Skip to main content

पाभे की बात ५

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 15/05/2026 22:25 या दिवशी प्रकाशित केले.

पाभे की बात ५

मिटरों,

उन्हाळ्याच्या नावाखाली पुरूष मंडळी अगदी अंडरपॅंटला देखील लाजवेल अशी चड्डी घालत आहेत. घालणाऱ्याला लाज वाटत नाही, पण पाहणाऱ्याला लाज वाटते.

अशा लोकांना मोदी सरकारच्या वतीने इस्रायलला पाठवण्यात येणार आहे.

भेपुपाकीबा त.

मोहॉकची रणदुंदुभी

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 15/05/2026 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या ‘‘मोहॉकची रणदुंदुभी‘‘चे कथानक ज्या प्रदेशात घडते त्याची थोडीशी माहिती आज देतो आहे...

पाभे की बात ४

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 14/05/2026 22:26 या दिवशी प्रकाशित केले.

पाभे की बात ४ 

मिटरों, 

मागच्या दोन बातांमध्ये आमचे मित्र विजूभाऊ यांनी परीक्षेचे पेपर फुटल्याने अर्थव्यवस्थेला कशी चालना मिळते तसेच कडक उन्हात शर्टच्या खिशात धुण्याची पावडर ठेवून शर्ट आपोआप धुवून निघेल अशी कल्पना दिली. त्यांचे आभार. 

तर मिटरों, 

सुट्टीतलं शिबिर- आनंदाचे डोही आनंद तरंग!

लेखक मार्गी यांनी बुधवार, 13/05/2026 23:59 या दिवशी प्रकाशित केले.

✪ एक, दोन, तीन... “बाय!” ✪ थक्क करणारी मुलं आणि त्यांचा उत्साह ✪ निसर्ग रहस्ये उलगडणार्‍या व मुलांची "नस जाणणा-या" डॉक्टर स्नेहलताई ✪ किडे, वनस्पती, पानं, खेकडे अन् काजव्यांचं अद्भुत जग ✪ मुलांसोबत मोठ्यांचं लहान होणं आणि शिकणं ✪ पुस्तकवेडे आणि हॅरी पॉटरचे भक्त गण ✪ खजिन्याचा शोध आणि सोबत केलेली धमाल ✪ चंद्र- सूर्य, तारे आणि दोन गुरू ✪ “तुमच्यासाठी पण आईस्क्रीम आहे!” ✪ अविस्मरणीय जोडसाखळी, विष- अमृत आणि लंगडी नमस्कार. नुकतंच मुलांसाठीचं अडीच दिवसीय शिबिर शिळिंबमधल्या अंजनवेलला झालं. मुलांचं शिबिर घेण्याचा अनुभव खूप आनंददायी आणि वेगळा होता.

पाभे की बात ३

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 13/05/2026 19:12 या दिवशी प्रकाशित केले.

पाभे की बात  ३

मितरों, 

परिक्षेचे पेपर फुटले तर त्याच्या उडणार्या तुकड्यांनी विद्यार्थी जखमी होतात. 


त्यामुळे पेपर फुटण्यापेक्षा लीक झाले तर चालेल, त्यात ते कुणाला लागून जखमी होण्यासारखे नुकसान नाही होत. 

भेपुपाकीबा त. 

#पाभे_की_बात

पाभे की बात २

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 13/05/2026 08:52 या दिवशी प्रकाशित केले.

पाभे की बात २

मितरों,

सूर्य अकाशातून आगीचे गोळे फेकतो आहे. तापमान असह्य झाले आहे. का नाही या संधीचा फायदा घ्यावा? (क्यूं न इस मौके का फायदा उठाया जाय?)

रस्त्याने जातांना प्रत्येकाने छत्री घ्यावी. म्हणजे उन्हापासून संरक्षणही होईल आणि उन्हात फिरण्याचा आनंदही घेता येईल. वाहन न वापरल्याने देशाचे इंधन आणि पैसा वाचेल तो अजून एक फायदा आहेच.

भेटूया पुढील "पाभे की बात" मध्ये.

#पाभे_की_बात

सुपरमॅन

लेखक kool.amol यांनी मंगळवार, 12/05/2026 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
बायको किंवा नवऱ्याच नाव त्यांचे पार्टनर्स मोबाईल मध्ये काय म्हण
काव्यरस

दुध 'उतू' गेले .....

लेखक कर्नलतपस्वी यांनी मंगळवार, 12/05/2026 18:29 या दिवशी प्रकाशित केले.

 

पिशव्या शोधून काढून चावी घेतली...

येताना दोन किलो 'एक्स्ट्रा गोल्ड' घेऊन या...आणि हो, कारमधेच जा, ऊन खूप आहे. नाहीतर पेट्रोल वाचवायचे म्हणून जाल (बोंबलत) स्कुटीवर...

मी समजलो, ती सफोला गोल्ड तेला बद्दल बोलत होती. लोणचे घालायचे दिवस आहेत ना... 

लिफ्टमधे दहाव्या माळ्यावरच्या आजी भेटल्या. मोबाईलवर कुठलीतरी चित्रफित बघत होत्या. मला न बघता म्हणाल्या, "बरे झाले आगोदरच म्हाताऱ्यासाठी गुंजभर घेऊन ठेवलय!"

"ऑं?",  माझा प्रश्नार्थक चेहरा बघून पुढे म्हणाल्या, "आहो, मेल्यावर तुळशीपत्रा बरोबर तोंडात गोल्ड घालायला लागते ना!