Skip to main content

मै और मेरी घडी अक्सर ये बाते किया करते है ....

लेखक कहर यांनी सोमवार, 20/04/2015 या दिवशी प्रकाशित केले.
मै और मेरी घडी अक्सर ये बाते किया करते है .... "५.३० पहिला गजर झाला ५ मिनटात उठुया" "अरे दुसरा गजर झाला ? साला ५ मिनटात ६.१५ कसे वाजले " "६.३५ झालेत आताशी ? आज दाढी करायला वेळ आहे आपल्याला " "७.२५ वाजले ? बाप रे उशीर झाला .. आज राहू दे नाष्टा" "साला ५ मिनट झाले ७.३५ ची बस अजून आली नाही " "साला २ मिनट आधी पोचलो असतो तर ७.५९ बदलापूर सापडली असती " "नालायक लोक १ मिनट वाट पहात नाहीत, लगेच गाडी सोडतात" "१२ ला जेवण आणायला गेला आहे ऑफिस बॉय १.३० वाजला अजून आला नाही " "बॉस आज ५ मिनिट लवकर गेला तर आपल्याला टाईमात ६ वाजता निघता येईल " "अरे जायच्या १ मिनिट आधी काम आठवते साल्यांना, आजपण ६.१९ सुटणार वाटत" "अरे १/२ तास ट्राफिक मध्ये अडकलोय आज घरी पोचायला ९ च वाजणार" "१०.३० झाले .. जेवण करून येऊ नाहीतर मेस बंद होईल" "१२ वाजले झोपले पाहिजे .. नाहीतर उद्या परत उठायला उशीर " "५.३० पहिला गजर झाला........
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1764
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

लगता है, सब की घडियाँ ऐसे ही बात बातें किया करती हैं|

६.३० ते ७ या वेळात प्रत्येक ५ मिनिटाला गजर वाजून सुद्धा मी ८ च्या आधी उठत नाही . . घडी घडी प्रोब्लेम देतो साला हा गजर .