Skip to main content

शेवटचा दिस....

लेखक चॅट्सवूड यांनी शुक्रवार, 20/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
"सर कुठं जायचंय?" "अरे, त्या पुलावरून घे ना" मी टॅक्सीच्या ड्रायव्हरला सांगितले. त्याने मान डोलावली. त्याने गाडी पुलाच्या दिशेने वळवली. मी टॅक्सीच्या मागच्या सीटवर एकटाच बसलो होतो. मी बाहेर बघितले. रात्र झाली होती, पावसाने जोर पकडला होता. बाहेर गाड्यांची संख्या तशी कमीच होती. बरे आहे, मी डोळे मिटले. दीर्घ श्वास घेतला. मी वाकून माझे डोके माझ्या दोन पायांमध्ये सरकवले. मी तसाच बसून राहिलो. ड्रायव्हरने माझ्याकडे नाराजीने बघितले. मी कण्हत होतो.

दृकश्राव्य विभाग :- राजा बेवड्याची गोष्ट (वर्‍हाडी कथा)

लेखक मित्रहो यांनी शुक्रवार, 20/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
Header2

ह्या माणसानं एकाले एक कड्यांग वऱ्हाडी ल्येख लिवून उलीशीक वऱ्हाडी आमालेबी शिकोली नं बाप्पा! आता दिवाळी अंकात आयकतीन का थे? तुमाले मालूम झालं अशीनच का काय दंगल करून ठेवेल हाय तं!
Footer

दृकश्राव्य विभाग :- आठवणीतली दिवाळी - चिन्मयी सुमित

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 20/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
Header2 कॅमेरामागे : ज्योति अलवनि कॅमेरासमोर : चिन्मयी सुमित गोष्ट ... चा पहिला अध्याय चालू असताना ज्योति ताईने सतिश राजवाडेंना साक्षात हजर करुन उपक्रमाला एक अनपेक्षित भेट दिली होती ! काही काही उपक्रम आणि त्यांच्याबरोबर आपणहुन येणारे ज्योति ताईसारखे लोकं यांचे ऋणानुबंधच असतात असं म्हणायला हवं. याही वेळी त्या घेऊन आल्या आहेत आपल्या भेटीला चिन्मयी सुमित यांना.

मला भेटलेले रूग्ण - ११

लेखक डॉ श्रीहास यांनी गुरुवार, 19/10/2017 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/41281 ह्या आजीबाई दुसऱ्यांदा आल्या होत्या (खरं तर नातीनी बळजबरीनी आणलेलं ) ... मी विचारलं का नाही आल्या ?औषधं संपल्यावर बंद करायची नव्हती ती पण बंद केलीत... नात म्हणाली "फारच जिद्दी आहे आजी अजिबात ऐकत नाही आणि आजही बळेच घेऊन आले नाहीतर आलीच नसती.." ह्या आजींना Vitiligo (मराठीत कोड असं वाईट नाव आहे) असल्यानी बाहेर पडणं लोकांच्या प्रश्नार्थक नजरांना तोंड देणं नको वाटत होतं , हे त्यांनी जरी नाही सांगितलं तरी कळणं अवघड नव्हतं... मी त्यांच्या कोडामुळे पांढरे डाग असलेल्या आणि सुरकुतलेल्या हातावर हात ठेवत ऐवढच बोललो...

वाटते आज

लेखक shrivallabh Panchpor यांनी गुरुवार, 19/10/2017 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
वाटते आज वाटते आज नव्याने लिहावे शब्दांशी स्वतःला गुरफुटून घ्यावे शब्दांना नवे पंख असावे आकाशी घेउनी मला उडावे वाटते आज नव्याने लिहावे शब्दांशी स्वतःला गुरफटून घ्यावे शब्दांना नवे श्वास द्यावे माझ्या श्वासांशी एकरूप व्हावे वाटते आज नव्याने लिहावे शब्दांशी स्वतःला गुरफटून घ्यावे शब्दांशिवाय काव्य आज स्फुरावे यमकाने मग स्वतःशीच हसावे वाटते आज नव्याने लिहावे शब्दांशी स्वतःला गुरफटून घ्यावे कवितेला आज विषय नसावे माझ्यातल्या मला मीच शोधावे वाटते आज नव्याने लिहावे शब्दांशी स्वतःला गुरफटून घ्यावे शब्दांच्या कोषात कवितेने जन्मावे फुलपाखरू होऊनी रंग उलगडावे वाटते आज नव्याने

दोन वैमानिकांच्या मैत्रीची एक अनोखी कहाणी

लेखक श्रीरंग_जोशी यांनी गुरुवार, 19/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिकन हवाईदलातून निवृत्त होऊन लेफ्टनंट कर्नल चार्ल्स उर्फ चार्ली ब्राउन परिपूर्ण असे आयुष्य जगत होता. १९७२ साली अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यातून निवृत्त झाल्यावर मायामी येथे स्थायिक झाला. १९८६ सालच्या एका कॉम्बॅट पायलट रीयुनियन सोहळ्यात त्याला वक्ता म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. तेथे त्याला एकाने विचारले की "दुसर्‍या महायुद्धातील तुमचा सहभाग असलेल्या एखाद्या कामगिरीची आठवण सांगता का?" त्यावर त्याने 'ती' घटना सांगितली. ती घटना सांगितल्यावर चार्ल्स ब्राउनला वाटले की त्या घटनेतील एका व्यक्तीचा शोध घ्यायला हवा.