Skip to main content

बाबांचा 'सैगल'

लेखक मार्मिक गोडसे यांनी बुधवार, 02/09/2015 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
माझे मनगट घट्ट पकडून बाबा गर्दीतून वाट काढत भरभर चालत होते. मी रेंगाळतोय असे वाटले की बाबा मला पुढे ओढायचे, त्यांच्या वेगाने मला चालता येत नव्हते, पळावे लागत होते. फोर्टचा परिसर माझ्याकरता जादुनगरीच होती, फुटपाथावरील ते स्टॉल, त्यावरील इलेक्ट्रोनिक वस्तू, कॅमेरे, रिमोटवर चालणारी गाडी,हवेत उडणारे प्लॅस्टिकचे हॅलिकोप्टर,पाण्याच्या टबमध्ये फिरणारी बोट काय बघू नि काय नको अशी माझी अवस्था झाली होती.

दुष्काळवाडा...... भाग ५ काठोकाठ भरू द्या प्याला

लेखक pradnya deshpande यांनी बुधवार, 02/09/2015 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १, भाग २, भाग ३, भाग ४ दुष्काळवाडा...... भाग ५ काठोकाठ भरू द्या प्याला बियर लेखाचे शीर्षक वाचल्यावर कदाचित मराठवाड्यातील पाणी टंचाईवर आजचा लेख असणार असे वाटण्याची शक्यता आहे. तसे नाही. मी येथे चर्चा करणार आहे ती मद्याची. अर्थात औरंगाबादमधील बियर इंडस्ट्रीची.

बेरोजगार(कथा)

लेखक उगा काहितरीच यांनी बुधवार, 02/09/2015 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
अज्या तणतणतच रुमवर आला. रागारागाने शुज फेकुन देत बोलु लागला... "नाय रे योग्या, नाय होणार आपलं पुण्यात काही! च्यायला या पण कंपनीत तिसर्‍या राउंडनंतर बाहेर!" योग्या निवांत मोबाईलवर गेम खेळत होता. त्याने लक्षच दिले नाही. "ए भाड्या तुला बोलतोय!" योग्याने मोबाईल खाली ठेवला अन बोलला - "हं बोल काय झालं?" "काय व्हायचय ? तिसर्‍या राउंड्मध्ये बाहेर! च्यायला यांच्या , दिवसभर काही खाल्ल नव्हतं , सकाळी नऊ ला बोलवलं होतं, अकरा वाजता अ‍ॅप्टी घेतली, दोन वाजेपर्यंत बसवुन घेतलं, नंतर अजुन एक टेक्निकल, ती पण केली क्रॅक, चार वाजता जीडी घेतला, बारा मधुन दोनच घेतले. "सोडरे!" योग्या बोलला.

सुक्या बोंबलाचे कालवण.

लेखक नूतन सावंत यांनी बुधवार, 02/09/2015 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाळा सुरु झाला की, गरमागरम कांदाभजी,भाजलेले कणीस, मसाल्याचा चहा,कॉफी यांचे वास दरवळू लागतात.

धर्मगंड

लेखक संदीप ताम्हनकर यांनी बुधवार, 02/09/2015 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
I धर्मगंड I I धर्माच्या गायीचं काढा दुध I I वाटणारे आपणच याची असुदे शुद्ध I I द्या थोडे थोडे काहींना, पळीपळीने I I बाकी सगळ्याची पंचपात्रातून आचमने I I घेऊन जा पुन्हा एकदा पुराणात I I खात बसुदे प्रसादाचा पवित्र वांगीभात I I करू जानव्याचा इंटरनॅशनल ब्रॅन्ड I I कुरवाळत बसू धर्माचे बेंड I I ब्रम्ह गाठीत मोठी शक्ती असते पहा I I मारू मुठ्ठ्या - ओम फट्ट स्वाहा I I जाज्वल्य अस्मितेचं वगैरे एक बरं असतं I I स्वतःचं काही कर्तृत्व नसलं तरी चालतं I I जातीत जन्माला तर तुझं काय त्यात I I काढा मग जन्म-जन्मान्तरं, पुण्य आणि पाप I I वर्तमानशून्य आणि भविष्य अज्ञान्यांना I I काल्पनिक भूत काळाचाच तर आधार

बैलगाड्यावरून सुपर संगणक, एअर पोर्ट ते tifr मधे.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 02/09/2015 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
“ज्या देशात अजून बैलगाड्या व्यवहारात आहेत त्या देशात सुपर संगणकसुद्धा व्यवहारात येत आहे”. व्हॅक्युम ट्युब्स वापरून उपयोगात आणलेले संगणक हे फर्स्ट जनरेशन संगणक म्हणतात.उदा.tifrac संगणक. 1942-54 ट्रान्झीस्टर्स वापरून उपयोगात आणलेले संगणक हे सेकंड जनरेशन संगणक म्हणतात.उदा.cdc-3600 संगणक.1952-64 इंटीग्रेटेड सर्किट्स वापरून उपयोगात आणलेले संगणक हे थर्ड जनरेशन संगणक म्हणतात.उदा.cyber 175 संगणक 1964-72 व्हेरी लार्ज स्केल इंटीग्रेटेड सर्किट्स (vlsi) वापरून उपयोगात आणलेले संगणक हे फोर्थ जनरेशन संगणक म्हणतात.

अडगळीतला इतिहास

लेखक शीतल जोशी यांनी बुधवार, 02/09/2015 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
अडगळीतला इतिहास !!! परवा जुन्या अडगळीत, मनाच्या एक जुने पुस्तक सापडले, इतिहासाचे जर धूळ झटकली त्यावरची अन मग जरा बाजूला वळून पहिले मागच्या बुक शेल्फ वर अजून काही पुस्तके होती इतिहास सांगणारी दोन्ही पुस्तके इतिहासाचीच, पण एक सनावळ्या मध्ये अडकलेले अन एक मात्र वर्तमानाचे अस्तित्व सांगतच भविष्याचा हि वेध घेणारे अभ्यासाच्या पुस्तकामध्ये शिवाजी महाराज, अन झाशीची राणी एखादा धडा किंवा चार ओळी अन जमलच तर एखादे चित्र इतक्यातच संपून जातात आग्र्याहून सुटका किती कष्टाची आणि जीवावर बेतलेली होती आणि "मेरी झांसी नाही दुंगी" म्हणायला किती मोठे जिगर पाहिजे हे आम्हाला माहीतच नाही , कारण आम

वांझ

लेखक यमन यांनी बुधवार, 02/09/2015 09:09 या दिवशी प्रकाशित केले.
ही कथा मी " श श क " स्पर्धेसाठी लिहायला घेतली होती . शब्दसंख्या अंदाज न आल्यानी अंमळ गंडली होती. पण आता कुठले शब्द उडवू तेच समजेनासं झालंय. वांझ सूर्य झाडाच्या पायाशी पेटायचा आणि कमरेशी विझायचा ;रोज ;रोज ;गेली कित्येक वर्ष . त्याचं झाडाला कसलं अप्रूप असणार ? स्वतःचा अपूर्ण ;शुष्क ; जमिनीत खोलवर रुजलेला संसार घेऊन झाड जगत होतं . जगण्यात कुठला सोहळा नाही ;मरणही येत नाही .अगदी एकटं . पानं ;फुलं ;फळं एवढंच काय पावसाळ्यातलं शेवाळ पण झाडावर बहिष्कार टाकून होतं . गर्भारिणी ; पहिलट करणी झाडाची वाट शक्यतो टाळायच्या .

एक अनुभव - २

लेखक सुमित_सौन्देकर यांनी बुधवार, 02/09/2015 05:48 या दिवशी प्रकाशित केले.
एक अनुभव अश्विता काय होतेय? बर वाटत नाही आहे का?...शेजारीच उभ्या असलेल्या काकांनी विचारल.. पण अश्विता काहीही न बोलता जोरजोरात हुंकार भरू लागली.. सुनील तुझ्या पोरीला धरलान र कुणीतरी.....गर्दीतून एक अनुभवी आवाज आला.. एव्हाना अश्विता सगळीकडे डोळे मोठे करून पाहू लागली होती, अस्पष्ट घोगर्या आवाजात ''मला सोडा, सोडा मला'' अस ओरडू लागली. .. बाळा जा जाऊन पटकन खालच्या अळीच्या शिर्या काकांना बोलाव...अस बोलून काकांनी एका लहानमुलाकरवी सांगावा धाडला. थोड्याच वेळात तो मुलगा शिर्या काकांना घेऊन आला..शिर्या काका भूत उतरवतो अस खुपदा ऐकल होत मी.

चाय, चिलम, चपाटी : लाझ येई भारत भेटी (२)

लेखक बहुगुणी यांनी बुधवार, 02/09/2015 04:41 या दिवशी प्रकाशित केले.
=============================================================== भाग १ ------------ भाग २ ------------- भाग ३ ----------- भाग ४ ----------- भाग ५ ================================================================ भारतभेटीला प्रथमच येणार्‍या एका परदेशस्थ व्यक्तीला आपला देश कसा वाटला हे आपण शक्य तितक्या अलिप्तपणे अनुभवावं, म्हणून