की, खूप काही अचिव्ह करायचं आहे. आपण काही म्हातारे झाले नाही आहोत. आपण ज्येष्ठ नागरिक व्हायला अजून दहा वर्षं बाकी आहेत. 

 

पण माझ्या या मताशी माझा उजवा गुडघा सहमत नव्हता. तो आपला दुखतच होता. 

म्युच्युअल फंड - भाग २

लेखक उदय यांनी गुरुवार, 25/06/2026 11:45 या दिवशी प्रकाशित केले.

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना दोन प्रकारचे खर्च असतात. पहिलं म्हणजे फंड विकत घेताना किंवा विकताना वजावट म्हणजेच लोड (load) घेतले जाते. आता सेबीच्या (SEBI) नियमामुळे फ्रंट लोड Front load (जो कमिशनचाच एक प्रकार होता आणि जे फंड खरेदी करताना घेतले जायचे), ते बंद झाले आहे. गुंतवणूकदारांच्या दृष्टीने ही अतिशय चांगली गोष्ट आहे. पण फंड विकताना जी वजावट घेतली जाते म्हणजे एक्झिट लोड (Exit load) ते अजूनही चालू आहे. फंड तुम्ही जर १ किंवा २ वर्षात विकलात तर Exit load कापून तुम्हाला पैसे दिले जातात. फंडाच्या स्कीमनुसार १-२ वर्षांनी exit load शून्य होते.

आजीचं पुस्तकांचं हॉटेल

लेखक नपा यांनी बुधवार, 24/06/2026 15:52 या दिवशी प्रकाशित केले.

काही महिन्यांपूर्वी नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावरील  'आजीचं पुस्तकांचं हॉटेल' या पुस्तकालय-कम-भोजनालयाला योगायोगाने भेट देता आली. 

नावाप्रमाणे या हॉटेल मध्ये तुम्हाला अनेक पुस्तके छान मांडून ठेवलेली दिसतील. हॉटेलची जागा अत्यंत प्रशस्त आहे आणि त्यात पुस्तकांनी व्यापलेल्या जागेने हॉटेलच्या भव्यतेत वाढ होते. 

पाऊस वाजतो दारी.....

लेखक कर्नलतपस्वी यांनी बुधवार, 24/06/2026 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
प

 नेहमीसारखाच साडेपाच वाजता उठलो.  पाऊस पडत होता.काल दुपारी आलेला मेघराज वस्तीलाच राहीला वाटते! कल्पनेनेच शिरशीरी भरली,अंगावर काटा आला. इतक्या दिवसांची प्रतिक्षा संपली. 

कोबीची भाजी खूप चवदार

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 23/06/2026 22:52 या दिवशी प्रकाशित केले.

कोबीची भाजी खूप चवदार 

कोबीची भाजी खूप चवदार
खाल्ली तर खातच राहणार || 

एक दिवस ही ट्रंपने खाल्ली
चड्डी त्याने पिवळी केली (कुणी, कुणाची?)

होय, कोबीची भाजी खूप चवदार 

एक दिवस ही मेलोनीने खाल्ली
मेलोडी चॉकेलेट पाहीजे म्हणाली 

काव्यरस

तुमचे प्रिय म आं जा संस्थळ कोणते आहे?

लेखक अनन्त्_यात्री यांनी मंगळवार, 23/06/2026 12:39 या दिवशी प्रकाशित केले.

मग्रूर, स्वमग्न  | "ऐसी" ज्यांची ख्याती 
पडीक असती | ऐ x वर ||१||

कुटुंबवत्सल | मनाने मोकळे
लोटले सगळे | मा x वरी ||२||

उर्वरित गुण-  | -दोषांनी भरले 
तयांनी गाठले | मिx त्वरे ||३||

आता तुम्ही सांगा | संस्थळ कोणते
तुम्हा आवडते ? | लाजू नका ! ||४||

(दगडफोड्यांनी | केली सूुरूवात 

तयाचा शेवट |  अनिश्चित ||५||) :)