रात्र...!!!!!
लेखनविषय:
केली लाख आर्जवे
तरी सांज हात सोडवून गेली
नको नको म्हणताना
मला ह्या रात्रीस बांधुन गेली
मिटले सारे नकाशे
सार्या दिशा विझुनी गेल्या
होता जिचा दिलासा
ती सावलीही पळून गेली
येई काळोख अंगचटीस
लोचट वारा झोंबे तनामनास
उडताना घरावरी टिटवी
अंगभर शहारा टाकित गेली
मेघ नौबती झाडती
आसमंत गडगडाटी हासे
तो पोहचला वेशीवर
वर्दी दामिनी देऊन गेली
वाटे पळुनी जावे
तर तो दारी उभा ठाकला
मदतीस मारली आरोळी
त्याच्या हसण्यात विरुनी गेली
मग लेवुनी त्याची वासना
रात्र पसरली या माळराना
तो तोडित असता लचके
चांदणी हुंदका दाबित गेली
चंद्र लपला ढगाआड
आसमंत निशब्द झाला
मी फ़ोडित राहिले टाहो
अन वैरी रात्र रंगात आली
अखेर झाली उतरती ती रात्र
मग उगवली पहाट सुतकी
ऐकता व्यथा या उष्ट्या देहाची
माझी मलाच शिसारी आली
दिस झाला केविलवाणा
घरी सात्वंन करुन गेला
दररात्री का हिच शिक्षा?
अशी काय चुक झाली?
कधी संपेल का हा फ़ेरा?
देण्या उत्तर सांज हजर झाली
नको नको म्हणताना
पुन्हा या रात्रीस बांधुन गेली
वाचने
2503
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
हम्म
In reply to हम्म by पैसा
धन्यवाद्
वा!
कल्पना आवडली
झपाटलेली रचना !
In reply to झपाटलेली रचना ! by सस्नेह
+१
धन्यवाद्
थोडस कवितेविषयी.....
In reply to थोडस कवितेविषयी..... by एक एकटा एकटाच
अप्रतिम उतरली आहे..
In reply to अप्रतिम उतरली आहे.. by सस्नेह
धन्यवाद
लै डिप्रेसिंग झालयं!
वेधक
वेधक
छान कविता , आवडली
धन्यवाद