Skip to main content

म रा.वि.म.मं. मधील एक दिवस

लेखक शि बि आय यांनी मंगळवार, 26/05/2015 17:52 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमी प्रमाणे लोकलचे धक्के खाउन स्टेशनवर उतरलो आणि हुश्श केले. बुधवार असल्यामुळे अजून दोन फक्त दोन दिवस रेटायचे आहेत त्यातच बॉस नामक प्राणी दोन दिवस गायब असणार आहे ह्या सुखद कल्पनेमध्ये डुलत डुलत घरी आलो. घरी येताना आजूबाजूचा परिसर थोडा वेगळा वाटला खूप काहीतरी मिसिंग असल्यासारखे वाटले नंतर लक्षात आले. वीज नामक गोष्ट जी नित्यानेमाने सगळ्या घरात आपली उपस्थिती लावत असते ती गायब आहे( हाय मेरी फुटी किस्मत !) आता मेणबत्ती शोधण्यापासून सुरुवात करावी लागणार ह्याची मानसिक तयारी केली. पण म. रा . वि. म. मं. ने एक सुखद धक्का दिला घरी पोचायच्या आत वीज आली(?). चला सुटलो म्हणत घरी पोचलो ….

उडदांमाजी....

लेखक सस्नेह यांनी मंगळवार, 26/05/2015 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
‘मॅडम, बाहेर काळे म्हणून एकजण भेटायला आलेत. येऊ देत का ?’ दहा मिनिटापूर्वीच मी शिपायाला बजावलं होतं, मिटिंगचं काम आहे, एक तास कुणाला आत सोडू नको. आणि दहाच मिनिटात कोण काळे उगवला ? मी कपाळाला दोन सुरकुत्या पडून विचार केला. काळे नावाची कुणी व्यक्ती डोळ्यासमोर येईना. ‘थोडा वेळ थांबा म्हणावे..’ मी म्हटले. इतक्यात शिपायाच्या मागून एक ओळखीचा चेहेरा उगवला. ‘मॅडम, येऊ का आत ?’ ‘अरे, तुम्ही होय, काळे ? या, या ना !’ काळेला बघितल्याबरोब्बर माझी बत्ती पेटली. तीन वर्षापूर्वी माझे सोलापुरातल्या एका तालुक्याच्या गावी पोस्टिंग झाले असताना तिथे माझ्या हाताखाली दोन शाखा अधिकारी होते. हा काळे आणि दुसरा गोरे.

संसदेतला एक दिवस !

लेखक चिनार यांनी मंगळवार, 26/05/2015 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
सदर लिखाण काल्पनिक नसून त्याचा कोणत्याही जीवित किंवा मृत व्यक्ती किंवा घटनेशीसंबंध आढळल्यास तो अजिबात योगायोग समजू नये ! स्थळ : संसद भवन युवराजांची आलिशान गाडी संसद भवनाच्या मुख्य दरवाजातून आत आली. आज युवराज ड्रायव्हरला बाजूला बसवून स्वत: गाडी चालवत होते. सवयीप्रमाणे त्यांनी गाडी त्यांच्या नेहेमीच्या जागी पार्क करायला नेली. पण काय आश्चर्य ! त्या जागी दुसऱ्याच कोणीतरी गाडी पार्क केली होती. युवराज : माझ्या जागेवर गाडी कोणी लावली आहे ? ड्रायव्हर : साहेब..ती पंतप्रधानांची गाडी आहे. ही जागा पंतप्रधानांच्या गाडीसाठीच आरक्षित आहे. युवराज : असेल..त्याने काय फरक पडतो.

भागो जनता भागो

लेखक अनुप७१८१ यांनी मंगळवार, 26/05/2015 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली म्हणजे गेले ५-६ महिने मला "मॅरॅथॉन" चं वेड लागले आहे...अर्थात हे वेड चांगलेच आहे म्हणा.. तसा मी जॉगिन्ग ला अनेक वर्ष जातो पण प्रत्यक्ष मॅरॅथॉन मधे भाग घ्यायचा योग आला नव्ह्ता. किंबहुना मी सेरियसली त्याकडे बघितलेच नव्हते. मुम्बई मधे स्टॅन्डर्ड चार्टर्ड मॅरॅथॉन गेले कही वर्ष होत आहे. तसेच इतरही दर महिन्यात कुठे ना कुठे तरी मॅरॅथॉन आयोजित केली जाते. धावण्यात फार आनंद आहे. स्वत:शीच स्पर्धा लावण्यात मजा येते. गेल्या वेळचा रेकोर्ड पुढिल वेळी मोड्णे हेच एक ध्येय घेऊन धावायचे. अनेक ५०-६०+ वयोगटातील लोकही हिरिरीने या शर्यतीत भाग घेत असतात. त्यांना धावताना बघून थक्क व्हायला होते.

वकिल

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 26/05/2015 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
एम.आय.डी.सी ला असताना एक चपळगावकर नावाचा मित्र होता .. पेशाने वकिल पण वकिली चालली नाहि म्हणुन जोब भादरायच काम करायचा एका लहानश्या शेड मधे...... . गप्पात एकदा त्याने सांगीतले...आपल्या कडे आपला कायदा नाहि.सायबाचा कायदा आपण उधार घेतला व त्याला " ईंडियन पिनल कोड" असे नाव देत तो आपण वापरत आहोत.. सायबान कायदा लिहिताना भारतिय माणुस मुळात चोर मनोवृत्तिचा आहे असे गृहित धरुन कायदा लिहिला आहे.... . कश्या वरुन? असे विचारतात त्याने उदाहरण दिले..... . रेल्वेत इमरजंसी च्या वेळी चेन खेचण्याची सोय असते ज्या मुळे गाडी थांबते....

स्वस्तिक

लेखक शब्दानुज यांनी मंगळवार, 26/05/2015 00:33 या दिवशी प्रकाशित केले.
खुप वर्षापुर्विची नव्हे तर अगदी अलिकडची गोष्ट आहे.रम्य पहाटेची वेळ. मंद गार वारा वाहतो आहे आणि अशावेळी काहीच घडत नाही. सर्व गोष्टींची सुरवात रम्य पहाटेने व्हावी असे काही नाही.असो. रात्र्ी मित्र्ांसोबत[फक्त मित्रच हं] फिरताना नेहमीप्रमाणे अचानक मोबाईल वाजला.फोन अक्षयचा. "स्वस्तिकला बघितल का बे?" " नाय बा काय झाला?" "अरे ते येड्याxx कालपासुन गायब आहे." माझ्या पायाखालची वाळुच काय दगड माती सगळच सरकलं. " घरच्यांशी भांडुन गेला तो आलाच नाही अजुन. आत्ता फोन केलो तेव्हा कळालं." " मग आता?" " ए मंद बुद्धी सुंद काम निघ आणि माझ्या घरी ये." गाडीवरुन लगेच निघालो.

सफर तामिळनाडुची !- कोइंबतोर आणि टॉय ट्रेन (भाग ४)

लेखक पिलीयन रायडर यांनी सोमवार, 25/05/2015 21:19 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ - प्रस्तावना भाग २ - रामेश्वरम आणि धनुषकोडी सफर तामिळनाडुची !- मदुराई (भाग ३) खरं सांगु का.. कोइंबतोर विषयी मला काहीच माहिती नाही! आम्ही इथे दोनच कारणांसाठी गेलो, एक तर दिर कुठे रहातो, काय काम करतो वगैरे पहायला आणि दोन म्हणजे साड्या! दिराची रुमच मुळात कोइंबतोरच्या बाजारपेठेत असल्याने काही फिरायचा योगही नाही आला. सकाळी उठलो, दणकट सौदेंडियन नाश्ता केला आणि दुकानांमध्ये घुसलो!

श्रीमंत: शतशब्दकथा

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी सोमवार, 25/05/2015 19:40 या दिवशी प्रकाशित केले.
आज अक्षयतृतीया म्हणजे साडेतीन मुहुर्तांपैकी एक. त्यामुळे आज ते प्रसिद्ध दुकान लवकर उघडलेलं होतं. अगदी सकाळी सात वाजल्यापासुन लोकांनी दुकानामधे गर्दी करुन गोडा-धोडाचे पदार्थ खरेदी करायला सुरुवात केलेली होती. त्याची सरावलेली बोटं सराईतपणे नोटा आणि व्यवहार हाताळत होती. दुपारी दुकान बंद करायची वेळ झाली तसा त्याचा ५,१३,०००/- रुपयांचा हिशोब तयार होता. मालकाकडे पैसे आणि हिशोबाची यादी देउन तो दुकानातुन बाहेर पडला आणि घराकडे निघाला. वाटेत त्याला एका कुडमुड्या हलवायाचं दुकान लागलं आणि त्याला मुलांची आणि म्हातार्‍या आईची आठवण झाली.