सत्य परेशान होता ही है और हारता भी है?
(खालील घडलेली सत्य घटना नावे बदलुन)
अनिकेत आणि निकिता दोहोंचा संसार सुरु होऊन ५-६ वर्ष झाले होते. छान पैकी चालले होते. एक मुल होते. भाड्याच्या घरातुन एक २ बी.एच. के. फ्लॅट घेतला. फ्लॅट घेतांना सोसायटी, शेजारी पाहिले. फक्त चारच घरांची दुमजली ईमारत पाहुन जास्त त्रास नाही म्हणुन फ्लॅट घेतला. सुरवातीला २-३ वर्ष सगळे व्यवस्थित चालले होते. तस पाहता घरात ज्या छोट्या छोट्या कुरबुरी शिवाय बाकी सगळे ठीक ठाक. शेजारी एक पेट्रोल पंपावर काम करणारा. अनिकेत स्वतः शासकीय नोकरीत. वरचा फ्लॅटमध्ये एक दक्षिण भारतीय कुटुंब. त्याच्या शेजारी एक अविवाहित.
मिसळपाव