उन्हाळ्याची सुट्टी लागल्यापासून शांताच एक काम हलक झाल होत, ते म्हणजे चंद्रीला चरायला नेण. दिगूने मोठ्या उत्साहाने ते काम अंगावर घेतलं होत. रोज दुपारी त्याचा मित्रांबरोबर कधी विटी दाण्डुचा डाव रंगत होता तर कधी पत्त्याचा. खेळ संपले की मग कैर्या, चिंचा पाडण, त्या मीठ लावून खाण आणि मग विहिरीत डुंबत बसण असा त्याचा उद्योग सुरु असे. संध्याकाळ झाली कि तो चंद्रीला घरी घेऊन येई. तोपर्यंत शांता कधी घर सारवून घेई, तर कधी दळण नीट करून ठेवायची. कधी बायका वाळवण करायला बोलवायच्या मग त्यांना जाऊन मदत करायची.
आजही असाच दिगू चंद्रीला रानाकड घेऊन गेला. त्याच्या पाठोपाठ शांता धुण घेऊन गेली होती.