क्षणभंगुरता
आज तूही जगात आहेस
आज मीही जगात आहे
आपल्यात काहीतरी बिनसलंय
हे दोघांनाही ज्ञात आहे
कधीकाळी जुळली होती आपली मने
मग दिसू लागले फक्त एकमेकांचे उणे
वाढत्या अंतराने दुरावतच गेलो
आयुष्याच्या प्रवाहात वहावतच गेलो
आज मागे वळून पाहताना वाटतंय
की नसतं झालं असं तर बरं झालं असतं
दबलेल्या अगणित भावनांचं ओझं
इथपर्यंत वागवावं लागलं नसतं
उद्या कदाचित तूही नसशील …. किंवा मीही नसेन
तरीही असंच अव्याहत चालू असेल जग
क्षणभंगुर आयुष्य आहे हे आपलं
हे राग लोभ कशाला हवेत मग?
सगळं सोडून देऊन बघू एकदाच
जसं काही झालंच नाहीये
मी तयार आहे विसरायला मागचं
पण दोन पावलं तूही पुढे ये !!
विश्वास आजूबाजूंच्यावरचा
पोट गहीवरुन आले
वात गेला निसटून
दोष कुणाचा लपवण्यास
गवाक्ष खुले हे झाले
गुन्हा केला कोणी
आरोपी कुणा ठरवावे
बालंट ते नाकारण्यास
सगळेच भोळे झाले
चर्चा केली त्यांनी
संशयित शोधण्याचे ठरले
ढोंग सारे रचण्यात
मग लोकही कडवे झाले
चौकश्याचें सत्र होते
आरोपी सर्वत्र होते
कोठुनी गंध तो आला
रोख मात्र इतरत्र होते
हायसे झाले 'निरागसाला'
नाव कल्लोळी वाचले
संशयात हरले सगळे
पण त्याचेही सोहळे झाले
काव्यरस
रॉ मँगो राईस (कैरी-भात)
वन लायनर्स
कधी काळी लिहिलेले माझे वन लायनर्स येथे देत आहे. आज काळ थोडा टाईम मिळत आहे मिपा वरती वाचन आणि लिखानासाठी त्यामुळे छान वाटत आहे.
कधी काळी एक कादंबरी लिहित होतो, परंतु ती कादंबरी अपुर्ण राहिली ती राहिली.. कादंबरी लिहिणे आपल्याला अशक्य असे वाटते आहे..तो आपला प्रांत नाही उगाच २-३ भाग लिहिले आणि मिपावर वर पण दिले होते .
असो एखादे वाक्य आवडले तर जरुर सांगा
वन लायनर्स :
१. "समर्थन हे चुकीच्या गोष्टींना लागते, जे बरोबर असते ते शास्वत असते त्याला आधाराची गरज नसते."
२.
पुण्यनगरी बद्दल माहिती हवी
पुढच्या बुधवारी वडोदराहून काढता पाय. गुरुवारी सकाळी पुण्यनगरीस आगमन.
गुरुवार आणी शुक्रवारी कामं उरकून जवळजवळ शुक्रवारी दुपारी मोकळा होइन, ते रवीवार रात्र पर्यंत.
आता हे दोन ते अडीच दिवस कसून उपयोगात घ्यायचे.आणी पूर्ण 'पुणे' पाहायचे.
पुण्यात मी दुसर्यांदा-असं म्हटलं तर पहिल्यांद्याच- कारण पहिल्यांदा जवळजवळ तीस वर्षां पूर्वी आलो होतो.
त्या वेळी काही पाहणं जमलं नाही म्हणून- पहिल्यांदाच येत आहे.
तरी मान्य पुणेकरांनी शहरा बद्दल तपशीलवार माहिती द्यावी.
अगदी वेळपत्रकासह माहिती दिल्यास कमी वेळात जास्त पहाणी होउ शकेल.
कट्टा प्रकार त्या दरम्यानास कुठे जमणार आहे का ..?
तोरणा / प्रचंडगड रात्रीचा ट्रेक
आकाश खोत यांचा तोरणा रात्रीचा ट्रेक वाचत असताना दुपारचे १:३० वाजले (आमची ऑफिस मधली जेवणाची वेळ ). जेवताना गिरीश ने कुठे तरी ट्रेक काढ असे सुचवले, मी सुद्धा लगेच तोरणा रात्रीचा ट्रेक (१ रात्रीचा ) आणी तोरणा ते रायगड (२ दिवसाचा ट्रेक ) सुचवला. आमच्या दोघांसाठी हा दोन्ही ट्रेक नवीनच …।
मि.पा. वरून आकाश खोतचा पूर्ण लेख वाचला. गुगल जालावरून सुद्धा माहिती गोळा केली, परत दुसऱ्या दिवशी जेवताना सर्वांसमोर विषय छेडला, तर बहुतेक जणांनी रात्रीचा ट्रेक अवघड कसा, चकवा कसा होतो हेच सांगितले. पण आमचा निश्चय दृढ होता, काहीही झाले तरी ट्रेक करायचा.
सुन्न करणारी झाडाझडती
नुकतीच माझी विश्वास पाटीलांची "झाडाझडती" हि कादंबरी वाचून झाली. आणि मी शीर्षकात लिहिल्याप्रमाणे या कादंबरीने मला सुन्न करून सोडले. जांभळी नावाच्या एका गावात धरण होऊ घातलेलं असतं.
विश्वास वासावरचा
आमची पेरणा
अर्थात शब्दानुज यांची क्षमा मागुन....
रोज पुन्हापुन्हा तो ढुसक्या सोडतो
समोरचा नाईलाजाने नाकावर हात दाबतो
हजारो वर्षांपासुन तो त्या सोडतो
आणि दिवसभर पोट दाबून कळा सोसतो
खरेतर प्रत्येकाच्या शरीरातून ती बाहेर पडत असते
पण काहिंचे अस्तित्व नुसत्या वासावरुन ओळखता येते
पवनाच्या रुपातुन तो बाहेर पडतो
पोटाबरचे प्रेशर थोडेसे हलके करुन जातो
प्रत्येक श्वासातुन तो नाकात घुसू पहातो
श्वासाशिवाय थोड्या वेळानंतर जीव घुसमटतो
काहीजण उगाचच लाजुन कायमचुर्ण घेतात
वासहिन श्वासाची कामना करतात
तो आला की चहुकडे वास दरवळात राहतो
सेंटच्या
मिसळपाव
