Skip to main content

भाव तेथे देव (असं म्हणतात खरं!!)

लेखक चलत मुसाफिर यांनी सोमवार, 25/05/2015 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
मनुष्यास्वभावाला औषध नाही हे सर्वविदीत आहे. जगाकडे पहाण्याचा दॄष्टिकोन हा प्रत्येकाचा वेगळा असतो. तसेच आयुष्याकडून कुणाला काय अपेक्षा असतील हे सांगणे कठीण आहे. कोणत्याही दोन व्यक्ती घ्या, वर नमूद केलेल्या बाबतीत फरक हा आढळणारच. कुणाच्या खांद्यावर काय ओझे असेल याचा अंदाज येत नाही. वरवर सामान्य वाटणारे हे स्वभावविशेष किती टोकाचा परिणाम घडवून आणू शकतात, हे दाखवून देणारा हा एक माझ्या वैयक्तिक आयुष्यात घडलेला अप्रिय प्रसंग आहे. जे झाले ते आनंददायक मुळीच नव्हते. तो कटु प्रकार संपूर्णपणे टाळता येण्याजोगा होता. जवळची माणसे त्यात गुंतली असल्यामुळे जास्त वेदना झाल्या.

वेगळ्याचं वेगळं नशीब

लेखक विनीत संखे यांनी सोमवार, 25/05/2015 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
ही पुस्तकं एक अजब गोष्ट आहे. मानवाच्या सर्व संभाषिक प्रकारांमधला सर्वात जास्त "हेकेखोर" प्रकार आहे हा … खरंच !!! माझे विचार, माझ्या संवेदना, माझा न्याय आणि माझाच निवाडा… माझ्या भिंगांमधूनच जग पहा … नाही आवडलं तर वेळीच प्रतिक्रिया द्यायची सोय नाही … पुस्तक पूर्ण वाचल्याशिवाय तर शक्यच नाही … लेखकाला सगळं छापून आल्यावर मग प्रतिक्रियांची पत्र , इमेल पाठवून काय उपयोग?

भांबर्डे – नवरा, नवरी आणि वऱ्हाड

लेखक सतीश कुडतरकर यांनी सोमवार, 25/05/2015 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
भांबर्डे – नवरा, नवरी आणि वऱ्हाड लोणावळ्यापासून विसेक किलोमीटरवर असलेल्या सालतर खिंडीच्या पलीकडे आहे एक अद्भुत विश्व. किल्ले घनगड, एखाद्या टेबलवर ठेवलेल्या पेपरवेटप्रमाणे भासणाऱ्या तैलबैलच्या कातळ भिंती, या भिंतींच सौंदर्य निरखत तिच्याच पायाखाली विसावलेला सुधागड, निळेशार पाणी असलेला मुळशी धरणाचा जलाशय, भांबर्डे गावातील नवरा, नवरी आणि वऱ्हाड सुळके आणि त्यांना चोहोबाजूने आपल्या कवेत घेऊ पाहणारे उंचच उंच कडे, हा परिसर पाहताना अक्षरशः डोळयांच पारणं फिटते.

अजुनी दूर किनारे

लेखक अर्व यांनी सोमवार, 25/05/2015 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
उरलेत भाव काही संपलेत शब्द सारे संपला प्रवास केव्हाच अजुनी दूर किनारे जेथे मैफीली सुरांच्या होत्या कधी काळी सजली तिथे आता जखमांची मांदीयाळी भिजलेला श्रावणगंध वाहती अजूनी वारे ... संपला प्रवास केव्हाच अजूनी दूर किनारे ... वाटेतल्या फुलांनो रोखा श्वास तुमचे विपरीत अर्थ आहेत तुमच्या स्पंदनांचे क्षण शेवटाचा उशाशी तरीही गंध का रे? संपला प्रवास केव्हाच अजूनी दूर किनारे कवी :  निशांत तेंडोलकर ..
काव्यरस

चित्रकार पिंटू [बालकविता]

लेखक विदेश यांनी सोमवार, 25/05/2015 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
आमचा पिंटू चित्रकार छान चित्र काढताना पाठीची कमान .. जिराफाला असते गेंड्याची मान उंटाला दिसती हत्तीचे कान .. भूभूचे शेपूट सरळ असते हम्माचे शेपूट वाकडे दिसते .. मोरपिसारा कोंबड्याला असतो कोंबड्याच्या तुऱ्याचा पत्ता नसतो .. झुरळ असते काढलेले हातभर मिशा त्याच्या फक्त चिमूटभर .. इवल्याशा सशाला पाय कावळ्याचे सिंहाला नेमके पाय बगळ्याचे .. मुंगीचा डोळा वाघाला दिसतो घुबडाचा डोळा चिमणीला असतो .. चित्र रंगवताना डोलावतो मान म्हणतो स्वत:च "वा वा छान".. चित्रात भरताना विविध रंग स्वत:चे भरतो रंगाने अंग आमचा पिंटू चित्रकार छान मोठ्ठा झाल्यावर होणार महान .. ! .
काव्यरस

एक वर्षानंतर . . .

लेखक श्रीगुरुजी यांनी सोमवार, 25/05/2015 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
१६ मे २०१४ या दिवशी भारतात इतिहासाचे एक नवे पान लिहिले गेले. स्वतंत्र भारताच्या ६७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका तथाकथित उजव्या विचारांच्या, प्रतिगामी व जातीयवादी पक्षाने लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळविले. त्यापूर्वीच्या ६७ वर्षांपैकी जवळपास ५४-५५ वर्षे काँग्रेसकडे सत्ता होती. उर्वरीत १२-१३ वर्षांपैकी सुमारे ६ वर्षे भाजप आघाडीचे सरकार होते व ५-६ वर्षे जनता पक्ष, जनता दल इ. वेगवेगळ्या तथाकथित मध्यममार्गी, डाव्या, निधर्मी आघाड्यांचे सरकार होते. परंतु १६ मे २०१४ रोजी प्रथमच भारतीय जनता पक्ष या उजव्या, राष्ट्रवादी, जातीयवादी इ.

निव्वळ आणि नितांत सुंदर , किले पुरंदर

लेखक कहर यांनी सोमवार, 25/05/2015 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
धन्यवाद आपल्या साऱ्यांच्या मदतीसाठी. आपल्या माहितीच्या आधारे पुरंदर मोहिम शनिवारी फत्ते झाली. किल्ल्याबद्दल म्हणाल तर - " निव्वळ आणि नितांत सुंदर , किले पुरंदर" याहून दुसरे शब्द सुचत नाही. रस्ता माहित नसल्याने आणि रस्ता चुकायची जुनी सवय असल्याने जरा लवकरच म्हणजे सकाळी ६.३० ला घरातून निघालो, दुचाकीवरून हडपसर-दिवे घाट-सासवड-पुरंदर (गाव) करत किल्ल्याच्या माचीपर्यंत पोचायला ८:३० झाले. उन्ह फारसे नसल्याने प्रवास मस्त झाला. किल्ल्यावर प्रवेश ९ वाजता होतो असे तिथे समजले (ओळखपत्र आणि दुचाकीवर हेल्मेट अनिवार्य ). मग तोपर्यंत तिथेच TP केल. शनिवार असून फारसे पर्यटक दिसले नाहित.

"भयग्रस्त जाहलो आहे भयमुक्त जाहलो आहे "

लेखक कैलास गायकवाड यांनी सोमवार, 25/05/2015 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
मी मुक्त जाहलो आहे उन्मुक्त जाहलो आहे हळव्या कातरवेळेला संपृक्त जाहलो आहे (धृ) ही स्थिती कोणती आहे कोणती अवस्था आहे अस्ताव्यस्तच असण्याची कोणती व्यवस्था आहे भयग्रस्त जाहलो आहे भयमुक्त जाहलो आहे हळव्या कातरवेळेला संपृक्त जाहलो आहे (1) मी स्पर्श कराया आलो की स्पर्श व्हावया आलो उत्कटता होता होता उत्कर्ष व्हावया आलो आरक्त जाहलो आहे आसक्त जाहलो आहे हळव्या कातरवेळेला संपृक्त जाहलो आहे (2) डबडबल्या डोळ्यांसाठी मी पदर कोरडा असतो खट्ट्याळ बहाण्यांसाठी हलकेच ओरडा असतो पाखंड जाहलो आहे की भक्त जाहलो आहे हळव्या कातरवेळेला संपृक्त जाहलो आहे (3) --डॉ.कैलास गायकवाड

आकुर्डीला एक मिनी कट्टा करायचा का?

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 25/05/2015 08:54 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो, कसे आहात? सध्या माझा मुलगा आकुर्डीला आहे. सध्या तो "गणेश-तलावा" पाशी राहतो. त्याला भेटायला म्हणून मी आणि माझी बायको जात आहोत. मी आणि माझी बायको, २९-०५-२०१५ (शुक्रवार) ला आकुर्डीला येत आहोत.त्यादिवशी संध्याकाळी आकुर्डीला किंवा आकुर्डीच्या जवळपासच्या भागात कट्टा करायचा का? खर्च आपापला. कळावे, लोभ आहेच, तो ह्या कट्ट्याच्या निमित्ताने, अजून वाढावा अशी इच्छा. आपला, कट्टेकरी मुवि.

पोहू आनंदे.

लेखक नूतन सावंत यांनी सोमवार, 25/05/2015 08:48 या दिवशी प्रकाशित केले.
पन्नासाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने नवऱ्याने पार्टीचे आयोजन केले होते,एरवी आम्ही दोघातच साजरा करीत असू.नातेवाईक,मित्र मैत्रिणीफोनवरून ; आई ,पपा, भावंडे कधी भेटून कधी फोनवरून शुभेच्छा देत असत.तेव्हा आम्ही बांदऱ्याला रहात असू.कोरम फुल होता.मजा चालली होती.जावा, नणंद,वहिन्यांनी ओवाळले.केक कापला.पार्टी सुरु झाली. अचानक माझ्या मनात विचार आला.”पन्नास!