Skip to main content

द लास्ट पोस्ट

लेखक कैलासवासी सोन्याबापु यांनी शनिवार, 05/09/2015 00:12 या दिवशी प्रकाशित केले.
कारगिल सेक्टर च्या माधोमध एक जागा. एका दगडावर मी सुन्न पण शांत बसलो होतो. रिज कॅप्चर झाली होती अन शेजारी माझी रायफल पड़ली होती. तिच्यातही बेटी एकच गोळी उरली होती. तासाभरापूर्वी तुंबळ रणकंदन माजले होते इथे, आरडाओरडा वीरश्रीयुक्त युद्धघोष सगळ्याचीच रेलचेल. जरासे बधीर वाटत होते, तरीही शांतता अन त्या शांततेत कानात घुमणारा कुईंsssss असा आवाज लक्षात येत होता. कदाचित मी त्या आर.पी.जी. अन गोळ्यांच्या आवाजाने बधीर झालो होतो, असेल बुवा, ह्या धामधुमीत माझे लाडके मार्लबोरो लाइट्स चे पाकीट कुठे पडले कोणास ठाऊक! त्या परिस्थितीत सुद्धा मी ते जपून सेल्फ राशनिंग करून वाचवले होते.

सागरी महामार्गाने कोकण सफर

लेखक मंदार कात्रे यांनी शुक्रवार, 04/09/2015 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
गेली कित्येक वर्षे बाईकने कोकण सफर करायची असा विचार होता. पण भारतात असताना नेमकी पावसाळ्यात सुट्टी मिळत नसल्याने व गेली काही वर्षे आखातात असल्याने तो विचार प्रत्यक्षात मात्र येत नव्हता. सहा महिन्यापूर्वीच Hero Passion Pro खरेदी केली होती त्यामुळे यंदा तसा योग आला. मुख्य अडचण अशी होती की सलग 100 किमी पेक्षा सलग प्रवास एकट्याने मोटरसायकलने केलेला नव्हता. म्हणून सुरूवातीला 250 ते 300 किमी चाच टप्पा घ्यावा असे ठरवले. मग थोडीफार तयारी करून रत्नागिरी–मालवण सागरी महामार्गाने जायचे निश्चित केले. दिनांक 02 सप्टेंबर ला घरातून निघालो. रत्नागिरी आमच्या गावापासून 30 किमीवर आहे.

नवस - लघुकथा

लेखक जव्हेरगंज यांनी शुक्रवार, 04/09/2015 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
होडी तशी बारीकचं होती. नदीसारखीच. पलिकडं, देवळावर, भगवा झेंडा वाऱ्यावर डौलत होता. हातात मटणाचा प्रसाद होता. आभाळात घारी सावज शोधण्यात भटकत होत्या. बारकी पोरं त्यांचाकडं बघण्यातच दंग होती. ईवलूशी होडी पण वस्ताद कस लावुन वल्हत होता. संथ संथ होडी काठाला लागली. देवळात भक्तगणांची गर्दी होती. मऊशार वाळुतनं वाट काढत नाना देवळात शिरला. मंदाक्कापण सोबतीला होती. आज नानानं बोकड कापलं होतं. म्हसोबाला. कुणी त्याला खंडोबा पण म्हणायचं. आख्खी वाडी आली होती. दुरदूरची नातीगोतीही जमलेली. दिगंबर सोडून. पोरीचं लगीन जमाव म्हणुन मंदाक्कानं नवस केलता.

Marvel : उदय, अस्त आणि उदय -- भाग १

लेखक मोग्याम्बो यांनी शुक्रवार, 04/09/2015 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
Avengers: Age of Ultron ह्या बहुचर्चित चित्रपटाने जगातील सर्व बॉक्स ऑफिस रेकॉर्ड तोडले. हा चित्रपट निर्मिती करणारी Marvel Studio ही संस्था सगळ्यांना परिचित आहे. Comic Books मधील पात्रांवर चित्रपट तयार करण्यामध्ये ही सध्या अग्रगण्य आहे. पण ही कंपनी एकेकाळी दिवाळखोरी जाहीर करणार होती असे म्हटले तर? Marvel Comics सन १९३९ साली स्थापन झाली. तिचा पहिला वहिला मालक होता "मार्टिन गुडमन". पण Marvel ला २००५ साल येईपर्यंत कधीच स्थैर्य लाभले नाही. त्याचे कारण म्हणजे प्रत्यके गोष्टीमध्ये ते DC Comics च्या मागेच राहिले. "ह्युमन टोर्च " आणि "नेमोर" ह्या दोन पात्रांनी मार्वेल कॉमिक्स ची सुरवात झाली.

परोपकारी गणू

लेखक बबन ताम्बे यांनी शुक्रवार, 04/09/2015 20:57 या दिवशी प्रकाशित केले.
आज गावचा आठवडे बाजार. त्यामुळे सकाळची शाळा आणि दुपारी बारा वाजता सुट्टी. गणूला हा दिवस खूप आवडे. नेहमीप्रमाणे तो शाळेतून बारा वाजता घरी आला. घराला कुलुप होते.आई शेतावर मजूरीसाठी गेली होती आणि अजून तायडी पण शाळेतून आली नव्ह्ती. म्हणून तो घराच्या ओटयावर बसून राहीला. एव्हढयात त्याला शेजारच्या बिन्नूचा रडण्याचा आवाज आला. बिन्नू हा दुसरीत शिकत होता. त्याची आई सहसा कुठे बाहेर जात नव्हती पण आज ती घराला कुलुप लावून बाहेर गेली होती. घर बंद पाहून बिन्नू मोठमोठयाने रडत होता. गणूचा ह्या टिल्लूवर भारी जीव. त्याच्याशी खेळायला त्याला खूप आवडे. आज त्याला रडताना पाहून गणूची कालवाकालव झाली.

गंमत (भयगूढ कथा)

लेखक तुडतुडी यांनी शुक्रवार, 04/09/2015 17:21 या दिवशी प्रकाशित केले.
म्हणजे उन्हाळ्याचा शेवट चालू होता .पावसाळ्याला नुकतीच सुरवात झाली होती . उन्हं कलू लागली होती . दिवसभर उन्हाच्या काहिलीनं वैताग आला होता .पण आता कसं गार वारं सुटल्या मुळं जीवाला बरं वाटत होतं .आभाळ जरा भरून आल्यासारखं वाटत होतं . दिवसभर फळं विकत बसलेली कमळी आता कंटाळली होती . तिच्या पाटीतला (टोपलीतला) शेवटचा द्राक्षाचा घड संपला .विक्री चांगली झाली होती . २-३ पेरू शिल्लक होते पण 'आता लई उशीर नगं करायला. न्हाईतर आई कावल' म्हणून तिनं ते जवळच्या कापडी पिशवीत घातले . जवळच्या बाटलीतलं पाणी बी दोन घोटंच उरलं होतं .ते संपवलं .लुगडं झटकून ती उठली . केस सोडून पुन्हा अंबाडा घातला .

दुष्काळवाडा.. भाग ६ कोरडवाहू मिशनची कुंठीत गती

लेखक pradnya deshpande यांनी शुक्रवार, 04/09/2015 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
दुष्काळवाडा.. भाग ६ कोरडवाहू मिशनची कुंठीत गती दुष्काळ पर्जन्यआधारित पिक रचनेला फाटा, पाण्याची वारेमाप उधळपट्टी, जमिनीचे बिघडलेले आरोग्य यामुळे मराठवाड्यातील दुष्काळाला मानवनिर्मित कारणांची गडद किनार लाभली आहे. केवळ हवामान बदलाचा हा दुष्काळ नाही तो बNयापैकी मनुष्यनिर्मित आहे.मराठवाड्याची मूळ कोरडवाहू भूभाग ही ओळख नाकारुन नगदी पिकाची स्वप्ने पडायला लागली. या स्वप्नांना उभारी देण्यात आल्याने मराठवाडा दुष्काळी गर्तेत लोटला गेला.

मैं तुझे फिर मिलूँगी- अमृता प्रीतम मुक्त अनुवाद

लेखक महासंग्राम यांनी शुक्रवार, 04/09/2015 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
मी तुला पुन्हा भेटेन कुठे कसं माहित नाही, कदाचित तुझ्या कल्पनांची प्रेरणा बनून तुझ्या कॅनव्हास वर उतरेन की तुझ्या कॅनव्हास वरचीच एक रहस्यमयी रेखा बनून तुला शांतपणे तुला निरखत राहीन मी तुला पुन्हा भेटेन कुठे कसं माहित नाही. सूर्याचा एक किरण बनून तुझ्या रंगांमधे मिसळून राहीन की तुझ्या रंगामधे बसून तुझ्या कॅनव्हासभर पसरत जाइन मी तुला पुन्हा भेटेन कुठे कसं माहित नाही. धबधब्यातून मुक्त उडणाऱ्या तुषारांप्रमाणे तुला भेटेन आणि एक थंड अनुभुती बनून तुझ्या गळ्यात पडेन मी तुला पुन्हा भेटेन तुला कुठे कसं माहित नाही.

जडण घडण - २८ - सप्रेम द्या निरोप...

लेखक माधुरी विनायक यांनी शुक्रवार, 04/09/2015 16:04 या दिवशी प्रकाशित केले.
शेवटचा किंवा अंतिम भाग असा उल्लेख टाळतेय, कारण एक व्यक्ती म्हणून माझी जडण -घडण सुरूच राहणार आहे. खरं तर हे मी लिहू लागले ते नवऱ्याच्या आग्रहामुळे. त्याला वाचायला अजिबात आवडत नाही. पण माझा हात लिहिता राहावा, असं मनापासून वाटतं. या निमित्ताने मी लिहू लागले आणि प्रकाशित झाल्यानंतर प्रत्येक भाग त्यानेही आवर्जून वाचला. क्वचित कधीतरी, हे मला नव्हतं माहीत... असंही सांगितलं... या प्रवासात मिपाचं व्यासपीठ आणि मिपाकरांची साथ लाभणं, हे माझं सुदैव. संस्थळावर अशा प्रकारे व्यक्त होण्याची माझी पहिलीच वेळ.