७ जून - ऐतिहासिक पुणे कट्टा (पुण्यात सगळेच ऐतिहासिक हो)
कालचा ठाणे कट्टा व्हायच्या आत ७ जूनच्या कट्ट्याचा वृत्तांत लिहायचे ठरवले होते...नै जम्ले...असो...हा ७ जूनच्या कट्ट्याचा मेगा-मेगाबायटी वृत्तांत :)
६ जूनचा कट्टा रात्री उशीरापर्यंत झाल्याने ७ ची सकाळ आळसावून उठण्यात गेली...सकाळची सर्व आन्हिके आटपायलाच साधारण ११ वाजले. तिथून मोर्चा सूडच्या घरी नेला...तो रात्री न घाबल्ता झोपला हे ऐकून सर्वांनीच कौतीकाने (की खौचटपणे?) त्याची पाठ थोपटली. :) त्याने दिलेला चहा पितापिताच पनीर शेख आजच्या कट्ट्याचे मानाचे टांगारू होणार असे त्याने स्वत:च जाहीर केले...जागतिक मिपातीहासातला हा पहिलाच कट्टा असावा ज्याला खुद्द उत्सवमुर्तीनीच टांग दिली असेल.
मिसळपाव