मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आकुर्डीला एक मिनी कट्टा करायचा का?

मुक्त विहारि · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
नमस्कार मिपाकरांनो, कसे आहात? सध्या माझा मुलगा आकुर्डीला आहे. सध्या तो "गणेश-तलावा" पाशी राहतो. त्याला भेटायला म्हणून मी आणि माझी बायको जात आहोत. मी आणि माझी बायको, २९-०५-२०१५ (शुक्रवार) ला आकुर्डीला येत आहोत.त्यादिवशी संध्याकाळी आकुर्डीला किंवा आकुर्डीच्या जवळपासच्या भागात कट्टा करायचा का? खर्च आपापला. कळावे, लोभ आहेच, तो ह्या कट्ट्याच्या निमित्ताने, अजून वाढावा अशी इच्छा. आपला, कट्टेकरी मुवि.

वाचने 18951 वाचनखूण प्रतिक्रिया 124

नाखु Mon, 05/25/2015 - 09:52
उपस्थित. आज्ञाधारक विद्यार्थी नाखु बाक क्रं ४ (बुवा+बॅट्या जागा पकड्ली आहे) टोट्ट्ल ३ बाकडी पकडलीयेत येताना धन्या+सूड्ला घेऊन येणे.

In reply to by नाखु

दुत्त दुत्त नाखुकाका :-\ आमची जागा पकडली नसली तरी ऐनवेळेला येवुन गोंधळ घालुन मवाळ विद्यार्थ्यांची जागा ढापण्यात येईल !!

अमृत Mon, 05/25/2015 - 10:00
कृपया सविस्तर माहिती द्यावी अर्थातच सगळं ठरल्यावर.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

शॅ ... मी म्हणत होतो थर्मॅक्स चौकात वैशालीला बसु , नंतर पन्हाळगड ला तांबडा पांढरा , मटन भाकरी वढु!!

In reply to by प्रसाद गोडबोले

पन्हाळगड पुढच्या विकांताला प्लान करु रे. अन्या पण असेल म्हणजे. मग तु, मी, वल्ली, अन्या आणि अजुन कोणी विंट्रेस्टेड कँडीडेट असतील तर जाउ तिकडं. पण चिकन मिळतं का तिकडे? मी मटण खात नाही.

नाखु Tue, 05/26/2015 - 08:33
पिंची आपलाच असा. दोन ठिकाणे सुचवित आहे. सगळ्यांनी अगोदर एकत्र भेटून ओळख्-परेड तसेच एकमकांची वास्त्-पुस्त यासाठी एखादी बाग ( प्राधिकरणात=आकुर्डी दर पेठेत एक तरी बाग आहेच) त्यानंतर जवळच खादाडी कारेक्रम अशी रूपरेषा ठरवावी असे वाटते.

सर्व प्रकारच्या सूचना/दुरुस्त्या स्वागतार्ह

रूपरेषेचे फायदे:
  • सार्वनीक बाग असलेने स्नेहसंमेलनास कुठलेही जागा अडचण राहणार नाही. (मितान तै आणि कॅप्ट्न जॅक* स्थानीक नगरसेवक असल्याने जागा सुचवावी)
  • खादाडी ठिकाण कट्ट्याजवळच असावे म्हणजे वेळ वाचेल व अचानक आणी हुकुमी उशीरा येणारे थेट भोजनरणांगणी पोहोचतील.

In reply to by मितान

हो चालणेबल आहे. मुविन्ना सुद्धा डी.वाय. पाटीलपासुन जागा जवळ आहे. पण मला तिथे यायला किमान संध्याकाळचे ६.३० ते ७.०० वाजतील ह्याची नोंद घ्यावी.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

नाखु Tue, 05/26/2015 - 12:52
अन्यागिरी* करू नै. धन्य+वाद (वाद न घातल्याबद्दल धन्य) नाखुस *कट्टा आयोजक असून ऐन्वेळी टांग मारणेसाठी मराठी अपशब्दकोषातील अलिकडची भर.

In reply to by मुक्त विहारि

स्त्री सदस्या पण येणार असल्याने...अपेयपान विरहित ठिकाण असेल तर उत्तम.
स्त्रीया दारु पीत नाहीत काय ?

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन Wed, 05/27/2015 - 16:38
अल्कोलाहली बहुलचुडा ग्लासकिण्किणी लाफ्टरचिवडा पाकिट आणिक पर्सहि येई यद्यपि पिउनी 'आ'वासि बुढा

गणेशा Tue, 05/26/2015 - 13:35
३०,३१,१ ला बाहेर जात आहे, त्यामुळे २९ ला जमेल की कसे लगेच सांगता येइना, तरी १०० % प्रयत्न करेल. पुणे गेट हॉटेल करा की राव एकदा परत.. पुणे गेट असेल तर फॅमिली सोबत येइल.. नाही तर एकटा मारेल चक्कर ..

In reply to by गणेशा

सूड Tue, 05/26/2015 - 15:40
पुणे गेट हॉटेल करा की राव एकदा परत..
हातभर सुरमई खाण्याच्या एकट्याच्या हौसेखातर बाकी सगळ्यांना भुर्दंड कशाला? =))))

In reply to by सूड

गणेशा Tue, 05/26/2015 - 15:46
आग्रह नाही त्या हॉटेलचा... मला वाटले भेटल्यावर जेवण पण करणार आहोत आपण .. कारण इतर ही जेवन छान असल्याने सांगितले.. कोणास काही प्रोब्लेम असल्यास मला इतर ठिकाणीही काही प्रॉब्लेम नाही.. तसेही वल्लीला माहीती आहेच .. ते जिकडे ठरवतील तिकडे आम्ही आनंदाने येतोच

निओ Wed, 05/27/2015 - 12:10
कल्पना नव्हती, आकुर्डी मध्ये इतके मि पा सदस्य असतील. मि पा वर मी तसा नवखा आहे, पण आपणा सर्वांना भेटायला आवडेल. मी प्रयत्न करेन किमान भेट घेण्याचा.

In reply to by झकासराव

ओहो !! ओळखलत का झकासराव !! तब्बल ४-५ वर्षांपुर्व्वी बोललो होतो तुमच्याशी ! आठवतय का ? चला आता ह्या कट्ट्या निमित्ताने भेट होईल !!

चौकटराजा Wed, 05/27/2015 - 15:04
मला खादाडी ला येणे ख़ास करून सान्च्याला शक्य नाही .बागेत हवा खायला येतो ( हवेत काही क्यालारी असल्यास डा खरे सायाबानी व्यनि करावा)

नाखु Wed, 05/27/2015 - 15:08
भेटण्याचे ठिकाण वेळ सायंकाळी ६.०० ते ६.३० (याचा अर्थ ६.३० येऊ नये असा घेऊ नये वेळेवर उपस्थीत राहून लांबून येणार्या मिपाकरांना वेळेवर परत जाता येईल याकरीता कारण बर्याच्दा कट्टा चालू झाल्यावर उशीरा आलेल्या मिपाकरांना काही "चविष्ट आणि खमंग" गप्पांमध्ये सहभागी होता येत नाही. (मार्ग क्रं १: चिंचवड गाव मार्गे येणार्‍या मिपाकरांसाठी चिंचवड्गाव-->बिजलीनगरमार्गे रेल्वे पूलावरून प्राधीकरण==>पहिल्याच चौकात डावीकडे वळून आकुर्डी रेल्वे स्थानक मार्गे सरळ (रेल्वे स्थानकाकडे न वळता अगदी सरळ) साधारण ५०० मीटर अंतरावर एक चौक ओलांडल्यावर अगदी समोर आप्ले कट्टा ठिकाण. (मार्ग क्रं २: निगडी (अर्थात मुंबई पुणे महामार्गे येणार्‍या मिपाकरांसाठी निगडी उड्डाण पुलाखालून -->सावली हॉटेल्समोरून प्राधीकरण==>पहिल्याच चौकात सरळ (भेळ चौक )धन्वंतरी हॉस्पीटल ते बिग इंडीया ओफीस्पर्यत सरळ = बिग इंडीया चौकात डावीकडे वळून--> आनंद हॉस्पीटल चौकात--> पाटीदार भवन (मंगल कार्यालयाचे जवळ्च) साधारण २०० मीटर अंतरावर अगदी समोर आप्ले कट्टा ठिकाण . आधीक माहीती व तपशीलात दुरुस्तीसाठी कळफलक

स्थानीक नगरसेवक

श्री श्री रा रा कॅप्टन जॅक व रा.रा. मितान तै यांचेकडे देण्यात येत आहे. कट्टोत्सुक नाखु

In reply to by नाखु

मितान Wed, 05/27/2015 - 16:32
कट्टा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले आहे त्यामुळे मी वेगळे काही सांगत नाही. बाकी आवश्यकता असल्यास आत जाऊन जागा धरण्याची जबाबदारी तेवढी वाटायची राहिली :)) आणि हो... खादाडीचे ठिकाण पिंचि मधल्या कार्यकर्त्यांच्या आवाजी मतदानाने ठरवूया !!!!

In reply to by सूड

नं यायचं ठरवल्याबद्दल णीषेध, काळे झेंडे ई.ई. घौक प्रमाणात बदलापुर आणि पुण्यात पाठविण्यात आलेले आहे.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

सूड Wed, 05/27/2015 - 17:32
अहो कुवेतकरांच्या कट्ट्याला येतोय की*!! *पुणे शहरापासून दहा-बारा, डोक्यावरुन पाणी पंधरा किमीच्या परिघात असल्यास!! पिंचि म्हणजे लैच लांब होतंय. काळे झेंडे पाठवल्याबद्दल धन्यवाद, बाईक पुसायची आणि धुणं वाळत घालायच्या काठ्यांची सोय झाली. ;)

समद्यांण्सी राम्राम, कट्ट्याचं स्वरुप साधारणपणे असं असावं असं मला आणि नाखुनकाकांना वाटतं. गणेश तलावापाशी साधारण ५.३०-६.०० पर्यंत भेटणं (मी ६.३० ला येणारे). तलावाची दारं उघडी असतील तर आतमधे बसायला छोटेखानी घाट आहे तिथे तास-दिड तास मस्तं गप्पा मारु. त्यानंतर मग खादाडी कार्यक्रमासाठी प्रस्थान करु. माझ्या मते रामदेव, रसोईसे अश्या दोन जागा आहेत चांगल्या. त्यापैकी रामदेव ही जागा मोठ्या गृपसाठी चांगली राहिल. ह्याशिवाय थाळी सिस्टीम हॉटेलमधे गेल्यास जास्तं चांगलं होईल असं मला वाटतं. जेणेकरुन सगळ्यांना एकाचं वेळी पदार्थ वाढले जातील. कट्ट्याचा खर्च टी.टी.एम.एम. पद्धतीनी करायचा असल्यानी ते सोयीचं पडेल. अडचण अशी आहे की मला आमच्या इकडे चांगली थाळी कुठे मिळते हे अजिबात माहिती नाही त्यामुळे पिंचिंकरांनी सल्ला द्यावा. (मयुर चं नावं काढणार्‍याला फाट्यावर मारण्यात येईल). जेवताना परत गप्पा वगैरे मारता येतीलचं. शिवाय मग जेवण झाल्यावर परत गप्पांचा फड जमवु वेळ उरला तर. साधारण ९.३० ते १०.०० पर्यंत कट्ट्याची सांगता करु. ज्यांना लांब जायचयं अश्यांनी जेवुन लगेचं गेलं तरी हलकट नाही. कोणाला काही शंका असल्यास व्यनि करा. एखाद्याला/दिला जागा माहित नसेल किंवा काही शंका-कु.शंका असेल तर फोन करा मला. ज्यांच्याकडे नंबर नाही त्यांनी व्यनि करा. ओळखीच्या आयडीला नंबर दिला जाईल. आणि कोणीतरी अत्रुप्त बुवांना किड्णॅप करायची जबाबदारी घ्या. कळावे अनिरुद्ध दातार (अंड्या)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

प्रचेतस Wed, 05/27/2015 - 22:20
बाबा रामदेवचीच थाळी टिळक चौकात हायवेच्या पलीकडच्या बाजूला सुरु झालीय पण इतकी काही ख़ास वाटली नाही.

In reply to by नाखु

कपिलमुनी गुरुवार, 05/28/2015 - 12:45
भोज मध्ये सुद्धा राजस्थानी थाळी चांगली मिळते . दुवा वासू वडापावच्या गल्ल्लीमधे वासूचा नवीन हॉटेलच्या शेजारी. menu

झकासराव गुरुवार, 05/28/2015 - 10:50
दिल्ली स्वादच्या बाजुलाच चौधरी ची थाळी आहे. गुजराथी थाळी आहे. पण कधी जेवलो नाही त्यामुळे क्वालिटी माहिती नाही. रामदेव योग्य होइल अस वाटतय. थाळीचे ऑप्शन्स पिंची मध्ये फारसे नाहियेत.

नाखु गुरुवार, 05/28/2015 - 13:01
डोकी मोजणी सांगणे इथेच धाग्यावर. आत्तापर्यंतचे अभिप्राय वाचना नंतरचे अनुमान येन प्रकारे १.उत्सव मूर्ती चिमणराव २.मा. मितान तै ३.मुवी सहपरीवार ४.वल्लीदा ५.प्रगो ६.कपीलमुनी ७.एक्का काका ८.चौराकाका ९.झकासराव १०.बाबा पाटील (विथ दंबूक) ११.त्रिवेणी १२ चौथा कोनाडा १३ गणेशा (तुझं नाव टाकतोय मला तोंडावर आप्टू नकोस रे) १४ आणि मी सोत्ता (नाखु) यादी अद्द्यायावत ठेवायचे काम चिमणकडे सूपूर्त.