मौनांची भाषांतरे
तसा हट्ट नाहिये माझा
अगदी तश्याच राहिल्या तरी चालतील
मरीन ड्राइव च्या आठवणी, तुझी झालेली पाठवणी
माळलेल्या मोगर्याचा सुगंध, पहिल्या पावसाचा मृद्गंध
सोबतीने काढलेली कुडकुड़ती रात्र,
नकळत एकमेकात विरघळलेले अनिमिष नेत्र
अगदी अबोल शब्दांची पेरणी पण तशीच राहु दे
तसा हट्टच नाहिये माझा
फक्त
बघ जमलच तर कर मौनांची भाषांतरे
#जिप्सी
#gypsykavita.blogspot.in
काव्यरस
शस्त्र ओले परजतो पाऊस आहे...
धुंद होवुन गरजतो पाऊस आहे
हाय ओला बरसतो पाऊस आहे...
माय काळी आज पान्हावे नव्याने
स्पर्शण्या तिज तरसतो पाऊस आहे...
रान हिरवे नाचले बेभान आता
मोर होउन लहरतो पाऊस आहे
वीज कोसळते, सरी होती कट्यारी
शस्त्र ओले परजतो पाऊस आहे...
बघ धरा ओलावली आता कशाने?
भेटताना हरखतो पाऊस आहे...
का चकोरा येतसे ग्लानी सुखाने?
की तयाला भरवतो पाऊस आहे...?
चल 'विशाला' जावुया रंगून आता
अंगणी या बहरतो पाऊस आहे...
विशाल
काव्यरस
सायकलीसंगे जुले लदाख़ भाग २- बुधखारबू- फोतुला- लामायुरू- खालत्सी- नुरला
सायकलसंगे जुले लदाख़ भाग ०- प्रस्तावना
सायकलसंगे जुले लदाख़ भाग १- करगिल- मुलबेक- नमिकेला- बुधखारबू
सर्व मिपाकर वाचकांना मन:पूर्वक धन्यवाद...
३१ मे, रविवारची सकाळ! सेनेच्या जवानांसोबत चांगला आराम झाला. कालच्या दिवसावर अजूनही विश्वास बसत नाहीय. काल रात्री जवानांसोबत मस्त गप्पा झाल्या. पहिल्यांदा त्यांच्यासोबत राहात असल्याची थोडी भिती वाटली. पण वातावरण अगदी अनौपचारिक होतं. अर्थात् सुरक्षेच्या नियमांप्रमाणे सामानाची तपासणी केली.
तत्त्वभान
मित्रहो, मी गेल्या वर्षी म्हणजे २०१४ साली ‘लोकसत्ता’मध्ये 'तत्त्वभान' हे सदर लेखन करीत होतो. तत्त्वज्ञान या विषयाची ओळख करून देणारं. मी तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक आहे. तत्त्वज्ञान हा जरी उच्च दर्जाचा प्रतिष्ठित विषय असला तरी त्याच्या नादी कुणी फारसं लागत नाही. एका विशिष्ट पातळीच्या खाली येऊन त्यावर लेखन करता येत नाही, अशीही भानगड आहेच. पण वृत्तपत्राचा वाचक सर्व स्तरावरचा असतो. सामान्य माणसापासून प्रतिभावंत तत्त्ववेत्त्यापर्यंत एक मोठा पट या वाचकात असतो. त्यामुळे या सर्वाना सुलभ वाटेल, असे तत्त्वज्ञानविषयक लेखन करण्याचा माझा हा प्रयत्न होता. दर गुरुवारी हे सदर प्रसिद्ध होत असे.
माझी केरळ आणि तामिळनाडु सहल भाग-३
भाग-१
भाग-२
सगळेजण प्रवासाने थकले होते. मग प्रत्येकाने आपापल्या खोलीत आराम केला. हे हॉटेल फक्त निवासा करिता होते. रात्रौ ९.०० वाजता जेवायला थोडे अंदाजे ८०० मीटर अंतरावर असलेल्या एका दुसर्या हॉटेलमध्ये व्यवस्था केली आहे असे सांगितले गेले. पण कोणीचीही त्या बद्दल काहीच तक्रार नव्हतीच. उलट सगळे त्या आल्हादायक वातावरणात मस्तपैकी थंड हवेत (तापमान बहुतेक २५ असावे) आणि चांदण्यात फिरत फिरत तिथे पोहचले. जेवण रुचकर होते.
७ 'कधीपण-कुठेपण' व्यायामप्रकार
ब्लॉग पोस्ट इंग्रजीत आहे. तिचा दुवा हा
खाली दिलेले ७ व्यायामप्रकार असे आहेत की जे कुठेही केले जाऊ शकतात. या व्यायामप्रकारांत शरिरातील अनेक सांधे, स्नायू कार्यत्यामुळे, त्यामुळे हे कंपाउंड एक्सरसाइजेस या वर्गात मोडतात. जिम लावेपर्यंत, लावायच्या आधी, किंवा लावायचं नसेल तर, हे व्यायामप्रकार तुमच्या दिनचर्येचा भाग होऊ शकतात.
आधी महत्वाचे:
- नेहमी निगेटिव मूव्हमेंट हळू करावी. ५ आकडे मोजत निगेटिव मूव्हमेंट होणे आदर्श. उदा.
मला आवडलेले संगीतकार भाग ४ - सज्जाद हुसैन
मला आवडलेले संगीतकार :- १ मदनमोहन
मला आवडलेले संगीतकार :- २ सी रामचंद्र
मला आवडलेले संगीतकार :- ३ अनिल बिश्वास
संगीत काही लोकांच्या शरीरातून रक्तासोबत मिसळून वाहत असते. त्यांचा प्रत्येक श्वास संगीताने भारलेला असतो. त्यांच्या प्रत्येक शब्दात, कृतीत संगीत वसते.
बीएमएम २०१५ - नावनोंदणीकरता शेवटचे ५ दिवस
नमस्कार मंडळी,
२४ वर्षानंतर दक्षीण कॅलीफोर्नियात भरणारं बृहन्महाराष्ट्र मंडळाचं १७ वं अधिवेशन काही दिवसांतच सुरू होईल. नावनोंदणीसाठीची अंतीम तारीख २१ जून आहे. तेव्हा त्वरा करा.
अधिवेशनाच्या भोजन समितीने तुमच्यासाठी मेजवानीची तयारी केली आहे, ती तुम्ही या दुव्यावर पाहू शकता.
तीनही दिवस भारतातील आणि उत्तर अमेरिकेतील कलाकारांचे अनेक उत्तम कार्यक्रम पहाण्याची संधी. कार्यक्रमाची यादी या दुव्यावर पहा.
यादवकालीन शिल्पसमृद्ध मंदिर: पिंपरी दुमाला
असंच कधीतरी, कुठूनतरी पुणे-नगर रस्त्यावर रांजणगावच्या आसपास पिंपरी दुमाला येथे एक शिल्पसमृद्ध यादवकालीन मंदिर आहे ह्याची माहिती मिळाली होती. नक्की ठिकाण कुठे ते माहित नव्हते. मग काय निघालो शोधत आम्ही.
पेरणे फाटा ओलांडल्यावर दोन तीन ठिकाणी विचारतच जावे लागले. एका ठिकाणी डावीकडचा रस्ता पिंपरी दुमाला येथे जातो अशी माहिती मिळाली. तिथून घुसलो. चांगला डांबरी रस्ता थोड्याच वेळात कच्च्या खडबडीत रस्त्यात रूपांतरीत झाला. मग अतिशय लहानलहान वाड्या लागू लागल्या. ठिकठिकाणी विचारत खराब रस्त्याने एकदाचे पिंपरी दुमाला येथे जाऊन पोहोचलो.
गाव तसं लहान. मंदिर गावात शिरल्याशिरल्यानंतर थोडं पुढं आहे.
मिसळपाव