Skip to main content

मेन्युकार्ड - लघुकथा

लेखक प्रतिक कुलकर्णी यांनी गुरुवार, 22/06/2017 या दिवशी प्रकाशित केले.
नवीन शहर, नवीन भाषा. सगळं नवीन होतं माझ्यासाठी. चारही बाजूला हजार मैलांपर्यंत कोणीही ओळखीचं नाही. मी रेल्वेमधून उतरलो. गर्दीच गर्दी होती. भरपूर लोक होते. कानावर पडणारी भाषा अगदीच वेगळी. सगळीकडे लिहिलेलं त्या वेगळ्या भाषेतच होतं. लोक मात्र माझ्या शहरात होते तसेच होते. रंग, उंची, फारसा फरक नव्हता. मला जरा हायसं वाटलं. खूप मोठा प्रवास झाला होता, म्हणलं जरा श्वास घ्यावा. एका उपहारगृहात गेलो. कोपऱ्यातलं टेबल बघितलं, एका खुर्चीवर बॅग ठेवली, एका खुर्चीवर मी बसलो. सुरुवातीपासून शेवटपर्येंत मेन्यूकार्ड काळजीपूर्वक वाचून काढलं. पाकीट काढून पैसे किती आहेत बघितलं. वेटर आला. मी हव्या असलेल्या पदार्थासमोर बोट ठेवलं. तो गेला. मी उत्सुकतेने वाट पाहत बसलो काय येतय म्हणून. चहा किंवा कॉफी येईल असं मला वाटत होतं. वेटर हातात एक ताटली घेऊन आला. त्याने ती माझ्यासमोर ठेवली, झरकन निघुनपण गेला. मी विचारात पडलो. हे काय आणून ठेवलं याने? दुसऱ्या कोणाची ऑर्डर तर नाही. अचानक डोक्यात प्रकाश पडला. माझीच ऑर्डर आहे. मेन्युकार्डमध्ये एक अंकी किंमत असलेला एकमेव पदार्थ होता - एक्स्ट्रा पाव. मी पाव खाल्ला, पाणी प्यायलं आणि निघालो.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3722
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

अहो ही तर लघुत्तम आहे... कथा पण नाही म्हणता येणार

शतशब्दकथा करता आली असती छान. पुलेशु! Sandy

जबरदस्त..थरारक कथा !! खिळवून ठेवणारी लेखनशैली... आज एक मिपाकर असल्याचा अभिमान वाटला! लिहीत राहा...आम्ही वाचत राहू

पुलेशु!

एक्स्ट्रा पाव.
का बरे, नुसता पाव पण असू शकतो की! मेनू कार्ड वाचता येत नसलं तर "एक्सट्रा" शब्द कसा कळेल.. बाकी गोष्ट आवडली.

कथा ठीकठाकच.. पण जव्हेरगंज म्हणाले तसे शैली चांगली आहे. चांगल्या कल्पना असतील डोक्यात तर उत्तम फुलवू शकाल. पुलेशु.

ठीकठाक प्रयत्न पण काहीतरी चुकलय का? अचानक डोक्यात प्रकाश पडला. माझीच ऑर्डर आहे. मेन्युकार्डमध्ये एक अंकी किंमत असलेला एकमेव पदार्थ होता - एक्स्ट्रा पाव. ——> जर भाषा येत नव्हती तर हे कसे समजले ?

In reply to by अभिजीत अवलिया

त्यांचे पण आकडे अरबीच असतील हो, का टेन्शन घेताय उगीच? आजकालच्या आपल्या पोरांना सुधा कुठे देवनागरी आकडे कळतात? मराठी मज्कुरात अरबी आकडे घेतोच की चालवून. तसेच.... शिवाय मेनुचा फोर्म्याट सेमच असणार. लेफ्टाला आयटम राईटाला प्राईस.

धन्यवाद मित्रांनो. मला "एक्स्ट्रा पाव"वाचून नव्हे तर समोरचा पदार्थ पाहून कळाले असे लिहायचे होते. असो. पुढील कथा अधिक व्यवस्थित लिहिण्याचा प्रयत्न करेन :)