सायकलसंगे जुले लदाख़ भाग १- करगिल- मुलबेक- नमिकेला- बुधखारबू
सायकलीसंगे जुले लदाख़ भाग ०- प्रस्तावना
सर्व मिपाकर वाचकांना मन:पूर्वक धन्यवाद..
३० मेच्या सकाळी करगिलमध्ये लवकर जाग आली. लवकर तयार झालो. आज माझी पहिली परीक्षा आहे! आज लदाख़ प्रदेशात सायकलिंगची सुरुवात होईल. आजच्या दिवशीच्या स्कोअरनुसार पुढचा अंदाज येईल. आज हेही मुळात कळेल की, मी लदाख़मध्ये सायकलिंग करू सुद्धा शकतो का नाही. काल रात्रीच्या तुलनेत आत्ता मन शांत आहे. एक उत्सुकता आहे. कालपर्यंत करगिलवरून बटालिक आणि दाह ह्या रस्त्याने लेहला जाण्याचा विचार करत होतो. मागच्या वेळी बटालिकमधून जाणारा रस्ता बघितला नव्हता.
मिसळपाव