Skip to main content

फाटक्या

लेखक अद्द्या यांनी गुरुवार, 28/05/2015 23:59 या दिवशी प्रकाशित केले.
३-४ दिवस मस्त सुट्टी जुळून आली होती . . आणि पुढे आम्ही टाकली होती . . गेले ८ महिने निस्ते काम काम काम याच्यातच घालवले होते . अगदी रविवारी पण काहीना काही काम काढून एक्स्ट्रा पैसा मिळवण्याच्या मागे होतो . पण आता कंटाळा नुसता भरून राहिला होता सगळी कडे . सो . बेंगलोर ला जायचं ठरलं . कॉलेज ची १-२ कार्टी होतीच तिथे . त्यांना फोनाफोनी झाली . आणि २ दिवस बेंगलोर -मैसूर ट्रीप . आणि एक दिवस त्यांच्या रूम वर बसून ओल्ड मंक आणि तंदुरी चिकन ची आराधना . असा फक्कड प्रोग्राम ठरला होता . . त्याप्रमाणे बुधवार संध्याकाळी मी न आकीब बस मध्ये चढलो होतो . हा माझा शाळेपासूनचा मित्र . .

सज्जनगड - एक जुनी आठवण

लेखक प्रसाद गोडबोले यांनी गुरुवार, 28/05/2015 21:07 या दिवशी प्रकाशित केले.
( फार पुर्वी कधी तरी लिहिले होते हे ललित ! कालपरवा जुना ब्लॉग चाळत होतो तेव्हा सापडले ! पुनःप्रत्ययाचा आनंद जाहला !

अक्कल दाढ ????

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 28/05/2015 19:49 या दिवशी प्रकाशित केले.
(कथा आणि पात्र काल्पनिक आहे) काल दुपारी कार्यालयात एक विशिष्ट फाईल वाचत होतो. फाईल वाचत असताना आपली दाढ दुखते आहे ही जाणीव होऊ लागली. काही वेळातच दाढेचे दुखणे वाढू लागले आणि त्या बरोबर वेदनाही. डोक्यात गरगर सुरु झाली. अखेर वैतागून मी फाईल वाचणे थांबविले. ती फाईल लाल फितीत व्यवस्थित बांधून अलमारीत ठेऊन दिली. संध्याकाळी घरी आलो, दाढेच्या दुखण्यामुळे रात्री व्यवस्थित जेवता ही आले नाही. गरम पाण्यात मीठ टाकून गुळणे केले, लवंग ही तोंडात ठेवली. पण काही फायदा झाला नाही. सारी रात्र दाढेच्या दुखण्यामुळे तळमळत काढली. आज सकाळी ओळखीच्या दातांच्या डॉक्टरांकडे गेलो.

मिसिंग यु, सद्दाम !

लेखक सुधीर मुतालीक यांनी गुरुवार, 28/05/2015 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
इसीसच्या क्रूर कारवाया वाचल्या बघितल्या की भल्याभल्यांची भीतीने गाळण उडते. इसिसचा प्रभाव अगदी शेजारी कल्याण सारख्या ठिकाणा पर्यंत पोहोचेल असे स्वप्नात ही वाटले नव्हते. सिरीया, इराकची भयनगरी करून टाकलीय. बायकापोरींचं खेळणं करून टाकलंय. हवेतसे वापरतात आणि वाईट फेकून देतात. या पार्श्वभूमीवर सद्दामची हल्ली प्रकर्षाने आठवण येते. सद्दाम असता तर जग असे भयाच्या खाईत लोटू नसतं दिलं, इसीस आणि अलकाईदाला डोकं वरती काढू नसतं दिलं, ईराक आणि सिरीयाचा नरक नसता होऊ दिला ! पण सद्दामला फासावर लटकवून पृथ्वीवर एक नरक जन्माला घालून आख्या मानव जातीला वेठीस धरून अमेरिका बाजूला झालीय !!!

सफर तामिळनाडुची! - कुन्नुर (भाग ५)

लेखक पिलीयन रायडर यांनी गुरुवार, 28/05/2015 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ - प्रस्तावना भाग २ - रामेश्वरम आणि धनुषकोडी सफर तामिळनाडुची !- मदुराई (भाग ३) सफर तामिळनाडुची !- कोइंबतोर आणि टॉय ट्रेन (भाग ४) आम्ही कुन्नुरला उतरणार होतो. ३.५ तासाचा जादुई प्रवास अखेर संपला होता. पण आजुबाजुला नजर टाकल्यावर लक्षात आलं की ज्या जादू संपली नव्हती.. तर आता चहुबाजुला पसरली होती! कुन्नुर हे उटी जवळ अवघ्या २० किमी वर असणारे गाव. पण उटीपेक्षा फारच गोड्डुलं!!

माळशेजचे सौंदर्य अर्थात ३००० फुटी भोजगिरीची कातळभिंत

लेखक सतीश कुडतरकर यांनी गुरुवार, 28/05/2015 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
माळशेजचे सौंदर्य अर्थात ३००० फुटी भोजगिरीची कातळभिंत कल्याणपासून साधारण ९० किमी दूर कल्याण-नगर रस्त्यावर असलेला माळशेज घाट पावसाळ्यातल्या झिंगणाऱ्या खेकड्यांमुळे बराच कुप्रसिद्ध झाला असला तरी आमच्यासाठी मात्र हे दुर्दम्य इच्छाशक्तीचं तीर्थक्षेत्रच. माळशेज घाट म्हणजे डोंगर भटक्यांच्या उनाडक्या आणि पिकनिककरांसाठी पावसाळी 'ओली' सहल. या ओल्या सहली वाढल्यामुळे घाटात कचऱ्याच प्रमाण खूप वाढलं आहे. नाहीतरी माळशेज घाट विकणे आहे या धर्तीवर आपले निसर्गप्रेमी ''भ्रमंती''कर मिलिंद गुणाजी यांच्या जाहिराती फुटा-फुटावर आपल स्वागतच करतात.

शेतातला एक दिवस...

लेखक चिनार यांनी गुरुवार, 28/05/2015 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
'संसदेतला एक दिवस ' ह्या माझ्या आधीच्या लिखाणाचा दुसरा भाग म्हणून हा कल्पनाविस्तार प्रकाशित करत आहे. आधीच्या भागाचा दुवा खाली दिलेला आहे. http://www.misalpav.com/node/31437 युवराजांनी आता मनाशी पक्कं ठरवलं की काहीही झालं तरी जनतेतली आपली प्रतिमा सुधारायची. जनतेच्या प्रश्नांचा अभ्यास करायचा.ते प्रश्न सोडवून जनतेचा हिरो बनायचं. पण त्यांना नक्की सुरवात कोठून करावी हे कळत नव्हतं. या विचारात असतानाच कुठेतरी त्यांच्या वाचनात आलं की , भारत हा कृषीप्रधान देश आहे.

कारसाठी अ‍ॅक्सेसरीज कोणत्या घ्याव्यात?

लेखक टवाळ कार्टा यांनी गुरुवार, 28/05/2015 12:12 या दिवशी प्रकाशित केले.
कारसाठी अ‍ॅक्सेसरीज कोणत्या घ्याव्यात? नुकतीच एक सेकंडहँड Wagon-R Lxi कार विकत घेतली आहे...माझी पहिलीच कार :) त्यामुळे शिकणे सुरु आहे. कार घेतल्यानंतर नातेवाईकांनी + मित्रांनी बरेच सल्ले दिले...त्यातले बरेचसे कार अ‍ॅक्सेसरीजसाठी होते. कोणी म्हणाले बंपर प्रोटेक्टर लाव...तर कोणी म्हणाले लॅमिनेशन करून घे...कोणी म्हणाले फॉग लँप लाव, कारच्या बॅटरीवर चालणारा व्हॅक्युम क्लीनर घे,...ई. मी स्वत: www.amezon.in (Amezon fulfilled only) वर बर्याच अ‍ॅक्सेसरीज बघीतल्या आहेत आणि त्यातल्या काही घ्याव्याश्या वाटल्या त्या इथे लिहित आहे.

सळसळत्या रक्ताचा धगधगता ज्वालामुखी म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर

लेखक ganeshpavale यांनी गुरुवार, 28/05/2015 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती सळसळत्या रक्ताचा धगधगता ज्वालामुखी म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर

सळसळत्या रक्ताचा धगधगता ज्वालामुखी म्हणजे सावरकर ज्यांची लेखणी माझ्यासाठी नेहमीच आदरणीय, आणि वंदनीय.

स्वस्तिक ३ अंतिम भाग

लेखक शब्दानुज यांनी गुरुवार, 28/05/2015 08:57 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्वाध - स्वस्तिककडुन सापडलेल्या अोल्या चिठ्ठीवर मला माझ्याच विरहाचा कविता दिसतात. हेच स्वस्तिकला विचारल्यावर त्याकडुन यास अमान्यता. पुण्यालत्या पावसामुळे कागद ओले झाल्याचे म्हणणे. --------------------------------------- दुसर्या दिवशी माझ्या पुण्याच्या मावसभावाचा वाढदिवस होता.सकाळीच मावशिला मी फोन लावला. बाहेर बघितले तर पाऊस चालू झाला होता. "काय ग तिकडे काल खुप पाऊस झाला का? इथेही आत्ता चालु झाला आहे" " पाऊस ? कसाच काय! इकडे आठवडा झाला आभाळ कोरडेच आहे." त्याच क्षणी चिठ्ठी कशामुळे भिजली हे मला कळाले. थोड्यावेळाने कॉलेजला गेलो.