चित्रकार पिंटू [बालकविता]
लेखनविषय:
काव्यरस
आमचा पिंटू चित्रकार छान
चित्र काढताना पाठीची कमान ..
जिराफाला असते गेंड्याची मान
उंटाला दिसती हत्तीचे कान ..
भूभूचे शेपूट सरळ असते
हम्माचे शेपूट वाकडे दिसते ..
मोरपिसारा कोंबड्याला असतो
कोंबड्याच्या तुऱ्याचा पत्ता नसतो ..
झुरळ असते काढलेले हातभर
मिशा त्याच्या फक्त चिमूटभर ..
इवल्याशा सशाला पाय कावळ्याचे
सिंहाला नेमके पाय बगळ्याचे ..
मुंगीचा डोळा वाघाला दिसतो
घुबडाचा डोळा चिमणीला असतो ..
चित्र रंगवताना डोलावतो मान
म्हणतो स्वत:च "वा वा छान"..
चित्रात भरताना विविध रंग
स्वत:चे भरतो रंगाने अंग
आमचा पिंटू चित्रकार छान
मोठ्ठा झाल्यावर होणार महान .. !
.
वाचने
1790
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
मस्त ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Knight Rider (2015) Official Fan Movie Trailer:)
माझ्या चित्रकलाशैलीवर कविता
आभार -