पावसाळी कट्टा - भाजे लेणी

कंजूस भटकंती
पंधरा दिवसांपुर्वी सुधांशु नूलकर यांनी कर्जत /लोणावळा पावसाळी कट्टा करण्याबद्दल विचारले होते आणि थोडीफार चर्चा होऊन मळवली स्टेशनपासून दीड-दोनेक किमीवरच्या भाजेलेणी ( लोणावळापासून अंदाजे बारा किमी )येथे येत्या रविवार दिनांक सहा (६) सप्टेंबरला कट्टा करण्याचे ठरले आहे.पक्के करायला उशीर झाल्याने धागा काढायला उशीर झाला याबद्दल कृपया समजून घ्यावे. सध्या मुंबईचे पाच आणि पुण्याकडूनचे प्रचेतस ( पुर्वीचे नाव वल्ली )धरून चारजण येत आहेत असे कळवले आहे. वेळ आणि आराखडा याप्रमाणे- पुण्याकडून येणारे लोणावळा लोकल पकडून मळवलीस येऊ शकतात पहिली ७.३०ला आणि नंतरची ९.११ ला येते.मुंबईकडून डेक्कन एक्सप्रेसने ( 11007 )येणारे १०.१५ला येतील( लोणावळा अधिक लोकल ट्रेन),इंद्रायणी एक्सप्रेस ( 22105 )ने आल्यास ८.३०ला येतील.या दोन्ही गाड्यांस कनेक्टेड लोकल उभ्या असतात लोणावळ्याला.एकस्प्रेस पुढे गेली की मागोमाग लोकल जाते.डेक्कन एक्सप्रेसने येण्यासाठी तळेगावचे तिकीट काढा ,लोणावळा उतरून लगेच पलिकडच्या प्लॅटफॅार्मवरची पुणे लोकल धरा.एकच पुढचे स्टेशन मळवली. मळवली स्टेशनच्या पुणे टोकाला पुलावरून पलीकडे उतरल्यास भाजे गावाकडे जाणाय्रा शेअर रिक्षा मिळतात.चालत गेल्यास वीस मिनिटे. गावाजवळच थोडे उंचावर लेणी पाहून तीन वाजता परत निघायचे आहे. चार वाजताची लोणावळा लोकल पकडून तिथे ४.४० ची डेक्कन एक्स आणि ५.१५ची कोयना गाडी मिळते. मुंबई कडून येणाय्रा इंद्रायणी आणि डेक्कन ची रेझवेशन उपलब्ध आहेत परंतू परतीची संपली आहेत. स्टेशनजवळ चहा वडे मिसळ मिळते. थोडक्यात भाजेलेणी: भाजे लेणीतल्या पाहण्यासारख्या गोष्टी म्हणजे तिथल्या चैत्यगृहाचे तिरकस खांब, स्तूपांची मांदियाळी आणि सूर्यगुंफ़ेतील ग्रीक माइथोलॉजीतील सेंटोर, पेगेसस अशा प्राण्यांची शिल्पे.गावापासून चांगल्या बांधीव दगडी पायय्रा आहेत .साधारण रेल्वेचे पाच जिने इतक्या उंचावर लेणी आहेत.सरकते जिने अथवा रोपवे अजून लावलेले नाहीत. जवळजवळ दोन गड आहेत लोहगड आणि विसापूर.या विसापुराच्या डोंगरातच लेणी आहेत.तिन्ही एकाच दिवसात काहीजण करू शकतात परंतू ट्रेकिंग( सोपे असले तरी) असल्यामुळे वगळले आहे.( टॅाइलट सोय स्टेशनवरचीच वापरायची आहे). साडेदहापर्यंत मळवली स्टेशन वर येणाय्रांची वाट पाहू.मोबाइल संपर्क होऊ शकला नाही तरी ऐनवेळी येणाय्रांनी लेण्यांकडे यावे.

37 टिप्पण्या 16,261 दृश्ये

Comments

त्रिवेणी नवीन

भाजे लेणी म्हणजे एकविरा देवीच्या इथे आहेत ती का? जर कोणी अनाहिता असतील। आणि नावरोबा यायला तैयार zale टार। yeyin

प्रचेतस नवीन

In reply to by त्रिवेणी

एकवीरा असलेली कार्ल्याची लेणी. तिथे खूप गर्दी, घाण यामुळे जाववत नाही. भाजे लेणी कार्ल्याच्या विरुद्ध बाजूस. म्हणजे पुण्यावरुन जुन्या हायवेने आलात तर भाजे डावीकडे आणि कार्ले उजवीकडे.

अनिरुद्ध.वैद्य नवीन

In reply to by प्रचेतस

भाजे म्हणजे लोहगड जवळील न? तिथली गर्दीपण मला नकोसी झालेली … कार्ल्याला काय हालत असेल, कल्पना करवत नाही. बेडसे लेणी म्हणून अजून एक लेणी आहेत न त्याच परिसरात? धन्यवाद

प्रचेतस नवीन

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

गर्दी असतेच. बेडसे विसापूरच्या मागच्या डोंगरात आहेत. ती मात्र बरीच निवांत आहेत.

माझीही शॅम्पेन नवीन

In reply to by कंजूस

परमेश्वरा हे वाचण्यासाठी मला दिव्य दृष्टी दे __/|\__ (सर इमेज क्लियर नाहीत) कट्यास "हार्दिक" शुभेच्छा , सध्यातरी येण्याचा विचार नाही..

नाखु नवीन

In reply to by प्रसाद गोडबोले

styanarayan = म्हंजे स्टाईलीत "नारायण" अखिल्मिपातत्काळ्खुलासासमिती तर्फे जनहितार्थ प्रसारीत.

अरविंद कोल्हटकर नवीन

भाजे लेण्यामध्ये सात आठ शिलालेख आहेत. त्यांपैकी दोघांचे वाचन देतो. जिज्ञासूंना अधिक वाचने आणि लेण्यांची अधिक माहिती बर्जेस-इंद्राजी ह्यांच्या पुस्तकामध्ये मिळेल. नडसवस नायस भोगवतस गाभो दानं (भाषान्तर - भोगवती गावाच्या नाय (जातीच्या) नदसवाचे दान केलेले गर्भ (खोदीव जागा). महारथिस कोसिकीपुतस विण्हुदतस देयधम पोढी (भाषान्तर - कोसिकीपुत्र आणि महारथी असा विष्णुदत्त ह्याने देवधर्म म्हणून दान केलेले टाके.) लेण्याच्या वरच्या डोंगरावर चढलात तर पावसाचे पाणी लेण्याच्या प्रवेश मार्गावर न पडता बाजूने वाहून जावे ह्यासाठी खोदलेला चर पाहायला मिळेल. हा engineering detail लक्षणीय आहे. कार्ले-भाजे-बेडसे अशी १५-२० लेणी, काही पूर्ण तर काही अर्ध्यावर सोडून दिलेली, त्या भागामध्ये आहेत. पैकी शेलारवाडीची लेणी अगदी छोटी असली तर जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावरून सहज जाण्याजोगी आहेत. तेथे एक शिलालेख असून मूळचे बौद्ध लेणे शंकरमंदिरात बदलल्याचे स्पष्ट दिसते.

प्रचेतस नवीन

In reply to by अरविंद कोल्हटकर

भाजेतला अजून एक शिलालेख 'बाधया हालिकजयाना दानं' बाध या शेतकर्‍याच्या बायकोचे दान. बाकी शेलारवाडी लेण्यांत एक नसून दोन शिलालेख आहेत. पहिला लेख चैत्यगृहाच्या अलिकडील विहाराच्या बाहेरील भिंतीवर कोरलेला असून त्यात धेनुकाकटचा शेतकरी उसभणक याची पत्नी सियतगुणिकेने पुत्र नंदासहित दान दिल्याचा उल्लेख आहे तर दूसरा लेख चैत्याच्या आतील भिंतीवर आहे हयात थेर भदंत सिंह यांची शिष्या घपर ह्यांची प्रवजित कन्या हिने बुद्धसंघासाठी चैत्यगृह धर्मादाय केल्याचा उल्लेख आहे.

अरविंद कोल्हटकर नवीन

In reply to by प्रचेतस

दुसरे लेणे असल्यास माझ्या नजरेतून चुकले असावे. बर्जेस-इंद्राजीहि एकाच लेण्याचा उल्लेख करतात. शंकमंदिराबाहेरील लेखाचे माझ्याजवळील छायाचित्र पहा:
शेलारवाडी लेख
ह्या लेखाचे वाचन असे आहे: सिधं धेणुकाकडे वाथवस हालकियस कुडुबिकस उसभ णकस कुडुबिणिय सिअगुत णिकाय देयधंम लेणं सह पुते ण णं(द)गहपतिणा सहो भाषान्तर - सिद्धि असो! धेनुकाकट (गावी) वास्तव्य असलेल्या आणि नांगर चालविणार्‍या (= व्यवसायाने शेतकरी असलेल्या) कुटुंबीय (कुणबी) ऋषभणकाची कुटुंबिनी सियगुतणिका (सिंहगुप्तनिका?) हिचे, पुत्र आणि गृहस्थ नंद ह्याच्यासह, देवधर्म म्हणून लेणे.

प्रचेतस नवीन

In reply to by अरविंद कोल्हटकर

हे त्या दुसर्‍या लेखाचे छायाचित्र a a उपरोक्त लेखाचे मूळ वाचन असे सिध| थेरांन भयत सिहाण अते असिणिय पवैतिकाय घप [रा] बालिका सघाय बुद्धा च चेतियघरो देयधम मातापित उदिस सह [च] सवेहि भिखा [खु] कुलेहि सहा च आचरि [य] ही भतविरायेही समापितो भाषांतरः सिद्धी असो, थेर भदंत सिंह यांची शिष्या घपर यांची प्रव्रजित कन्या हिने सर्व भि़क्षुकुल यांछेसह बुद्ध आणि संघ यांच्यासाठी हे चैत्यगृह आईवडिलांच्या स्मरणार्थ समर्पित केले आहे. तुम्ही दिलेल्या शिलालेखाचे अधिक उत्तम छायाचित्र a

स्वच्छंदी_मनोज नवीन

भाजे लेणी आणी लेणीमास्तर वल्ली असल्यामुळे यायला आवडले असते पण काही महत्वाच्या कामामुळे जमत नाहीये.. भरपूर फोटो काढा आणी झकास कट्टा वृत्तांत लिहा त्यामुळे आम्हाला घरबसल्या मेजवानी मिळेल.. बादवे.. काही अभ्यासकांच्या मते भाजे, ठाणाळे आणी खडसांबळे ही लेणी महाराष्ट्रात खोदली गेलेली सर्वात प्रथम लेणी (इ.स्.पू. २ रे शतक). खरे खोटे वल्ली जाणे पण तुम्हाला मनसोक्त लेणी बघता येवो आणी रवीवारच्या पिकनीक पब्लीकचा त्रास न होवो ही इच्छा. लेणी राहीली बाजूलाच ही पब्लीक शेजारच्या धबधब्यासाठीच येतात असे वाटते. भाजे गांव प्राचीन आहेच पण डोंगराच्या पलीकडे असलेले पाटण गावही प्राचीन आहे (नक्की माहीत नाही पण बहुदा ह्या गावात पण खोदकाम झालेले असावे). पाटण गावात भारतातील पहीला लिथोग्राफिक प्रेस राजा रवीवर्मांनी सुरु केला होता असे वाचल्याचे स्मरते.

प्रचेतस नवीन

In reply to by स्वच्छंदी_मनोज

महाराष्ट्रातले सर्वात जुने लेणे हे राजमाचीच्या पोटातले कोंडाणे लेणे म्हणून मानण्यात येते. गिरिविहारात लेणी खोदण्याचे तंत्र तेव्हा प्राथमिक अवस्थेत असल्याने येथे वरच्या डोंगरात पाणी वाहून जाण्यासाठी चराचा अभाव, ओसरी नसणे त्यामुळे वरून कोसळणारे पाणी थेट लेण्यात जाऊन त्यांची झालेली हानी आदि प्रकार दृष्टीस पडतात. साधारणत: ह्याच कालखंडात ठाणाळे व खडसांबळे लेणी खोदण्यात आली असावीत तदनंतर ४०/५० वर्षातच भाजेचा चैत्य खोदला गेला असावा. बाकी सातवाहनांचे नाणेघाटातील लेणेसुद्धा बहुत प्राचीन. साधारण (इसपू २०० व२२०)

प्रचेतस नवीन

In reply to by प्रचेतस

बाकी पाटणच्या दिशेने विसापूरच्या डोंगरातही लेणी आहेत. एक चैत्य आणि काही विहार आहेत. पण माहितगाराशिवाय सापडणे अवघड. खुद्द विसापूर किल्ल्यावरही पाटणच्या वाटेने वर येताना खडकाळ पायऱ्यांच्या मधोमध कोठीवजा लेणे आहे. तिथेच एक शिवकालीन हनुमान मूर्ती आहे व लोहगडाहून गायमुख खिंडीतून येणारी ओढ्याची वाट किल्ल्यावर पोचते तिथेच १/२ खोदीव गुहा आहेत. त्यातीलच एका गुहेच्या का पाण्याच्या टाक्याच्या भिंतीवर एक ब्राह्मी लिपीतला शिलालेख आहे. ऐन किल्ल्यावर असलेला ब्राह्मीतला हा एकमेव शिलालेख. डॉ. शोभना गोखले ह्यांनी त्याचे वाचन केले होते.

माहितगार नवीन

In reply to by एस

+१ गूगल बाबा आणि कंट्रोल एफ असतात साथीला तरीपण, अगदी वेगळ्याच धाग्यात असे मुल्यवान प्रतिसाद पेरुन ठेवले गेल्यास शोधून काढण्यासाठी प्रत्येकजण प्रचेतस होऊ शकत नाही. दुसरेतर मिपा मालकांनी हवे असलेले प्रतिसादांना टॅग, बुकमार्क करणे, सुलभ रेफरंन्स तयार करणे या सोयी द्यावयास हव्यात.

सुधांशुनूलकर नवीन

नक्की येतोय. कंजूस आहेतच, बहुधा मुविही येणार आहेत.

अत्रुप्त आत्मा नवीन

In reply to by प्रचेतस

मी स्वत: दोनदा ,आणि आगोबाला सदर लेणी पहाताना दोनदा पाहिली आहेत. खर्र्रच खूपच छाण छाण छाण छाण आहेत.

राही नवीन

वरच्या काही प्रतिसादांत पाण्याच्या चरांचे उल्लेख आहेत. जलनियोजनाचे उत्कृष्ट उदाहरण कान्हेरी लेण्यांत दिसते. एक तर हा लेण्यांचा खूप मोठा समूह आहे. प्रत्येक गुहेला पाणीपुरवठा व्हावा अशा रीतीने कातळात पाट खोदून ते व्यवस्थित वळवले आहेत. त्यांच्या मार्गावर मध्ये मध्ये जलकुंडे आहेत. या कुंडांचे ओसंडपाणी(ओवरफ्लो)सुद्धा कल्पकतेने वळवले आहे. या वॉटर सिस्टर्न्ससाठी तरी कान्हेरी एकदा पहावेच. दहिसर नदीचा एक उगमस्रोत या टेकडीपासून आहे. एकेकाळी यावर दगडी बांध घालून पाणी अडवलेले आजही पाहाता येते. खोदकामाच्या औजारांसाठीच्या प्राचीन लोहभट्टीची जागा इथून अगदी जवळ आहे आणि साहजिकच तप्त लोह थंड करण्यासाठी आणि स्थपतींच्या वापरासाठी मोठ्या प्रमाणात लागणारे पाणी सुलभ असावे म्हणूनही दोन्हींची आसपासच योजना असावी. अर्थात या धरणाच्या पाण्याचा मुख्य उपयोग घरगुती वापर हाच होता असणार.