Skip to main content

मुठठा माई (विडंबन)

लेखक गरजू पाटिल. यांनी शुक्रवार, 22/05/2015 21:41 या दिवशी प्रकाशित केले.
दुर्गंध वाहते दुर्गंध वाहते मुठठा माई तीरवरल्या कोणालाही, पर्वा तीचि नाही. कुणी टाकि तित कचरा आता, कुणी टाकिती पूज्यदेवता. पाषाणाची पाहूनी ह्रुदये, पाहूनी ह्रुदये, मोजित दिन राहीली. दुर्गंध वाहते मुठठा माई तीरवरल्या कोणालाही, पर्वा तीचि नाही. सतत वाहते गढुळ पाणी, कुणी नं धजतो उचलन्या घाणी. आळ्शांस ही व्हावी कैसी मुठठा ही फलदायी ? दुर्गंध वाहते मुठठा माई तीरवरल्या कोणालाही, पर्वा तीचि नाही. माडगुळकरांची माफी मागून बरका, त्यांच्या 'गीताची' छेड काढतोय........ (संथ वाहते कृष्णामाई) दुर्गंध मानुन घ्या.........

स्पेन-३...Sevilla.

लेखक पद्मावति यांनी शुक्रवार, 22/05/2015 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
Sevilla ...,. आंड्यूल्यूशियाच्या राजधानिचे हे शहर Guadalquivir या नदीच्या तीरावर वसलेले आहे. स्पेनच्या इतिहास आणि संकृतीचं एक मानचिन्हं म्हणून याची ओळख आहे. साधारण 206 B.C. रोमन राज्यकर्त्यांंनी याचं Hispalis हे नाव ठेवलं. रोमन काळात हे शहर वैभवाच्या शिखरावरती पोहोचले होते. मग नंतर इ.स.७०० नंतर अरबांनी याचा कब्जा घेतला आणि नाव ठेवलं Isbiliah. त्यानंतर जवळजवळ पाचशे वर्षं इथे इस्लामी सत्ता होती. या काळात पण हे शहर समृद्धशाली होते. तेराव्या शतकाच्या मधे फर्डिनॅंड-तिसरा याने सेविला जिंकून घेतले आणि तिथे ख्रिस्ती धर्माची स्थापना केली.

प्रेम

लेखक परी१२३४५ यांनी शुक्रवार, 22/05/2015 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम म्हणजे एक आस प्रेम म्हणजे एक ध्यास प्रेम म्हणजे एक श्वास प्रेम म्हणजे तुझा हवाहवासा सहवास. प्रेम म्हणजे गर्दीतला एकटेपणा प्रेम म्हणजे एक आंतरिक वेदना प्रेम म्हणजे एक गोड संवेदना प्रेम म्हणजे हुरहूर लावणारी मनाची दशा प्रेम म्हणजे चढलेली एक नशा. प्रेम म्हणजे माझ तुझी वाट पहाण प्रेम म्हणजे तुझ न येण प्रेम म्हणजे मी तुझी वाट पाहून थकून जाण प्रेम म्हणजे तू येणार नाहीस हे माहित असूनही रोज तुझीच वाट पहाण. येशील कधी तू माहित नाही तरीही रोज वाट तुझी पाहीन अखेरच्या श्वासापर्यंत फक्त तुझीच राहीन फक्त तुझीच राहीन.

वैनी........२ (अंतीम)

लेखक चुकलामाकला यांनी शुक्रवार, 22/05/2015 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
त्यानंतर मधून मधून संध्याकाळी परड्यात वैनी दिसू लागली . कधी विहिरीवर पाणी भरताना तर कधी झाडताना . ती दिसली की आम्ही मोठ्ठ्यानं गलका करू, "वैनी अंजीर , वैनी अंजीर ." ती बिचारी अंजीर ओच्यात वेचून घेऊन येई . आमचा अंजीरांचा खुराक पुन्हा सुरु झाला . काही दिवसात आमची आणि वैनीची गट्टी जमली. अलीकडे बळवंतराव लवकर घरी येई . मग तो आणि वैनी फिरायला बाहेर पडत. ती दोघं निघाली की इकडे सरूच्या तोंडाचा पट्टा चालू होई , " आता आइसक्रीम खातले , आमका नाय देवचे . परवा ह्यो गुळयाचे भजे घेऊन इल्लो . खोलीत जाऊन दोघा गुपचूप खाय होती . आमका एक पण देउक नाय , माका वास इलो.

काही नवे करावे म्हणून-भाग ४

लेखक नूतन सावंत यांनी शुक्रवार, 22/05/2015 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
सुरेखाच्या घरी पोचलो.टिपिकल कोकणातले घर.बाहेर अंगणात मांडव टाकलेला.गडग्याला लागून गावठी गुलाबाची लाल आणि गुलाबी झाडे,तगर ,अनंत, तीन चार रंगाच्या कण्हेरी,तीन चार रंगाच्या जास्वंदी,अबोली,मोगरा,मधुमालती,सदाफुली अशी फुलझाडे आणि चिकू, जाम,आंबे,पेरू, जांभूळ,आणि नारळ अशी फळझाडे होती त्यामुळे अंगणात गारवा.खुर्च्या टाकलेल्या होत्या.आम्ही तिथेच बसलो तिला सगळी कथा सांगितली. “असा वैताग आणला आहे ग मेल्याने.भिकारीच जसा.काहीना काही घेतल्याशिवाय रहात नाही.”सुरेखा संतापाने बोलली.

आपली लिपी टिकेल का ?

लेखक उगा काहितरीच यांनी शुक्रवार, 22/05/2015 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्यापैकी कितीजण मराठीत अंक व्यवस्थीत लिहु शकतात ? असतील थोडेफार सन्माननिय अपवाद. पण बहुतेक जण तर नाही लिहु शकणार. आपली मराठीत अंक वगैरे लिहीण्याची सवयच मोडली असे नाही का वाटत ? मराठी ५ व्या इयत्तेत असल्या पासुनच आपण इंग्रजीतच अंक लिहीत आलोय. बहुतेक लोकांच्या ऑफिसमध्येही आकडेमोड इंग्रजीतच होते. त्यामुळे साहजीकच आपली मराठीतुन अंक लिहीन्याची सवय मोडली. द्या सोडुन ! whatsapp , facebook, किंवा इतर कुठल्याही messenger वर चॅटींग करताना किती जण मराठीत करतात ? उगा इंप्रेशन मारायला नाही , कामासाठी आवश्यक असनारी चॅटींग जसेकी कुठ आहेस, कधी येतोय वगैरे.

सफर तामिळनाडुची! - रामेश्वरम (भाग २)

लेखक पिलीयन रायडर यांनी शुक्रवार, 22/05/2015 17:08 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ शनिवारी संध्याकाळी आम्ही मदुराईला पोहोचलो.. वातावरण ढगाळ होतं.. थोडा थोडा पाऊसही चालु होता...आणि धनुषकोडीला जाऊन सुर्योदय पहायचं स्वप्नं त्या पावसात केव्हाचं वाहुन जाऊन एव्हाना रामेश्वराच्या चरणी पोहोचलं होतं.. आता मात्र पुढंच कसं करावं ह्याचा विचारही करवत नव्हता.. नवरा आधीच इथे एकदा येऊन गेल्याने त्याला मदुराई आणि रामेश्वरमची माहिती होती.. मागच्या वेळेस तो जिथे राहिला त्या "कावेरी महल" मध्ये जायचं होतं..

भ्रष्टाचाराचा भस्मासूर

लेखक नांदेडीअन यांनी शुक्रवार, 22/05/2015 15:54 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या बरेच लोक सांगत सुटले आहेत की गेल्या वर्षभरात एकही भ्रष्टाचार झाला नाही. त्या सगळ्यांसाठी काही प्रश्न आहेत. कृपया उत्तरं देऊन माझ्या माहितीत भर घालावी ही नम्र विनंती. सुब्रमनिअन स्वामी राफेल विमान खरेदी प्रकरणामध्ये सरकारच्या विरोधात कोर्टात जातो म्हणाले होते. असे का बरे ? सामनामध्ये LED Scam बद्दल लिहून आले होते. असे का बरे ? राम जेठमलानी म्हणाले, "भ्रष्ट सरकार भ्रष्ट जजों की ही नियुक्ति करेगी ।" असे का बरे ? Chief Information Commissioner, Central Vigilance Commision , Lokayukta या जागांवर गेल्या वर्षभरात कुणाचीही नियुक्ती झाली नाही. असे का बरे ? माहिती अधिकारा अंतर्गत मागवलेली माह

झिंग बोचर्‍या अहंपणाचे चगिन्यांचेदा चकानदु

लेखक सूड यांनी शुक्रवार, 22/05/2015 15:35 या दिवशी प्रकाशित केले.
दागिन्यांचे वळण नशिले, प्रतिसादातून उरात घुसले उद्धट ललना उर्मट बोले, टेम्पोमाजी जरा बसविले वृंदगान : दु दु दु दु काय तरी हे लक्षण मेले,विडंबुनिया मिपा हलविले खरपूस तळल्या जिल्ब्यांसंगे, कहासुनीचे तुमन्त छोले वृंदगान : ऑ अच्च जालं तल नटवे थटवे जमवी ठिक्कर, तार गुंफिली नक्षी त्यावर कंपू देई थाप डफावर, कुत्सित ललना राग शिरावर वृंदगान : नाच गं घुमा तोडूनि तारे काथ्या कुट्टी, उठता कट्टी बसता बट्टी गडबडगुंडा वरची पट्टी, दागिन्यांची मधली सुट्टी वृंदगान : ड्रीमम वेक्कपम क्रिटीकल कंडिशनम् श्वेतलाजरी गिर्जा नाचे, बिरुटे आले धागा टाके खट्टू होऊनि भरभर धावे, धागा उडवा कन्या बोले वृंदगान : आयला गो गौ

पुरंदरला जायचे प्रयोजन आहे ..माहिती मिळेल का ?

लेखक कहर यांनी शुक्रवार, 22/05/2015 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
उद्या सकाळी दुचाकीवरून पुरंदरला जायचे प्रयोजन आहे … या आधी कधी योग आलेला नाही. खालील बाबींची माहिती मिळेल का ? १. ट्रेक व्यतिरिक्त वाटेवर आणि गडावर पहाण्यासारखे काय काय आहे ? २. खाली पार्किंगची काय सोय आहे ? ३. गडावर खाण्याची आणि पाण्याची काय व्यवस्था आहे ? ४. वज्रगड पाहायचा झाल्यास एकूण किती वेळ लागेल दोन्ही गड फिरण्यासाठी ? ५. सोबत सौ असल्याने काही खास काळजी घ्यावी लागेल ?