Skip to main content

सई

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी मंगळवार, 12/05/2015 10:17 या दिवशी प्रकाशित केले.
माझी सई तशी समजूतदार किती थकलो आहे ते पाहून किती गोड हसायचं ते निट ठरवता येतं तिला --- माझी सई तशी शहाणी आई आजारी असेल तर आईची आई होणं जमतं तिला --- माझी सई तशी डँबिस बाबा आईचे ऐकत नसेल तर बाबाची सासू होणंही जमतं तिला --- माझी सई तशी लब्बाड किती अन् कोणाला लोणी लावल तर किती अन् काय मिळेल हे पक्क ठावूक तिला --- माझी सई तशी बदमाष कोण रागावल्यावर किती भोकांड पसरायचे हे व्यवस्थित माहीतीये तिला --- माझी सई तशी निरागस शुभ्र केकवरची लालचुटुक चेरी मिळवायला किती रुसायचं हे कळतं तिला --- माझी सई तशी हुशार बाबा रागवला तरी बाबाचं प्रेम समजतं तिला --- माझी सई आज आठ वर्षांची झाली.... |- मिसळलेला काव्यप्रेम

खंत

लेखक सौन्दर्य यांनी सोमवार, 11/05/2015 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी, ब्लड रिपोर्टसाठी इथल्या ‘मेमोरिअल हर्मन’ हॉस्पिटलच्या पॅथॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये सकाळी ९.३० वाजता पोहोचायचे होते. हॉस्पिटल घरापासून अंदाजे सहा मैलावर असून ड्राईव्ह टाईम अंदाजे ३० मिनिटांचा होता. हॉस्पिटलमध्ये वेळेवर पोहोचण्यासाठी जरा लौकरच म्हणजे साडेआठच्या सुमारास घरून कारने निघालो. वाटेत एका सिग्नलजवळ अपघात झाला होता, फार काही झाले नव्हते, फक्त एका कारने पुढील कारला मागून ठोकले होते. इथल्या प्रथेनुसार दोन्ही गाड्या रस्त्यावरच उभ्या होत्या, पोलिसांनी बाजूची लेन देखील अडवून ठेवली होती.

जकार्ताच्या आठवणी : २ : प्रथम दर्शनी

लेखक आकाश खोत यांनी सोमवार, 11/05/2015 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
मी मलेशियन एअरलाईन्सच्या विमानामध्ये मुंबईहून जकार्ताला निघालो. या विमान कंपनीच्या एमएच 370 विमानाच्या आताच्या घटनेमुळे बरेच लोक या नावाला घाबरतात. अनेकजणांनी मला इशारा दिला. मीसुद्धा सतर्क होतोच. पण शेवटी अशा घटना घडत राहतात, म्हणून आपण काही त्या गोष्टी करणे थांबवू शकत नाही. मुंबईमध्ये सीएसटीवर हल्ला झाला होता, पण लोक तेथे जाणे थांबवू शकत नाहीत, पुण्यातसुद्धा जेएम/एफसी रोडवर हल्ला झाला होता, आणि अजूनही ती वर्दळीची आणि लोकप्रिय खरेदीची ठिकाणे आहेत. एमएच 370 तर अजूनही एक गूढ आहे. सुदैवाने, माझा पुढचा प्रवास सुरक्षित आणि आनंददायी होता. माझे पहिले विमान मध्यरात्री मुंबई ते क्वालालंपूर असे होते.

अट्टाहास

लेखक रातराणी यांनी सोमवार, 11/05/2015 15:54 या दिवशी प्रकाशित केले.
आना वॉक करून परत आली आणि रोजच्या सवयीने तिने सगळ्या खिडक्यांचे पडदे बंद केले. म्हणजे ती अंधाराला घाबरत वगैरे नाही पण असा खिडकीतून बाहेर बघितल्यावर दिसणारा काळोख तिच्या अंगावर येतो. मोठ्या हौसेन, एकांतात राहायचं म्हणून ती या घरी राहायला आली. दिवसा उजेडी छानच वाटत ते. छोट्याशा टेकडीवरच टुमदार घर, समोर पसरलेला विशाल समुद्र, त्याच्या काठावर डोलणारी नारळाची झाडं, अगदी चित्रात असतं तसच! पहिल्याच भेटीत प्रेमात पडली ती या घराच्या. तिच्या या विचाराच हल्ली तिला स्वतःलाच हसू येत. पहिल्याच भेटीत ती कुठल्या मुलाच्यादेखील प्रेमात पडली नाही. पण या घरी आली आणि तिला वाटल, आपलीच वाट पाहत थांबल होतं इतके दिवस.

कधी येईल आठवण माझी .....

लेखक psajid यांनी सोमवार, 11/05/2015 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
बघशील कधी आठवांना, असशील जिथे तिथे तू, हसशील मनी गालांत, असशील जिथे तिथे तू ! स्पर्श नजरेचा होता, फुललेले अंगी रोमांच, जपशील सदा मनांत असशील जिथे तिथे तू ! सांगत वाहील झरा, माझे शब्द न शब्द, सोडशील श्वास उदासी असशील जिथे तिथे तू ! भेट तुझी माझी मोहोरल्या नभांखालची, फुलतील ते क्षण पुन्हा असशील जिथे तिथे तू ! सांगतील कुणी विरुद्ध, माझ्या चार शब्द, उठशील मैफल टाकून असशील जिथे तिथे तू ! विसरण्यां नाव “साजीद” करता कधी प्रयत्न चुकतील हृदयताल तेव्हा, असशील जिथे तिथे तू ! - साजीद यासीन पठाण

खराब दिवस

लेखक सुबोध खरे यांनी सोमवार, 11/05/2015 00:20 या दिवशी प्रकाशित केले.
खराब दिवस परवा सकाळी मी दवाखान्यात गेलो. सकाळी तीन रुग्ण पाहिल्यानंतर एक चार महिने गरोदर असलेली तरुणी सोनोग्राफी करता आली होती. तिची सोनोग्राफी करताना मला असे लक्षात आले कि तिच्या मुलामध्ये मोठ्या प्रमाणावर दोष आहेत. मुलाच्या मानेला सूज होती(cystic hygroma), हृदयाच्या रचनेत मोठ्या प्रमाणावर बिघाड होता. मुलाच्या नाळेत शुद्ध रक्ताची एकच रक्त वाहिनी होती. (साधारणपणे दोन असतात)( single umbilical artery). मेंदूच्या रचनेतही बिघाड वाटत होता. मी बराच वेळ सोनोग्राफी करत होतो त्यावरून त्या जोडप्याला काही तरी गडबड आहे हे जाणवले. सुरुवातीला तिचा नवरा सारखे प्रश्न विचारत होता.

स्वच्छंद - ३

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 10/05/2015 23:33 या दिवशी प्रकाशित केले.
स्वच्छंद - १ स्वच्छंद - २ पोपटांचे व्यक्तिचित्रण करयला खूप मजा आली. पोपटांचे वेगवेगळे आविर्भाव, मुद्रा खरोखरच मोहक होत्या.

पुण्यात येणार कुवेतचे शेख :)

लेखक टवाळ कार्टा यांनी रविवार, 10/05/2015 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यात येणार कुवेतचे शेख :) गेल्या आठवड्यांत व्हाट्सप्प वृत्तसंस्थेकडून हाती आलेल्या बातमीनुसार कुवेताचे एक शेख (जे मुळचे मराठी आहेत...आणि मिपाकारांमध्ये "पनीर"बाबा असे सुपरिचित असलेले), यांस "घर वापसी" करण्याची ओढ़ लागली आहे. त्यांनी त्यांच्या घर वापसीसाठी सध्द्या सुरु असणारा मे महीना नक्की केलेला आहे. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार, दिनांक ६-जून-२०१५ रोजी सकाळी पुण्यनगरीतसुद्धा त्यांचे आगमन अपेक्षित आहे.

जरुरत है, जरुरत है......

लेखक शिव कन्या यांनी रविवार, 10/05/2015 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
मुल्ला नसरुद्दिन करडी दाढी [स्वतः ची] कुरुवाळीत, निवांत गप्पा छाटीत बसला होता. गप्पा मारता मारता मित्राने विचारले, “ नसरुद्दिन, तू कधी लग्नाचा विचार नाही का केला?” नसरुद्दिनची दाढी हसली. म्हणाला, “केला तर! कधीकाळी आम्ही पण तरुण होतोच कि! एकदा मी निश्चय केला - आपण स्वतः साठी एक आदर्श स्त्री शोधायची आणि तिच्याशी निकाह लावायचा. ठरवले. निघालो. वाळवंट ओलांडून दमास्कसला पोहचलो. नशीब बलवत्तर. तिथे एक स्त्री भेटली. अत्यंत देखणी. धर्मपरायण. संपूर्ण कुराण तोंडपाठ असलेली!” “मग?” “पण..... तिला काव्यशास्त्रविनोदातले ओ कि ठो कळत नव्हते. आणि व्यवहारज्ञान म्हणशील तर, शून्य. काय करायचीय अशी बेगम?