पाठलाग - कथा - भाग १
१९६०चे दशक नुकतेच चालू झाले होते . मराठी चित्रपटसॄष्टीमध्ये ग्रामिण बाजाचे चित्रपट हळुहळु लोकप्रिय होऊ लागले होते. ग्रामिण पार्श्वभूमी असलेले कथानक व त्याला असलेली लावणीप्रधान गीत नॄत्यांची जोड हे काँबिनेशन मराठी प्रेक्षकांनी चांगलेच उचलून धरले ."सांगते ऐका" , "पाटलाचा पोर" ,"ओवाळणी" अशा ग्रामिण पार्श्वभूमीच्या सिनेमांनी चांगलेच यश मिळवले . साहजिकच मराठी चित्रपट निर्मातेही अशाच चित्रपटांच्या निर्मीतीकडे वळू लागले . अनंत माने , दिनकर द.
एक पूर्ण ताट
“या आजोबा बसा, काय हवय आपल्याला?”
“थकलोय हो, खूप भूक लागलीय. काही खायला असेल तर द्या ना.”
“कसली भूक?”
“कसली म्हणजे? भूक काय वेगवेगळी असते?”
“हो आजोबा या हॉटेलात येणाऱ्या प्रत्येक माणसाची भूक वेगळी असते. कुणाला ज्ञानाची भूक, कुणाला मनोरंजनाची भूक तर कुणाला फक्त मैत्रीची भूक.”
“बापरे कठीण आहे एकंदरीत सारा प्रकार. इथे निदान पाणी तरी मिळेल का?”
“मिळेल ना. कुठले पाणी हवेय आपल्याला काव्याचे कि साहित्याचे?”
“अहो मला खरच भूक लागलीय हो. त्या कट्ट्यावरची माणसे म्हणत होती इथ मिनिटा मिनिटाला जिलब्या पडतात. ते ऐकूणच मी माझी भूक भागवायला इथवर आलोय.”
“त्या जिलब्या वेगळ्या आजोबा, ती भूकही वेगळी.
ती आणि मी (भयकथा)
मी:
तिचं घर कसं भणंग. एकटं. मुख्य वाड्यापासुन जरासं दुर.
तिचे म्हातारे आईबाप, थोरले भाऊ, त्यांच्या बायका पोरं वाड्यात राहायचे. ही बाहेरच्या खोलीत. एकटीच. बिनलग्नाची.
रात्री जेवणानंतर घरामागच्या झाडीत मशेरी घासत फिरण्याची तिला विचित्र सवय होती.
तिची आणि माझी पहीली भेट इथलीच.
एका रात्री ती मला अशीच एकटी दिसली.
जवळ जावुन मी तिची विचारपुस केली.
घडाघडा बोलली. खरतरं मी तिच्यापुढे एक अनोळखी बाई होते. पण पहिल्या भेटीतच तिनं आयुष्यभराचं रडगाणं माझ्यासमोर सुरु केलं.
माझ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत कितीतरी वेळ एकटीच बोलतच राहीली. थोडी चक्रमच वाटली.
पण मला तिची दया आली.
श्रीगणेश लेखमाला
सर्व मिपाकरांना आणि वाचकांना गणेश चतुर्थीच्या आणि मिपा वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आठ वर्षांपूर्वी गणेश चतुर्थीला मिपाची मुहूर्तमेढ रोवली गेली. ".. लोग आते गए, कारवाँ बनता गया" हे मिपाला शंभर टक्के लागू पडतं. वैविध्यपूर्ण लेखन करणारे वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ सदस्य हे कायमच मिपाचं बलस्थान राहिलेलं आहे. इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस ते भाषाशास्त्रज्ञ ते गुरुजी ते दंतवैद्य आणि स्पेशालिस्ट डॉक्टर्स, मॅनेजर्स, असा (आणि याहीपलीकडचा) विस्तीर्ण पट मिपाकरांनी व्यापला आहे.
मिपाचं हे वैशिष्ट्य झ़ळकून उठावं, म्हणून यंदा आम्ही मिपाच्या काही सदस्यांना त्यांच्या व्यवसायाविषयी लिहितं केलं.
< नैराश्याकडे फाऊले>
पहिलेच विडंबन आहे : घ्या सांभाळुन
(मुळ कविता : www.misalpav.com/node/32809 )
उत्साह आला, संचारला संचारला,
लेख टंकला, इवढुकला, पिंटुकला,
कमेंट आले, हाणले, तोडले, जिंकले.
सर्वां जसे नवपाखरु मिळाले.
पण आता …
भटकंत्या, पाकृ, सगळेच फसले,
छटाकभर पिंक मिळेनासे झाले.
आज जरी धाग्यांना पंख लागले.
अखेरची जिलबी प्रसवुन झाले,
तरी डुआय पण न फिरकले,
हीच का नैराश्याकडे फाऊले?
काव्यरस
मिपाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.....
नमस्कार मिपाकरांनो,
कसे आहात?
आज आपल्या लाडक्या "मिपाचा" वाढदिवस.
माझ्या कडून मिपाचे अभिष्टचिंतन.
रोज मिपावर चक्कर टाकू या आणि मिपा=धर्म सार्थकी लावू या.
आपलाच,
(कट्टर मिपाकर) मुवि.
(आजकाल आम्ही जास्त खुमासदार लिहू शकत नाही.)
बाप्पाचा नैवेद्य : ड्रायफ्रुट्स मोदक
आसरा
घर तसं छपराचं.
एका बाजुला गुरांचा गोठा. दुसऱ्या बाजुला माजघर. पाठीमागे पडवी. मध्येच सारवलेला ओटा.
गोठ्याला लागुन भली मोठी चिंच ऊभी.
लागोलाग ओढा. कोरडा. फक्त पावसाळ्यात भरून वाहीलेला.
ओढ्याकाठी चिंच, सिताफळ, कवठ आणि केक्ताडाची वैविध्य झाडं.
या झाडांत बुजुन गेलेलं ते छपराचं घर. एकटं. गावापासुन दुर.
घरापासुन निघालेली पायवाट उतरती होत ओढ्यात शिरलेली. वगळी वगळीतुन जात पुन्हा चढाला लागलेली.
या पायवाटेवरुन घरातील माणसे येजा करीत. घरातील प्रमुख पुरुष याच वाटेवरून बैलगाडी नेई. लहानग्यांचा पोरखेळही याच वाटेवर चाले.
त्या घरात एक म्हातारा रहात होता.
हे काय कमी काय?
उठून जातात तेव्हा, आपलीच असतात माणसं
परतून येतात तेव्हाही, आपलीच असतात माणसं!
वादळात भोवंडून, अनोळखी जग पाहून
घरी परततात माणसं, हे काय कमी काय?
सापडत नाही एखाद्याला हवा तो किनारा
नाव परतते मुक्कामाला, हे काय कमी काय?
सुटत नाहीत कोडी, वाढत जातो गुंता
पाय वळतात दाराशी, हे काय कमी काय?
भरल्या घरात एकेकाचा रमत नाही जीव!
मरत नाहीत बेवारस, हे काय कमी काय?
उठून जातात तेव्हा, आपलीच असतात माणसं
परतून येतात तेव्हाही, आपलीच असतात माणसं!
काव्यरस
मिसळपाव